शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
धक्कादायक! न्यायाधीशांनाच दिली जीवे मारण्याची धमकी, म्हणाला, जिवंत राहायचे असेल तर ५०० कोटी घेऊन जंगलात या
3
Video: अवैध कामावर कारवाई करणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्यालाच उपमुख्यमंत्री अजित पवारांनी खडसावलं
4
२० हजार किमी रेंज, संपूर्ण जग टप्प्यात, पृथ्वीबाहेरही हल्ला करण्यास सक्षम, चीननं बनवलं घातक हत्यार
5
Amit Mishra Retirement : लेट निवृत्तीसह IPL हॅटट्रिक किंगनं क्रिकेटच्या देवालाही टाकलं मागे
6
“महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर, देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठे योगदान”: DCM एकनाथ शिंदे
7
जगभ्रमंतीवर निघालेल्या योगेश आळेकरी यांची दुचाकी चोरीला, UK मधील नॉटिंगहॅम शहरातील घटना
8
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
9
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
10
VIDEO: पुतिन यांच्या भेटीनंतर किम जोंगच्या कर्मचाऱ्यांनी सर्व DNA पुरावे अन् बोटांचे ठसे पुसून टाकले
11
मृत्यू पंचकात खग्रास चंद्रग्रहण २०२५: सूतक काल कधी? काय करावे अन् काय करू नये; पाहा, नियम
12
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
13
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
14
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
15
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
16
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
17
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
18
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
19
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
20
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...

बँक मॅनेजर व्हाया इंडियन नेव्ही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 03:00 IST

इंडियन नेव्हीत निवड झाली आणि तिथंच माझ्या जगण्यानं एक नवं वळण घेतलं..

- चंद्रकांत मोरेवर्धनगड हे ऐतिहासिक वारसा लाभलेलं माझं सातारा जिल्ह्यातील छोटंसं खेडेगाव. आमच्या घरापासून ३-४ किमी अंतरावर असणाऱ्या प्राथमिक शाळेनं माझा शैक्षणिक पाया मजबूत केलाच पण रोजच्या पायी प्रवासानं शारीरिक जडणघडणही चांगली होत गेली. इथे पाचवीपर्यंतचं शिक्षण घेताना इतर वेळांत घरगुती कामं, गायी, बैल, शेळ्या, कोंबड्या सांभाळणं आणि शेतामधील कामात मदत करणं सुरूच होतं. या गोष्टींमुळे गावाशी आणि मातीशी एकदम घट्ट नाळ जुळली.सहावीसाठी पहिल्यांदा घराबाहेर पडलो ते थेट मिस क्लार्क होस्टेल, कोल्हापूरला पोहोचलो. देशभूषण हायस्कूल, कोल्हापूर येथे शिकत असताना अभ्यासाव्यतिरिक्त स्वावलंबनाचे धडेही गिरवले. पैसे, कपडे आणि इतर वस्तूंच्या कमतरतेबरोबरच प्रसंगी उपवासही घडायचा. अशा परिस्थितीतही स्वत:ला सावरायला शिकलो.आठवीला सरस्वती विद्यालय, कोेरेगाव इथं प्रवेश घेतला आणि शासकीय मुलांचे वसतिगृह कोरेगाव हे आमचं दुसरं घर बनलं. एव्हाना, घरापासून दूर राहण्याची सवय आणि वसतिगृहात राहण्याचा अनुभव असल्यानं इथंही सहज रमून गेलो. इथल्या पाच वर्षांच्या प्रवासात अभ्यासापेक्षा खेळ आणि इतर अवांतर गोष्टीत बराच सहभाग होता. त्यामुळे मैत्रीसंबंध आणि सामाजिक बंध दृढ होत गेले.बारावीच्या वार्षिक परीक्षेला अभ्यासाची अपेक्षित तयारी न झाल्यामुळे पुन्हा सर्व विषय घेऊन बारावीला प्रवेश घेण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय स्वत:च घेतला आणि गणिताचा पेपर सोडला. याचा परिणाम म्हणजे, पहिलीपासून नेहमी अव्वल असणारा मी बारावी नापासचा निकाल घेऊन घरी पोहोचलो. हे सर्वांनाच अनपेक्षित होते. माझ्या डोक्यात तर अक्षरश: कल्लोळ माजला होता. एकदोन महिन्यांत रेडिओवर जाहिरात ऐकून वडिलांच्या आग्रहाखातर मी इंडियन नेव्ही ट्रेनिंग भरतीसाठी गेलो. माझी अंतिम निवडही झाली. हे माझ्या आयुष्यातील महत्त्वाचं वळण ठरलं.ओरिसाला इंडियन नेव्हीचं प्रशिक्षण घेताना माझ्या मार्गात सात वर्षांच्या स्वावलंबी प्रवासाचा फार उपयोग झाला. संपूर्ण भारतभरातून आलेल्या सर्व प्रकारच्या प्रशिक्षणार्थींबरोबर सहज मैत्री झाली. अतिशय खडतर प्रशिक्षणातही यश मिळाल्याचा आनंद वाटत होता.प्रशिक्षणानंतर विशाखापट्टणमच्या पहिल्या पोस्टिंगने मला खºया अर्थानं खेळाडू बनवलं. बास्केटबॉल, व्हॉलिबॉल, अ‍ॅथलेटिक्स असे सर्व खेळ शिकून त्यात प्रावीण्य मिळवलं. आॅल इंडिया नेव्ही चॅम्पियनशिपपर्यंत मजल मारली. २००७ मध्ये अतिशय अवघड असा ड्रायव्हिंगचा कोर्स पूर्ण केला आणि इथून पुढे मला खºया अर्थाने माझ्या क्षमतांची प्रचिती यायला लागली. पुढच्या काही काळात सेलिंग इन्स्ट्रक्टर म्हणून काम करायची संधीही मिळाली.हे सर्व चालू असतानाच अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करावं असं वाटू लागलं. संधी मिळाली आणि एक्स्टर्नल, बीए-एमबीएही पूर्ण केलं. यूजीसी-नेटची परीक्षाही दुसºया प्रयत्नात यशस्वी झालो.आता यापेक्षा मोठं व्यासपीठ मला खुणावत होतं की काय म्हणून आयबीपीएसमधून बँक अधिकारी झालो. आणि माझ्या जीवनप्रवासाला दुसरं वळण मिळालं. आज मागे वळून पाहताना आयुष्यातील काही महत्त्वाचे टप्पे आणि माझी जडणघडण स्पष्टपणे जाणवते. वर्धनगडच्या पहिल्या दहा वर्षांच्या काळात मातीशी आणि गावाशी घट्टपणे नाळ जुळलेली होती. कोल्हापूर येथे दोन वर्षांच्या प्रवासात स्वावलंबन आणि सामंजस्य शिकलो. कोरेगाव येथे पाच वर्षांत मैत्री आणि सामाजिकतेचे भान वाढत गेलं. इंडियन नेव्हीमध्ये पंधरा वर्षांच्या काळात खºया अर्थाने माझ्या क्षमतांचा विकास होत गेला. आणि बँक अधिकारी म्हणून मागील तीन वर्षांत माझा आत्मविश्वास दृढ होत गेला.वयाच्या अकराव्या वर्षी ‘वन वे तिकीट’ काढून गाव सोडलंय, अजून प्रवास चालूच आहे. पुढचं स्टेशन माहीत नाही आणि अंतिम स्टेशनची कल्पना नाही. ज्या समाजानं आपल्याला घडवलं आपण त्या समाजाचं काहीतरी देणं लागतो हा विचार आणि विश्वास सोबत घेऊन हा प्रवास सुरूच आहे...

(प्रबंधक- बँक ऑफ महाराष्ट्र, सातारा शहर शाखा)