शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

७०,००० ऑलिम्पिक स्वयंसेवकांची फौज

By admin | Updated: August 4, 2016 17:05 IST

सर्वोत्तम जागतिक गुणवत्तेचा आणि खेळाचा ध्यास असलेल्या वेड्या माणसांच्या एका जगावेगळ्या हौशीची गोष्ट.

मयूर देवकर
(मयूर लोकमतच्या मराठवाडा आवृत्तीत उपसंपादक/वार्ताहर आहे.)
 
आपले स्वत:चे पैसे खर्च करून रात्रंदिवस फुकट काम करायला जगभरातून माणसं व्हॉलेण्टिअर्स म्हणून का जातात ऑलिम्पिकसाठी?
 
जगातील सर्वात मोठी ‘क्रीडा स्पर्धा’ ऑलिम्पिक गेम्सचा भाग होणं कोणाला आवडणार नाही. सर्वच जण सर्वोत्कृष्ट खेळाडू तर होऊ शकत नाही हे जरी खरं असलं तरी याचा अर्थ असा नाही की, आपण ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही. 
आपण खेळाडू नसलो तरी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होता येतं. 
‘व्हॉलेण्टिअर’ म्हणजेच स्वयंसेवक.
हे स्वयंसेवक आॅलिम्पिक स्पर्धांचा महत्त्वाचा भाग असतात.
यंदा दोनशेपेक्षा जास्त देशांतील दहा हजारांपेक्षा जास्त खेळाडू रिओ ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहेत. स्पर्धा सुरळीत, सुरक्षित आणि सुखदायक होण्यासाठी आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने जगभरातून ७० हजार स्वयंसेवकांची निवड केली. मात्र १९२ देशांतून २.४ लाख लोकांनी स्वयंसेवक होण्यासाठी अर्ज केले होते. स्पर्धेचा असा भव्यदिव्य आवाका पाहता स्वयंसेवकांच्या भूमिकेला किती महत्त्व आहे याची आपल्याला कल्पना येते.
ऑलिम्पिक स्पर्धेत ‘स्वयंसेवक’ ही कल्पना जरी सत्तर-ऐंशीच्या दशकात रुजण्यास सुरुवात झाली असली तरी त्यांचा सहभाग थेट पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक खेळांपासून असल्याचे दिसतं. विसाव्या शतकाच्या सुरुवातील अनेक क्रीडा स्पर्धांच्या आयोजनांमध्ये स्वयंसेवकांचा सहभाग केला जाऊ लागला. तेव्हा त्याला अधिकृत स्वरूप जरी प्राप्त झालेले नव्हतं; पण तेव्हाही त्यांचं महत्त्व सारे मान्य करत. 
स्टॉकहोम आॅलिम्पिकमध्ये (१९१२) सर्वप्रथम ‘बॉय स्काउट’चा सहभाग आढळून येतो. संदेश-सूचना पोहोचवणं, आयोजनात मदत करणं, प्रेक्षक-खेळांडूना मदत करणं, झेंडा उंचावणं, मैदानं-रस्त्यांवरील अडथळे दूर करणं अशी कामं बॉय स्काउटमधील तरुण मुले करत असत. स्टॉकहोम ऑलिम्पिक च्या रिपोर्टमध्ये त्यांची प्रशंसा करण्यात आली होती. आधुनिक ऑलिम्पिकचा संस्थापक पिएरे डी कुबर्टिन यांनीसुद्धा आपल्या चरित्रात बॉय स्काउटच्या योगदानाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत. पुढे हेलसिंकी आॅलिम्पिकमध्ये (१९५२) महिला स्वयंसेवकांनी प्रथमच सहभाग घेतला.
सैनिक आणि ऑलिम्पिक खेळांचे नाते सुरुवातीपासूनच राहिले आहे. स्पर्धेच्या आयोजनात सैनिक नेहमीच सहभागी राहिले आहेत. आज जी कामं स्वयंसेवक करतात त्या बहुतांश जबाबदाऱ्या साठच्या दशकांत सैनिक निभावत असत. ग्रेनोबल विंटर गेम्समधील (१९६८) त्यांच्या योगदानाचे विशेष कौतुक झाले. मैदानं तयार करण्यापासून ते खेळाडूंच्या साहित्याची ने-आण, हेलिकॉप्टर सेवा, वाहतूक व्यवस्थापन अशी सर्वच कामं सैनिकांनी पार पाडली. परंतु म्युनिच आॅलिम्पिकनंतर (१९७२) मात्र सैनिकांवर मुख्यत्वे सुरक्षेची जबाबदारी देण्यास सुरुवात झाली. आजही आयोजनात त्यांचा थोडाबहुत सहभाग असतो मात्र त्यांचं योगदान सरकारी मदत म्हणूनच गृहीत धरण्यात येतं.
 
स्वयंसेवक नेमकं करतात काय?
एवढ्या भव्य स्वरूपाची स्पर्धा सुरळीत, निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी हजारो स्वयंसेवक अहोरात्र काम करत असतात. खेळाडंूना स्पर्धेच्या ठिकाणांची माहिती देणं, त्यांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करणं, संदेश-सूचना पोहोचवणं, वाहतूकव्यवस्थापन, पार्किंग, खेळांचे साहित्य आणि सामान ने-आण क रणं, विविध स्पर्धांना पदक पुरवणं, पत्रकारांना माहिती देणं, स्पर्धाधिकाऱ्यांना मदत करणं अशी नानाप्रकारची कामं स्वयंसेवक तन्मयतेनं करतात. कार्यक्षेत्रानुसार त्यांना इतर विशिष्ट जबाबदाऱ्यादेखील देण्यात येतात. जसं की, वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रथमोपचार, कॉम्प्युटर क्षेत्रातील लोकांना तांत्रिक कामं, क्रीडा क्षेत्रातील स्वयंसेवकांना खेळाडंूचं व्यवस्थापन, विविध भाषांत पारंगत व्यक्तींना दुभाषकाची कामगिरी अशी कामं नेमून देण्यात येतात. पूर्वी मात्र केवळ प्राथमिक स्वरूपाच्या जबाबदाऱ्या स्वयंसेवक पार पाडत असत. दुसऱ्या महायुद्धानंतर स्वयंसेवकांचं योगदान वाढलं, त्यांच्या जबाबदाऱ्यादेखील वाढल्या. ओस्लो ऑलिम्पिक स्वयंसेवकांना प्रथमच तिकीट तपासणं, गोळा करणं, जमाव देखरेख आणि तांत्रिक कामं देण्यात आली. स्पर्धेआधी, दरम्यान आणि नंतरही स्वयंसेवकांचे कार्य सुरूच राहतं. स्पर्धेच्या ठिकाणांची, शहराची स्वच्छता हे सर्वात मोठं काम असतं. 
 
स्वयंसेवकांना प्रशिक्षण
आयोजन, नियंत्रण, कोणते काम कसे करायचं त्याची प्रमाण पद्धत काय याविषयी व्हॉलेण्टिअर्सना ट्रेनिंग दिलं जातं. ऐंशीच्या दशकानंतर स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याचं महत्त्व समोर येऊ लागलं. परंतु त्याआधीदेखील काही प्रमाणात ते दिलं जात असे. हेलसिंकी स्पर्धेत सर्वप्रथम प्रशिक्षण देण्यात आलं. त्यानंतर चार वर्षांनी मेलबर्न आॅलिम्पिकमध्ये सुमारे ३.५ हजार बॉय स्काउट्सना स्वयंसेवेचे योग्य सोपस्कार शिकवण्यात आले. अलीकडच्या काळात स्वयंसेवकांची संख्या कित्येक हजारांवर पोहोचली आहे. म्हणून पुरेसे प्रभावी प्रशिक्षण देणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे आता आॅलिम्पिक स्पर्धेच्या कित्येक महिन्यांआधीच स्वयंसेवकांची निवड करून त्यांना वेळेत प्रशिक्षित केले जाते.
 
व्हॉलेण्टिअर बूम
सन १९९२नंतर ‘व्हॉलेण्टिअर बूम’ उदयास आली. स्पर्धेला यशस्वी करण्यामध्ये स्वयंसेवकांची मदत घेणं अनिवार्य असून, स्पर्धेचा तो अविभाज्य भाग आहे ही संकल्पना मूळ धरू लागली. कोणत्याही आर्थिक मोबदल्याशिवाय आणि केवळ खेळांप्रति असलेल्या प्रेमापोटी जगभरातून स्वयंसेवक आॅलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचं स्वप्न पाहू लागले. टीव्ही आणि इंटरनेटची वाढ हेदेखील यामागचं कारण सांगता येईल. माध्यमांच्या प्रगतीबरोबरच आॅलिम्पिकच्या स्वरूपालादेखील नवे आयाम प्राप्त झाले. विशेष म्हणजे त्याला ग्लॅमर प्राप्त झाले. देशभक्ती आणि ग्लॅमर असे अद्भुत कॉम्बिनेशन या स्पर्धेला मिळाले. त्यामुळे लाखो लोक स्वत:हून स्वयंसेवक होण्यासाठी हिरिरीने पुढाकार घेऊ लागले. हे या स्पर्धेच्या यशाचे द्योतक आहे, असे म्हणायला काही हरकत नसावी.
 
केवळ पॅशन; पैसा नाही!
सुमोर दोन आठवडे, दिवस-रात्र थकून टाकणारे काम आॅलिम्पिक व्हॉलेण्टिअरला करावे लागते. जगभरातून येणारे प्रेक्षक, खेळाडू, पर्यटक, पोलीस, पत्रकार यांना मैदाने, रेल्वे स्टेशन, रस्त्यांबाबत मार्गदर्शन आणि मदत करण्याची महत्त्वाची जबाबदारी या स्वयंसेवकांवर असते. हे सर्व करताना तहान-भूक विसरूनच जावी लागते. भल्या पहाटे उठून मध्यरात्रीपर्यंत काम असा स्वयंसेवकांचा स्पर्धेच्या काळात दिनक्रम असतो. बरं एवढं सगळं कशासाठी करायचं? तर केवळ पॅशन म्हणून!! कारण आॅलिम्पिक स्वयंसेवकांना कुठल्याही प्रकारचे वेतन, मानधन नसते. ते केवळ स्पर्धेप्रति असलेल्या श्रद्धेपोटी समर्पक भावनेने पे्ररित होऊन इमाने इतबारे व्हॉलेण्टिअरिंग करत असतात. 
बार्सिलोना आॅलिम्पिक गेम्सच्या (१९९२) आॅफिशियल रिपोर्टमध्ये प्रथमच आॅलिम्पिक स्वयंसेवकाची व्याख्या करण्यात आली. त्यानुसार आॅलिम्पिक स्वयंसेवक म्हणजे अशी व्यक्ती जी पूर्ण स्वेच्छेने आणि नि:स्वार्थपणे आॅलिम्पिक खेळांचे आयोजन करणाऱ्या संघटनेने नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या कुठल्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता पार पाडते. 
मिळेल तेथे अन् मिळेल तेवढी झोप घ्यायची आणि स्पर्धा यशस्वी करण्यासाठी झटायचे पॅशन ठेवूनच हजारो स्वयंसेवक आॅलिम्पिक स्पर्धेत कार्यरत असतात आणि तेच आॅलिम्पिक संघटनेला अपेक्षित आहे. 
 
पण ही ऊर्मी येते कुठून?
आजच्या भौतिक सुखात लोळण्याच्या जगात चैनीच्या वस्तूंच्या कुबड्यांशिवाय जगणं असह्य आणि अशक्य वाटतं. मग कशाला वेडेपणा करत जायचं देश-विदेशात आणि ‘हमाल्या’ करायच्या. कोणी सांगितला हा शहाणपणा (किंवा मूर्खपणा)? असा विचार मनात येणं साहजिक आहे. पण आयुष्यात पैसा म्हणजे सगळे काही नसतं हे वाक्य कितीही ‘क्लिश’ वाटत असले तरी खरं आहे. जर एखादी गोष्ट खरंच जागतिक, ग्लोबल असेल तर ती म्हणजे आॅलिम्पिक स्पर्धा. संपूर्ण जगाला खेळाच्या माध्यमातून एकत्र आणणाऱ्या या सर्वोत्तम गुणवत्तेच्या स्पर्धेचा आपण भाग व्हावं, अशी सद्भावना, प्रेरणा जेव्हा मनात आणि डोक्यात ठिणगी पाडते तेव्हा ‘मला काय मिळणार’ याऐवजी ‘मला काय करता येईल’ असं स्वत:ला विचारलं जातं. एका ऐतिहासिक घटनेचा केवळ साक्षीदारच नाही तर तो घडवून आणण्याची झिंगच या स्वयंसेवकांना ड्राईव्ह करते. कारण आपल्यापैकी फार कमी लोकांना इतिहास घडविण्याची संधी मिळते. अशी सुवर्णसंधी दर चार वर्षांनी आॅलिम्पिक स्पर्धेच्या रूपाने उपलब्ध होत असते. मग ती कॅश करण्याचा ‘चान्स’ का म्हणून सोडायचा?
आणि तसंही आॅलिम्पिकसारख्या स्पर्धेत सहभागी होण्याचा अनुभव भविष्यात करिअरसाठी खूप कामी येतो. आंतरराष्ट्रीय सोहळ्यात काम करताना अनेक नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात, सांस्कृतिक देवाणघेवाण होते, वैचारिक प्रगल्भता आणि दृष्टिकोण विस्तारतो. ‘ग्लोबलायझेशन’च्या युगात यासारखी प्लस पॉइंट असलेली दुसरी गोष्ट नाही.