शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

एमो

By admin | Published: March 01, 2017 1:09 PM

हसणारे, चिडवणारे छोटे छोटे एमोटिकोन किंवा स्मायली आता आपल्या जगण्याचा भाग झालेत, आपण चॅट विंडोत ते बिंधास्त वापरतो. मात्र ते आलेत कुठून आणि नक्की चाललेत कुठल्या दिशेला?

- शिल्पा मोहितेवेगवेगळ्या चेहऱ्यांनी भावना व्यक्त करायची संधी देणारी एक नवी चित्रभाषा का रुजतेय?हसणारे, चिडवणारे छोटे छोटे एमोटिकोन किंवा स्मायली आज तुमच्या, आमच्या दैनंदिन भाषेचा अविभाज्य घटक झाले आहेत. सकाळी गुडमॉर्निंगबरोबर येणारा सूर्य असो किंवा मुलीच्या हट्टाला कंटाळून दिलेला स्ट्रेट फेस, मित्राच्या जोकवर दाद म्हणून दिलेला खिदळणारा स्मायली असो वा कुणा खास व्यक्तीला दिलेलं चुंबन आणि हार्ट्स. या स्मायली किंवा एमोटिकॉन्सने आपली चॅट विंडो आनंदी आणि थोडी जास्तच रंगीबेरंगी केलेली आहे. पण तुम्हाला आठवतोय का पहिला वहिला एमोटिकोन? जर तुम्ही इंटरनेटच्या सुरुवातीच्या काळात संगणक वापरला असेल तर तुम्ही कदाचित आजही :-) हे चिन्ह स्मायली म्हणून कधी कधी वापरत असाल. या चिन्हाचा आणि तात्पर्यानं मॉडर्न स्मयलीचा जनक होता स्कॉट फॅहलमन. यांनी साधारण १९८२ साली पाठवलेला हा मेसेज.

"I propose that the following character sequence for joke markers: " Read it sideways."

या छोट्या चिन्हापासून सुरुवात झाली आणि नकळत प्राचीन काळातील चित्रलिपी पुन्हा एकदा वापरात आली. पुन्हा एकदा सिद्ध झालं की व्हिज्युअल किंवा दृश्यमान गोष्टी पटकन समजतात आणि भावतातही. एका सर्व्हेनुसार स्मायलीच्या वापरानं संभाषण फक्त जलदच नाही तर सोपंही होते. उदाहरण द्यायचंच तर, फक्त संध्याकाळी भेटू, संध्याकाळी भेटू... संध्याकाळी भेटू... संध्याकाळी भेटू... आणि संध्याकाळी भेटू... या वाक्यातला फरक तुम्ही समजू शकता. टीका किंवा नकारार्थी विषयातही स्मायलीच्या वापरानं विषयाला थोडा मऊ सूर येतो आणि ती टीका पचवणं थोडं सुलभ होतं.

मजा म्हणजे आजकाल स्मायलीचा वापर औपचारिक संभाषणातदेखील सर्रास होतो. त्यामुळे मी अजून फाइलची वाट बघतोय बरोबर एक स्मायली पाठवल्यास आॅॅॅॅफिसच्या कामात खेळीमेळीचं वातावरण राहू शकतं. सोशियल मीडियावर विविध एमोटिकोनचा वापर करणारे लोक अधिक फेमस आणि लाडके असल्याचं दिसून येतं. अलीकडेच फेसबुकमध्ये सुद्धा, लाइक बटनची जागा एमोटिकॉन्सने घेतलेली आहे. स्मायली पाठवणं अगदी सहज असलं तरी ते कधी कधी भावनाशून्य असू शकतं. पण ते स्वीकारणाऱ्या व्यक्तीची प्रतिक्रि या बऱ्याचवेळा खऱ्या चेहऱ्याला व्हावी अशीच असते. त्यामुळे भावनिक न होता भावुक संभाषण घडू शकतं. या एमोटिकॉन्समुळे आपण काहीसं खोटं आणि काहीसं अभावनिक होतोय का, अशी टीकाही हल्ली ऐकायला मिळते. अजून एक आरोप एमोटिकॉन्सवर आहे आणि तो म्हणजे डबल मिनिंगचा. पीच आणि एग्गप्लाण्ट हे अगदी परवा परवापर्यंत फक्त फळ-भाजी याच सदरात मोडत होते. आता मात्र त्याचे रुपांतर आक्षेपार्ह एमोटिकॉन्समधे झाले आहे. शिवाय थम्सअप, हायफाई, पॉइंटर यांच्या सोज्वळ रांगेत चावट मिडल फिंगरनेसुद्धा नंबर लावलाच आहे.पण या वरवरच्या नफा, नुकसानीपलीकडे एमोटिकोनचा काही उपयोग होऊ शकतो का? दिवसेंदिवस बिझनेसेस एमोटिकोनचा वापर विविध ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगच्या उपक्र मात करताना दिसत आहेत. आय होपसारख्या काही कंपन्यानी आपले लोगोज स्मायलीसारखे रिब्रॅण्ड केलेत तर डॉमीनोजने आॅर्डर प्रोसेस स्मायलीमय करून टाकली आहे. मार्केटिंगचं विश्व जास्तीत जास्त मार्केटर आणि कन्झ्युमरच्या भावनिक नातेसंबंधांवर अवलंबून राहायला लागलं आहे. त्यामुळे सगळ्यांनीच आता या एमोटिकॉन्सच्या वापराच्या दिशेनं धाव घेतली आहे.काळासोबत कम्युनिकेशन्सची, संवादाची साधनं बदलली. आता तर आपण बोलण्याइतकंच व्हॉट्सअ‍ॅपवर लिहून संवाद साधतो आहोत. त्यात या स्मायली सर्रास वापरतो. आपल्याला जे म्हणायचं ते या स्मायली पोहोचवतात असं आपल्याला मनापासून वाटतंही अनेकदा.अश्मयुगपासून ते आधुनिक युगात खूप काही बदललं आहे; पण एक गोष्ट बदलेली नाही, ती आहे माणसाला माणूस बनवणारी भावना. ही भावना कधी लेण्यांतील चित्रांमधून तर कधी एमोटिकॉन्समधून व्यक्त होताना दिसते, भाषेच्या पलीकडे जाऊन संभाषण घडवते, हृदयांना जवळ आणते, जखमांवर फुंकर घालते. त्यामुळे कधी मजा म्हणून, कधी संभाषण प्रभावी करण्यासाठी, तर कधी निव्वळ आळसामुळे हे स्मयली किंवा एमोटिकॉन्स तुमच्या चॅट विंडोमधे डोकावतच राहतील आणि चेहऱ्यावरही एक आनंद फुलवत राहतील.एक वर्षापूर्वी गूगलने जॉब करणाऱ्या महिलांच्या आदरात १३ स्मायलीज प्रकाशित केल्या. खूप काळापासून गप्प असलेल्या मुठीच्या एमोटिकोनला देखील यूएस इलेक्शननंतर वाचा फुटलेली दिसते. ट्रम्पच्या काही निंद्य निर्णयांच्या विरोधात या आवळलेल्या मुठी सोशल मीडियावर झळकल्या.मजा, मस्तीपलीकडे या स्मायली आता जाताना दिसतात.एमो नावाचा एक उपचारभावनांचे प्रतीक असलेल्या या एमोटिकॉन्सचा अजून एक सुंदर उपयोग आॅटिझमच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी केलेला आहे. भाषेची मर्यादा असलेल्या या मुलांची चाचणी एमोटिकॉन्सच्या चार्टद्वारे करण्यात येते. यात एखादी परिस्थिती त्या मुलाला/मुलीला सांगितली जाते आणि त्यावर प्रतिक्रि या म्हणून एमोटिकोन शोधायला सांगितलं जातं. जर भावना आणि एमोटिकोन मॅच करत नसतील तर अशा मुलांना त्यावर उपचार दिले जातात. बऱ्याचदा त्यांना शिकविण्यासाठीसुद्धा एमोटिकॉन्सचा वापर करता येतो. लहान मुलांच्या लैंगिक शोषणाच्या केसमधेसुद्धा एमोटिकॉन्स मदतीचा हात म्हणून पुढे आले आहेत.shiloo75@yahoo.com