शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

मोबाइलवर टुकटुक गप्पा पण प्रत्यक्षात तोंडातून शब्दच फुटत नाही, असं होतंय तुमचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 08:00 IST

मोबाइल अ‍ॅडिक्शन नोमोबाइलफोबिया अर्थात नोमोफोबिया हा शब्द आता नवीन नाही. मात्र व्यसनामुळे होणारी गुन्हेगारी कृत्यं, अपघात आणि अडनिडय़ा वयात हरवणारा मानसिक तोल हे सारं आता मोठय़ा शहरांतून खेडय़ापाडय़ांतही पाझरलं आहे, त्या नोमोफोबिक वास्तवाची ही झलक.

ठळक मुद्देफोनवर बोलणं पण नको झालंय? जिवाभावाची माणसं नको वाटतात, स्क्रीनवरचं जग खरं वाटतंय? मग सांभाळा, तुम्ही ‘आजारी’ आहात.

- प्रगती जाधव-पाटील

 चार टाळकी तासन्तास शेजारी बसतील, पण एकमेकांशी एक अक्षर बोलत नाहीत.हे चित्र आता तसं आम झालेलं आहे.अलीकडे आशा भोसलेंनी असाच एक फोटो ट्विट केला, त्यांच्या आसपासचे सगळे लोक फोनमध्ये डोकं खुपसून बसलेत आणि बोलायला कुणीही नाही.हे आहे ‘आजचं’ वास्तव. आणि ते फक्त हायफाय क्लास आणि मेट्रो शहरांपुरतं उरलेलं नाही तर ते छोटय़ा शहरात, ग्रामीण भागातही पाझरत चाललं आहे. मोबाइलचं व्यसन इतकं विकोपाला जायला लागलं आहे की त्यातून तरुण मुलांना मानसिक आजारांनी घेरायला सुरुवात केली आहे.हे सारं वाचतानाही तुमच्या मनात आलंच असेल की ,यातही आता नवीन असं काही उरलेलं नाही. घरोघरी स्मार्टफोन, त्यावरची टुकटुक, खाली मान घालून बसलेली माणसं यात नवीन काय सांगता.मात्र सातारमध्ये भेटले असे काही तरुण मोबाइल अ‍ॅडिक्ट की त्यांच्या कहाण्या ऐकून हताश वाटावं की हतबल हेच क्षणभर कळत नव्हतं.सातारच्या एका मानसोपचार केंद्रात संतोष भेटला. मोबाइलवर अ‍ॅडिक्शनच्या काउन्सिलिंगसाठी तो तिथं आलेला होता. संतोष अभ्यासात अगदी अव्वल! सोशल मीडियावरील त्याच्या पोस्टही पुरेशा बोलक्या, प्रत्येक पोस्टला रिप्लाय करणारा, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवरही एकदम अ‍ॅक्टिव्ह; पण नोकरीच्या ठिकाणी मुलाखतीसाठी गेला की त्याच्या डोक्यातून शब्दच गायब व्हायचे. तोंडातून शब्द फुटायचा नाही. समोरच्याच्या नजरेत बघून उत्तरच देता यायचं नाही. असं बरेच दिवस चाललं, सहा-आठ महिने तो बेरोजगारच होता. मुलाखत म्हटलं की सगळं बिघडायचं, टाइप करून बोलायला सांगा की संतोष पुढे. त्यानं पालकांच्या मदतीनं वैद्यकीय सल्ला घेतला. मोबाइल अ‍ॅडिक्शनवर उपचार करायचे आणि प्रत्यक्ष बोलायची सवय करायची असं स्वतर्‍ला बजावत त्यानं सुमारे चार महिने उपचार घेतले.आता संतोष एका आंतरराष्ट्रीय कंपनीत उत्तम काम करतोय. कार्यालयीन कामकाजासाठी गरजेची असलेली आधुनिक यंत्नणा वापरतो. मात्र तो सांगतो, कामापुरती सगळी साधनं मी वापरतो; पण फोन फक्त बोलण्यासाठी, करमणुकीसाठी वाचन आणि भटकंती. मोबाइल मी माझ्या आयुष्यातून लांब केलाय, आता स्थळं पाहतोय तर जोडीदारही मोबाइलपासून लांब असलेली हवी असं मी सांगतोय.**यशराज. जेमतेम शाळकरी वयातला. आठवीतच त्याच्या हातात अ‍ॅण्ड्रॉइड फोन आला. मात्र त्या अडनिडय़ा वयात हातात मोबाइल, त्यावरचे अ‍ॅप आणि पोर्न असं सारं आलं. यशराज बहकला. आता गेल्या एक वर्षापासून तो मानसिक उपचार घेत आहे. यशराज सांगतो, ‘स्वतर्‍ला खोलीत कोंडून मी अनेक पॉर्न व्हिडीओ पाहिले. त्या व्हिडीओची त्याला इतकी चटक लागली की शाळा, अभ्यास, मित्न, कुटुंब यातलं काहीच आवडत नव्हतं. क्लास बुडवून, शाळेला दांडय़ा मारून मी निव्वळ तेच बघत असे.’परिणाम व्हायचा तोच झाला. यशराज नववीत नापास झाला. आठवीत चांगले मार्क पाडले म्हणून पालकांनी मोबाइल बक्षीस दिला आणि मुलगा नववीत नापास झाला. मार्ग काढण्यासाठी ते मानसोपचारतज्ज्ञांकडे गेले. तिथं त्यानं जे काही सांगितलं भयंकर होतं. तो सांगतो, ‘मला कोणतीही स्त्नी त्याच नजरेतून दिसते. सारखी नजर तिच्या शरीरावर. मला कळायचं की आपण चुकतोय; पण ते पाहिल्याशिवाय मला चैनच पडत नव्हतं. खूप बेचैन झालं की मी हातात मोबाइल घेऊन पोर्न पाहायचो.’यशराजने मनाची तयारी केली आणि  आता गेल्या वर्षापासून उपचार सुरू आहेत. ज्या ज्या वेळी त्याला तसं काही बघायची इच्छा होते, त्या त्यावेळी तो स्वतर्‍ला अन्य कामात व्यस्त ठेवतोय. यातच तो ओरिगामी कला शिकला. यशराज म्हणतो, माझ्या मेंदूतील केमिकल लोचा आता दुरुस्त झाला आहे, त्यानं बरं वाटतं. मात्र हातात मोबाइल आला की आपण व्यसनाकडे एक पाऊल सरकतोय असं मी आता माझ्या मित्रांनाही सांगतो. त्यापासून वाचलं पाहिजेच.’ ***सध्या तरुणांमध्ये अजून एक भयानक नाद आहे. त्याचं नाव आहे, ‘इल्युमनाटी’. अतिशय उत्तमरीत्या खोटय़ाचं खरं करून सांगण्याची आणि पुराव्यादाखल एडीट केलेले व्हिडीओ तरुणाईला एलियन्सच्या विश्वात नेऊ पाहत आहेत. विशेष म्हणजे कोणतंही लॉजिक न लावता, केवळ व्हिडीओच्या आवाजावर विश्वास ठेवून आपल्यावर हल्ला होणार आणि  हे विश्व नष्ट होणार, या भीतीने घाबरलेले आणि  भेदरलले तरुणही या सार्‍याचा भाग आहेत. त्यांना एलियन्सच्या यानाचे, त्यांच्या संवादाचे आणि आक्र मण करण्यासाठी आणलेल्या आधुनिक शस्त्नांचे भास होतात. कित्येकदा अख्खी रात्न जागून ही मुलं स्वतर्‍च्या कुटुंबाचे रक्षण करत असल्याचं अनेकांना सांगतात. या भ्रामक व्हिडीओमुळे डिप्रेशनमध्ये जाणार्‍या तरु णाईची संख्या मोठी आहे. हातातल्या मोबाइलनं लावलेली या व्हिडीओची चटक अनेकांना खोटय़ा भयगर्तेत ढकलते आहे.*** सहावी-सातवीतील मुलांकडेही आता स्वतर्‍चे मोबाइल आहेत. आणि त्यातले काही अ‍ॅडिक्ट होण्याच्या पातळीवर पोहोचलेत असंही दिसतं. या मुलांना अजून सोशल मीडियाचा अवाका नसला तरीही पालकांच्या मोबाइलमधले व्हिडीओ आणि व्हिडीओ गेम्स यांचं प्रस्थ सध्या जोरदार आहे. मधल्या सुटीत किंवा ऑफ पिरिअडमध्ये ही मुलं परस्परांशी मोबाइलमधल्या नवनवीन अ‍ॅप्सविषयी बोलतात. या चर्चेत भाग न घेणारे त्यांना ‘भोपळे’ वाटतात. अशाच एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सहावीत शिकणार्‍या तनयाला एका घोळक्याने वेडं केलं. ‘काय हे साधं व्हिडीओ गेम तुला खेळू देत नाहीत, असले कसले तुझे आई-बाबा ? अवघडचं आहे बाई तुझं’ मित्न-मैत्रिणींकडून आलेलं हे हेटाळणीचं वाक्य तनयाने फार मनाला लावून घेतलं नाही. उलट सातारा परिसरात असलेल्या कास पठार आणि कास तलावाकडे कधी तुमचे पालक तुम्हाला नेतात का, असा थेट प्रश्न तिनं केला. यावर सर्वच जण अवाक् झाले. कास पठारावर असलेली वनसंपदा, जैवविविधता आणि प्राण्यांचे वर्तनशास्त्न या सर्वाची यादी तिनं ऐकवली. व्हच्यरुअल जगाबाहेरचं जग जास्त भारी आहे, हेच कळेनासं व्हावं इतपत हे अ‍ॅडिक्शन वाढलेलं दिसतं. ***मानसोपचार केंद्रात अशा अनेक मोबाइल अ‍ॅडिक्शनच्या कहाण्या भेटतात.मात्र तिथंवर जे पोहोचत नाही, जे मोबाइलच्या व्यसनाच्या गर्तेत रुतत आपलं जगणंच विसरत चालले आहेत. त्यांचं काय?प्रश्न अवघड आहे आणि उत्तर आपल्याला शोधावंच लागणार आहे.***लास्ट सीनचे बळी

सोशल मीडियामुळे प्रेमीयुगुलांचा संवाद सोपा आणि सर्वापासून लपून छपून आणि अत्यंत खासगी झाला असला तरीही ‘लास्ट सीन’ हा आयुष्यात मोठा व्हिलन बनला आहे. आपला जोडीदार आपल्याला गुडनाइट म्हटल्याक्षणी डेटालाइन ऑफ करणं परस्परांना अपेक्षित असतं. दोघांपैकी कोणाएकाने हा नियम पाळला नाही किंवा बाय म्हटल्यावर पुढं काहीवेळ ऑनलाइन दिसणं हे नात्यांमध्ये तेढ निर्माण करतं आहे. त्यातून भांडणंही होतात आणि मनस्तापही. ऑनलाइन प्रपोज आणि ऑफलाइन ब्रेकअप करणार्‍यांची यादीही भली मोठी आहे. यातून येणार्‍या नैराश्यामुळे स्वतर्‍ला संपवणं किंवा एकमेकांच्या विरोधात सायबर गुन्ह्याची फिर्याद करण्याचेही प्रकार वाढत आहेत.**मोबाइल, त्यावर इंटरनेट, काम किंवा मनोरंजनासाठी वापर यासाठी स्वयंशिस्त हवी. मोबाइलच्या बाहेर एक जग आहे, त्या जगात खराखुरा आनंद मिळवणं, माणसांशी गप्पा मारणं, स्वतर्‍ काही कृती करणं हे सारं अवघड नाही. मात्र त्यासाठी हातातून मोबाइल बाजूला ठेवायला हवाच.

- डॉ. राजश्री देशपांडे, मनोविकारतज्ज्ञ,  निहार क्लिनिक, सातारा