शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

आठ बजेतक आप हो सोते?

By admin | Updated: April 26, 2017 17:48 IST

लवकर उठत नसाल तर तुम्ही कधीच यशस्वी होणार नाही!

 

-ऑक्सिजन टीम
 
 
 
‘ आठ बजेतक जो सोते, बडे कहॉँ लोग ऐसे होते?’ असा सवाल हम साथ साथ साथ है नावाच्या सिनेमात करिश्मानं जगजाहीर विचारला होता सैफअलीला, आठवतंय?
एवढंच काय महाराष्ट्रातल्या एका जेष्ठ  राजकीय नेत्यानं एका वयानं लहान असलेल्या नेत्यालाही जरा सकाळी लवकर उठत जा असा सल्ला दिला होता. 
हे सारं महत्वाचं यासाठी की लवकर उठण्याची भारतीय फिलॉसॉफी आता जगभरातल्या कार्पोरेट वतरुळात स्वीकारली जात आहे.
यशस्वी उद्योगपतींच्या, नेत्यांच्या, अभिनेत्यांच्या उत्तम सवयी अशी यादी आजकाल वारंवार प्रसिद्ध होते. त्यात एक सवय हमखास दिसते.
लवकर उठण्याची.
जो तो सांगतो की, मी सूर्यदयापूर्वीच  उठतो आणि दिवसाचा काही वेळ स्वतर्‍साठी राखून ठेवतो. त्यानं माझ्या यशाला हातभार लागतो.
आता हे वाचून आपल्याला प्रश्न पडतो की, लवकर उठण्यानं हे लोक कसे काय बुवा यशस्वी आणि श्रीमंत झाले? सगळ्यांच्या आधी ऑफिसला जावून बसत होते का?
तर तसं नाही!
लवकर उठलं की ते काय काय करतात याची एक झलक पाहिली तरी आपण काय करत नाही हे कळू शकेल.
1) मी लवकर उठलोय, उशीर झालेला नाही ही भावना फार महत्वाची असते. ती लवकर उठण्यानं स्वतर्‍त जागी होते. नाहीतर आपण कायमच उशीरा उठतो, धावपळ करतो. आपल्याला कायमच उशीर होतो आणि मग आपलं एकही काम धड होत नाही. त्यासाठी लवकर उठायचं.
2) व्यायाम आणि फुरसत
मनासारखं काम करायला, व्यायाम करायला, 5 मिनिटं शांत बसायला आपल्याकडे फुरसतच नसते. त्यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर त्याचा वाईट परिणाम होतो. पंतप्रधान मोदी जर पहाटे उठून व्यायाम करण्याइतपत वेळ काढू शकत असतील तर आपण काय त्यांच्यापेक्षा जास्त बिझी नाही.
3) दिवसाचा मूड ठरतो
होतं काय उशीर झाला की आपली चिडचिड होते. त्यात खाणंपिणं धड होत नाही. मग आपला मूड जातो. एक काम त्यानं धड होत नाही. मग आपण चिडतो. भांडतो. इतरांशी खुसपट काढतो. सगळंच बिघडतं. आणि मग यश मिळण्याची शक्यता संपतच जाते. लवकर उठलो, वेळ हातात असला तर आपला मूड चांगला राहतो.
 
4) ट्राफिकची कटकट
मुद्दा छोटा वाटतो. पण हमखास आपल्याला त्रास देतो. आपण वेळेवर उठल्यानं आपण लवकर निघतो घरातून आणि मग आपण ट्राफिकमध्ये अडकत नाही. त्यामुळे पुढे उशीर होवून आपली महत्वाची कामं बिनसत नाही. आपण कायम लेटलतीफ म्हणून आपल्याला यश मिळत नाही हा स्वतर्‍वरचा रागही कमी होतो.
 
5)असे फायदे बरेच आहेत, पण त्यासाठी लवकर उठावं लागेल. यशस्वी माणसांच्या सवयीतून एक सवय एवढी आपण स्वीकारली तर काय सांगावं आपणही यशस्वी होवू.