शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
2
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
3
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
4
सरकार उलथून टाकायला 'सलाईन वीर' जरांगेंकडे किती आमदार? लक्ष्मण हाकेंचा खोचक सवाल
5
Vikram Solar IPO: विक्रम सोलर शेअर बाजारात करणार धमाकेदार एंट्री! प्रीमियमसह लिस्टिंग होण्याची शक्यता; ग्रे मार्केटमध्ये काय स्थिती?
6
४ मुलांची आई बॉयफ्रेंडसोबत पळाली, सासरच्यांनी शोधून घरी आणलं; त्यानंतर असं काय घडलं, पतीने FB Live केले, मग...
7
Ganesh Chaturthi 2025:अपरिहार्य कारणाने गणपती आणता आला नाही, तर शास्त्रात काय असतो पर्याय?
8
सपा आमदाराच्या कारला अपघात, अचानक गाडीचे स्टेअरिंग तुटले अन्...
9
शेअर बाजाराचा धोका नको, पण परतावा बंपर हवा? मग 'या' ५ योजना आहेत बेस्ट, कमी जोखीमीत दुप्पट पैसे
10
"तिला घेऊ नको, ती काळी आहे...", मराठी अभिनेत्रीला करावा लागलेला वर्णभेदाचा सामना
11
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
12
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
13
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
14
सनातन धर्म आणि संस्कृतीच्या रक्षणासाठी शीख गुरूंनी बलिदान दिलं -CM योगी आदित्यनाथ 
15
अमेरिकेच्या टॅरिफचा फटका! सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी कोसळला, 'या' क्षेत्राला सर्वाधिक धक्का
16
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
17
Ganesh Chaturthi 2025: वडीलांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मोठ्या मुलानेच गणपती आणायचा? पंचांगकर्ते सोमण सांगतात... 
18
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; सासरच्यांनी पकडल्यावर मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून...,
19
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
20
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा

सावधान !-तरुण ग्राहकांसाठी ऑनलाइन ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 07:00 IST

उद्या, 15 मार्च. जागतिक ग्राहक दिन त्यानिमित्त तरुण ग्राहक आणि त्यांच्या माहितीचा आर्थिक वापर याविषयीची ही चर्चा.

ठळक मुद्देतरुण ग्राहकांची मोठी संख्या, त्यांच्या हातातली क्रयशक्ती आणि समाजमाध्यमांत त्यांचा उपलब्ध असणारा डेटा यांचा वापर करून तरुणांच्या खिशात हात घातला जातोय, अशावेळी तरुणांनी सावध राहायला हवं.

वसुंधरा देवधर   

तुमच्यासाठी. तुमच्याचसाठीच.  असं म्हणत तुमच्या नकळत तुम्हाला कुणी गृहीत धरतंय, जगणं सोपं , सोयीचं करतो असं म्हणत तुमच्या जीवनशैलीवर परिणाम करतंय. विचारांना वळवून त्यांची दिशाच बदलून टाकतंय. तुमची दिशाभूल करतं, कधी आमच्या वस्तूच अमुक सणासाठी वापरा म्हणत तुमच्या खिशात हात घालतंय, तर कधी स्कीम्स आणून तुम्हाला स्वतर्‍लाच आपल्या खिशात हात घालायला भाग पाडतंय.हे असं होतंय आणि हे असं सगळं कोण करतंय?तर सायबर विश्व! माहितीचं महाजाल - इंटरनेट.  गुगल अंकल. ऑनलाइन व्यवहारांच्या अगणित शक्यता. हच्यरुअल रिअ‍ॅलिटी वापरणारे अगणित अ‍ॅप्स आणि गेम्स. ही यादी न संपणारी आहे. आपल्या हातातला स्मार्टफोन, गेमिंग, त्यासाठी उपलब्ध विविध साधनं उदा. हातात रिमोट अगर जॉय स्टिक धरून फुटबाल/टेनिस खेळायची साधनं, घरात चक्क थिएटर उभारून वर थ्री-डी गॉगलनं चित्ताकर्षक किंवा आश्चर्याने ‘आ’ वासायला लावणारं तंत्नज्ञान, घरभर फिरून कानाकोपरा साफ करणारा रूम्बा- शिवाय ते यंत्न असं हुशार की आपल्यालाच सांगणार ‘आता मला साफ करा’! सगळंच सामान्य ग्राहकाला अचंबित करणारं, हवसं वाटणारं, करून तर पाहू म्हणत चटकन हाती धराविशी वाटणारी ही सगळी उत्पादनं. शिवाय वाटाडय़ासारखे नकाशे, एसटीपासून विमानार्पयत सगळी तिकिटं, त्यांचे दरदिवशीचे वेगळे दर आणि भुलवणार्‍या योजनांची माहिती, क्षणात जगाच्या दुसर्‍या टोकाला- टोक नाही दिशा म्हणायला हवे, कारण पृथ्वी गोल आहे ना- तर जगाच्या कोणत्याही दिशेला काय घडतंय ते कळण्याची आणि त्यावर ताबडतोब मत देण्याची (टीवटीव करण्याची) सोय, पटापट निर्णय घेऊन ते क्षणात अंमलात आणायची सोय. हे सारं म्हणता म्हणता आपल्या आयुष्यात शिरलं. म्हणता म्हणता जगणं सोपं झालं असं वाटायला लागलं.मात्न ते खरंच तसं सोपं झालंय का? की जुने गुंते, त्नास, वेगवेगळ्या प्रकारच्या कटकटी आणि धोके, यातून बाहेर पडून आपण एका नव्या बिनचेहर्‍याच्या- आपल्या आकलनापलीकडच्या- जगडव्याळ महाजालात गुरफटलोय आणि गुंतून पडलोय आपण?आपण म्हणजे सामान्य ग्राहक. त्यातही तरुण ग्राहक. कारण भारत हा तरुणांचा देश. मोठी तरुण बाजारपेठ आणि त्याच तारुण्याच्या हातातल्या क्रयशक्तीला हात घालणारी बाजारपेठ असं चित्र अवतीभोवती आहे. एका फोनमध्ये घडय़ाळ, स्टॉपवॉच, नकाशे, खेळ, बँक, विमा, गुंतवणूक, प्रवास, डायरी, नोटबुक, नातेवाईक, मित्न आणि हो फोटो/सेल्फी, व्हिडीओ, यूटय़ूब आणि असंख्य अ‍ॅप्स उत्पादनांचा एक बाजारच. यातून वेळ उरलाच तर मग फोन म्हणून त्याचा उपयोग. शिवाय एक फोन वापरणं सुरक्षित नाही म्हणून खेळायला एक आणि आर्थिक व्यवहारांना दुसरा आणि कामावरून मिळालेला तिसरा असा सगळा पसारा आहे. अशा सगळ्या परिस्थितीत, या जादुई दुनियेत आपल्या वैयक्तिक माहितीचा केवढा मोठा खजिना कुणाच्या हातात पडतोय याची सामान्य ग्राहकांना 1 टक्का तरी कल्पना आहे का? ज्यावेळी एखादा तज्ज्ञ असे म्हणतो की कोणत्याही नेटकराची विशिष्ट माहिती विशिष्ट डाटाबेसमधून 1/16 मिनिटात काढता येते आणि तिचा उपयोग त्याचे विचार परिवर्तन करण्यासाठीसुद्धा होऊ शकतो, त्यावेळी थक्क व्हायला होतं. पण त्यातूनच कंझ्युमर्स इंटरनॅशनलसारख्या, ग्राहकहित रक्षणार्थ कार्यरत संस्थांच्या शिखर संस्थेला मागणी करायाची वेळ येते की ‘ग्राहकांना हवीत विश्वसनीय स्मार्ट उत्पादनं’( ट्रस्टेड स्मार्ट प्रोडक्ट्स)आज आपल्या लक्षातही येत नाही की आपले फोटो, कॉन्टॅक्ट, प्रवास, हॉटेलिंग, पासपोर्ट क्र मांक, आधार क्र मांक, बँक आणि इतर आर्थिक व्यवहार, क्रे डिट कार्ड आणि इतर कसली कसली जी माहिती आहे हे आपल्या लक्षातही येत नाही ती कुणाच्या तरी ताब्यात आहे. तिला पाय फुटणार नाहीत आणि ती वापरली जाणार नाही याची तर काहीच शाश्वती नाही. याशिवाय स्वार्थी हेतूने/ फसवणुकीच्या इराद्यानं किशोरवयीन तसेच तरुण नेटप्रेमींना जाळ्यात ओढणारे, नादी लावणारे सर्वदूर पसरलेले आहेतच. आणि त्यातच आर्थिक फसवणूक होण्यापासून ते अति खर्च करण्यार्पयतच्या आपत्ती ओढावण्याची शक्यता असतेच.आता पोलिसांचा सायबर क्र ाइम सेल स्थापित झाला असला, तरी आपण फसवले/लुबाडले गेलोय, समाजमाध्यमांवरील आपला तथाकथित मित्न/मैत्नीण आपला गैरफायदा घेतेय, हे सगळे कळायला तर हवे. तेही फटका बसायच्या अगोदर. त्यामुळे  समाजमाध्यमांवर झालेल्या ओळखीतून कोणतेही आर्थिक व्यवहार करू नका. कुणी भरीस पाडते म्हणून खरेदी वा विक्री करू नका.  समाजमाध्यम हे वरकरणी फुकट दिसत असलं तरी ग्राहक म्हणून आपण त्याची किंमत मोजत असतो हे लक्षात ठेवा.

 (लेखिका मुंबई ग्राहक पंचायत, शिक्षण विभागप्रमुख आहेत.)