शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
2
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
3
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
4
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
5
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
6
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
7
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे
8
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
9
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
10
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
11
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
12
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
13
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
14
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
15
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
16
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
17
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
18
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
19
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
20
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण

ग्रोथ इंजिनच्या शोधात सायकल

By admin | Updated: January 29, 2016 13:47 IST

स्टार्टअप इंडिया स्टँडअप इंडिया असा नारा देशात घुमतोय, पण ज्यांनी स्टार्टअपचे डाव मांडलेत ते देशभरातील तरुण नक्की काय आणि कसं करताहेत, हे जाणून घ्यायला तेलगंणातला एक तरुण इंजिनिअर सायकलवरून इंडियन स्टार्टअप टुरवर निघाला आहे.

आपलं काय होणारे, हे असंच चालणार. शाळा संपली की कॉलेज आणि मग नोकरी. मग दहा ते सहा हापिसात बसायचं, पैसे कमवायचे, घरगाडय़ा घ्यायच्या आणि लग्नबिग्न झालं की सेटल झालो असं म्हणायचं. अशा विचारांचं सॉफ्टवेअर आपल्याकडे फार लहानपणापासूनच शिकवलं जातं. तुम्ही इतर लोकांपेक्षा काहीतरी वेगळं केलं तर तुमच्या वाटय़ाला सरळ उपेक्षा किंवा हेटाळणी येते.
पण तरुण मुलांनीच आता हे जुनं सॉफ्टवेअर नव्या पद्धतीनं अपडेट करायला सुरुवात केली आहे. विशेषत: करिअरच्या नेहमीच्या साधनासाठी पारंपरिक मार्गाऐवजी पर्याय शोधण्याची धडपड तरुण करू लागले आहेत. त्यातही करिअर म्हणजे उदरनिर्वाहासाठी पैसे मिळवण्याची कृती असा नेहमी घेतला जाणारा मर्यादित अर्थ नसून जगण्याचा एक आनंददायी भाग म्हणून काहीजण करिअरकडे पाहतात. 
त्यातलाच एकजण सध्या सायकलवरून भारतभ्रमणाला निघाला आहे. पण सायकलला पायडल मारताना त्याच्या डोक्यात काहीतरी भलतंच भन्नाट शिजतं आहे.
तेलंगणच्या खम्मम शहरातला 22 वर्षाचा अक्षय गुनेटी.
तुमच्या आमच्यासारख्या साध्या सरळ आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील हा मुलगा. इंजिनिअरिंगचे शिक्षण सुरू असताना त्याच्या डोक्यात उद्योजकतेची कल्पना घोळू लागली. अभियांत्रिकीच्या शिक्षणापेक्षा उद्योगाकडेच आपला नैसर्गिक ओढा असल्याचं त्याला जाणवू लागलं. मग त्यानं मध्येच ब्रेक घेतला आणि सरळ नव्या उद्योजकांना मदत करणा:या संकेतस्थळाची निर्मिती केली.  केरळमधले आदिवासी समुदाय मातीपासून दागिने बनवतात त्यांच्यासाठी तो काम करू लागला. पण एक प्रश्न त्याच्या मनात उरलाच. तो म्हणजे, मी हैदराबाद-बेंगळुरात शिक्षण घेतोय पण देशभरातली बाकीची तरुण मुलं काय काय करताहेत, हे समजून घ्यायला हवं. तोवर त्याच्या मनात स्टार्टअपचं बी चांगलं रुजलं होतंच. मग आपल्या देशात तरुण स्टार्टअप्सची  काय स्थिती आहे हे प्रत्यक्ष जाऊन पाहायचं असं त्यानं ठरवलं.
आणि एक दिवस सरळ आपण इंडियन स्टार्टअप टुरवर जाणार असल्याचं घरी जाहीर करून टाकलं. देशात विविध ठिकाणी, लहानमोठय़ा शहरांमध्ये नवे उद्योजक कसे आकारास येत आहेत, त्यांचे उद्योग कसे वाढत आहेत याची माहिती घेत ही स्टार्टअप केंद्र जोडण्याचा प्रवास सायकलने करण्याचं त्यानं ठरवलं. येत्या फेब्रुवारीपासून त्याची ही इंडियन स्टार्टअप टुर सुरू होईल. त्यासाठी देशातील 27 लहान-मोठय़ा शहरांची त्यानं निवड केली आहे. दहा हजार किलोमीटर्सच्या या प्रवासामध्ये तो 2क्क्क् हून अधिक स्टार्टअप्सना भेट देणार आहे. नवे विचार, तरुणांच्या कल्पना, त्या कल्पनांवर भरवसा ठेवून उद्योग म्हणून पैसे गुंतविणा:या लोकांची मतं तो जाणून घेणार आहे. विविध राज्यांमधील सरकारी योजना, त्यांची नवउद्योगांना कशी मदत होते याचीही माहिती घेत ‘कनेक्टिंग द डॉट्स’ म्हणत त्याची ही सायकलवारी सुरू होते आहे.
पण सायकलच का?
हा प्रश्न त्याला विचारलाच, तर सांगतो, 
‘पोहणं आणि सायकलिंग हे माङो छंद आहेत. सायकलवर तर जिवापाड प्रेम.  म्हणून ठरवलं की भारत पाहायचा, देशभरातील स्टार्टअप्सवाल्या तरुण दोस्तांना भेटायचं तर सायकलनेच प्रवास करायचा. सायकलिंगचं वेड आणि देश पाहत स्टार्टअप समजून घेण्याची हौस हे सारं एकाच वेळी जमतंय, अजून काय हवं?’
देशात स्टार्टअपचं वारं वाहत असताना तरुण किती गांभीर्यानं या सा:याकडे पाहतात, याचंच हे एक उदाहरण!
 
- ओंकार करंबेळकर