शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत 'शटडाऊन'चं संकट, सरकारी कामकाज बंद; ६० मतांची होती गरज, ट्रम्प यांना मिळाली ५५ मते
2
LPG Price 1 October: एलपीजी सिलिंडर महागला, दसऱ्यापूर्वी मोठा झटका; दिल्ली ते मुंबईपर्यंत इतकी वाढली किंमत
3
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
4
फिलीपिन्समध्ये भूकंपाचा धक्का, २२ जणांचा मृत्यू; अनेक इमारती कोसळल्या
5
चिनी इन्फ्लूएन्सरनं केलं 'फॉलोअर'शी लग्न! व्हायरल होतेय त्यांची प्रेमकहाणी
6
सोनम वांगचुक यांच्या अडचणी वाढणार! प्रशासनाने सांगितले, त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी पुरेसे पुरावे
7
राशीभविष्य १ ऑक्टोबर २०२५: 'या' राशीतील लोकांना आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता
8
दळवी, तटकरेंमध्ये शाब्दिक 'वॉर' सुरूच! पालकमंत्रिपदावरील वाद दिवसेंदिवस शिगेला
9
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
10
दिवाळीपूर्वी उद्योजक, व्यापाऱ्यांवर अतिरिक्त वीजदराचा बोजा, ९.९० पैसे प्रतियुनिटने वाढ
11
गोदाकाठी १६ गावांना अजूनही पुराचा वेढा, मराठवाड्यात ९१० डीपी, ९ हजार खांब पाण्यात
12
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
13
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
14
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
15
चार लाख जणांना रोजगार; ५० हजार कोटींची गुंतवणूक! राज्य मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय
16
हत्ती आणि हरीण; पूरग्रस्तांना फक्त आर्थिक नव्हे, मानसिक आधाराची गरज!
17
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
18
राहुल गांधी यांचे 'नागरिकत्व' आणि 'ईडी'; या एन्ट्रीमुळे प्रकरणाला अनपेक्षित वळण
19
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
20
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा

बाजे रे.. ढोल बाजे..

By admin | Updated: September 30, 2016 10:43 IST

उद्यापासून नवरात्र. अक्षय उमेद आणि नवं घडवण्याची आस यांचा ताल धरता येईल आपल्यालाही आपल्या जगण्यात?

- ऑक्सीजन टीमसाऱ्या तक्रारी, सारं नैराश्य आणि त्या नैराश्यातले काळसर तवंग मनातून पुसून काढावेत, उमेदीचं बीज घटात घालून ते फुलू द्यावं, वाढू द्यावं.. म्हणून करायची शक्तीची उपासना..सृजनाची आराधना.. उद्यापासून त्या आराधनेला प्रारंभ होणार..आपल्या मनघटात आनंदाचं बी आपणच पेरावं..आशेचा अखंड दीप उजळवावा..आणि ती उमेद, तो आनंद वाढीस लावूनआपल्या भोवती आपणच बांधलेल्या सीमा ओलांडाव्यात..पराक्रमाचे उत्तुंग सीमोल्लंघन करत‘विजयाचं’ तोरण लावावं आयुष्याला..म्हणून तर येतात दरवर्षी हे नऊ दिवस आपल्याला भेटायला..**उद्या.. तोच दिवस.नवरात्राचा प्रारंभ.उद्यापासून नऊ दिवस घरोघर शक्तीची उपासना होईल..सर्वत्र गरबा-दांडियाच्या उत्साहाला उधाण येईल..ज्यांना शक्य ते नऊ रात्रीगरब्यावर अखंड थिरकतील..ताल धरतील..नाचतील भान हरपून..गरब्याच्या गिरक्यांवर असे काही आनंदानं भरभरून जगतील की,जशी काही परत येणारच नाहीये ही रात्र...आपलं शिक्षण, आपली नोकरी, आपली सामाजिक प्रतिष्ठा आणि मनावर चढवलेली जबाबदारीची पुटं उतरवून ठेवतील काही काळ..आणि साऱ्यांच्या तालाशी ताल जुळवत,नाचताना स्वत:लाही विसरत जातील..आनंदानं बेभान नाचण्याचे आणिजगण्याच्या रंगात रंगून जाण्याचे हे दिवस..या नऊ दिवसातला प्रत्येक दिवसअनेकजण वेगवेगळ्या प्रकारे जगतात..कुणी श्रद्धा म्हणून, तर कुणी आनंद म्हणून साजरा करतात..जगून घेतात.. काही मोकळे श्वास..***कुणी डाएट करतं.. कुणी पूर्णत: शाकाहार स्वीकारतं..कुणी कुणी तर आताशाव्हॉट्स-फेसबुक बंद करण्याचा आधुनिक उपवासही करतं..कुणी बिना चप्पल चालतं..कुणी वाहन उपवास करतं..आणि कुणी कुणी तर नऊही दिवस दांडियाला जायचंचम्हणून घरी भांडणही करतं..जगण्याचे असे अनेक रंग दाखवणारे हे नऊ-रात्र..त्यांचा उद्यापासून प्रारंभ..जगण्यात उमेदीचा दिवा अक्षय उजळता राहोआणि आपल्याच सीमा ओलांडून आपणनवं काहीतरी घडवण्याचं सीमोल्लंघन करावं..म्हणून अनेक शुभेच्छा!