शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
4
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
5
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
6
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
7
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
8
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
9
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
10
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
11
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
12
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
13
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
14
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
15
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
16
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
17
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
18
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
19
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
20
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर

बार्शी ते रिओ

By admin | Updated: June 23, 2016 16:44 IST

टेनिस कोर्टवरच नाही, कोर्टबाहेरचीही आव्हानं हिमतीनं परतवणाऱ्या आणि आता आॅलिम्पिक गाजवायला निघालेल्या एका मुलीची जिद्दी गोष्ट..

बार्शीसारख्या छोट्या गावातली मुलगी, आणि आॅलिम्पिक खेळणार.. तेही ग्लॅमरस, चॅम्पियन सानिया मिर्झाची पार्टनर म्हणून...- अनेकांचा या बातमीवरच विश्वास बसेना !लॉन टेनिससारखा महागडा, उंची खेळ आणि त्या खेळात अशी धडक मारणारी मुलगी मुंबई-पुण्यासारख्या मेट्रो सिटीतली नाही, तर बार्शीची आहे. कसं जमलं हे तिला? तिच्या पालकांना?- असे कुतूहलाचे आणि कौतुकाचे प्रश्न अनेकांना पडले ! आणि म्हणून मग प्रार्थनाच्या कुटुंबाची भेट घेण्यासाठी, त्यांच्याचकडून तिची गोष्ट समजून घेण्यासाठी थेट बार्शी गाठलं.तिच्या आईशी, बहिणीशी गप्पा झाल्याच, पण सध्या पॅरिसमध्ये असलेली प्रार्थना त्या गप्पांत आॅनलाइन, तर हैदराबादला असलेले तिचे वडील गुलाबराव ठोंबरे तिकडून लाइव्ह गप्पांत सहभागी झाले !आणि उलगडत गेली प्रार्थनाच्याच नाही, तर तिच्या आईबाबांच्याही जिद्दीची एक गोष्ट !बार्शीत पहिल्यांदा टेनिस कोर्टवर उतरलेली प्रार्थना आता रिओत खेळेल तो प्रवास तर या गप्पांनी उलगडलाच, पण तिच्या मेहनतीची आणि चिकाटीची काही उदाहरणंही समोर आली.ती १६ वर्षांची असताना तिच्या डाव्या हाताला दुखापत झाली होती. तब्बल सात महिने दुखापतीमुळे ती टेनिस कोर्टबाहेर होती. महाराष्ट्रातील नंबर १ हे तिचं रँॅकिंग गेलं. या दुखापतीमुळे तिचे पालक चिंतित झाले. पण चिंताबिंता करत न बसता अत्यंत जिद्दीनं या दुखापतीवर मात करत प्रार्थना पुन्हा कोर्टवर उतरली, आणि जी जिंकू लागली ती आता थेट रिओत आॅलिम्पिक गाजवायला सज्ज होईपर्यंत..पण सोपा नव्हताच हा प्रवास तिच्यासाठीही..अगदी प्रार्थना राष्ट्रीय पातळीवर खेळत असताना तिनं पुण्या-मुंबईच्या खेळाडूंचा धसकाच घेतला होता. त्यांच्याबरोबर सामना असला की तिच्या पोटात तरी दुखायचं अथवा निराश तरी व्हायची. तो धसका आई-वडिलांसोबतच्या युरोप सहलीने पिटाळून लावला. लंडनमधील एका हॉटेलमधील टेनिस कोर्टवर आईनं तिला तिथल्या ब्रिटिश खेळाडूंबरोबर खेळायला लावलं. त्या सर्वांनाच तिनं हरवलं. तिची आई तिला म्हणाली, ‘तू परदेशातल्या खेळाडूंना हरवतेस, मग पुण्या-मुंबईची काय बात !’ तिथून पुढं तिनं कुणाचाच धसका घेतला नाही.अशा किती गोष्टी, किती कहाण्यात्या गप्पांच्ची एक मैफल पान ३ वर..प्रार्थना- राजा माने