शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

अमेरिकन प्रेमाचा ‘के’ व्हिसा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 19:02 IST

भारतातून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या तरुणांची संख्या अलीकडे वाढतेच आहे. अमेरिकेतील वास्तव्यासाठी एचवन-बी व्हिसापासून ते स्टुडंट व्हिसा, वर्क व्हिसा.. असे अनेक प्रकारचे व्हिसा सामान्यपणे वापरले जात असले तरी भारतीय आणि अमेरिकन नागरिकांचे ‘प्रेमाचे’ संबंध बघता अलीकडच्या काळात ‘के’ व्हिसाच्या मागणीचे प्रमाणही लक्षणीय वाढते आहे.

ठळक मुद्देतुम्हीही ‘के’ व्हिसाच्या शोधात आहात?..तर मग अमेरिकन नागरिकाच्या तुम्हाला प्रेमात पडावं लागेल.त्याच्याशी एंगेजमेण्ट करावी लागेल.अमेरिकेत जावं लागेलं.आणि तिन महिन्यात अमेरिकन व्यक्तीशी लग्नही करावं लागेल.

- सोहम गायकवाडतरुणांना अमेरिकेचं आकर्षण फार मोठं असतं. कुठल्याही मार्गानं अमेरिकेत जावं आणि तिथेच सेटल व्हावं असंही अनेकांना वाटत असतं. शिक्षणासाठी आणि अमेरिकेत नोकरीसाठी जाणाऱ्या भारतीय तरुणांची संख्या तर खूपच मोठी आहे. त्यासाठी लागणाऱ्या एचवन-बी व्हिसासंदर्भातल्या बातम्या तर कायमच चर्चेत असतात.मात्र याशिवायही अमेरिकेत प्रवेश करण्यासाठीचे अनेक ‘कॉमन’ व्हिसा आहेत. उदाहरणार्थ.. टूरिस्ट व्हिसा, बिझिनेस व्हिसा, वर्क व्हिसा, स्टुडंट व्हिसा, एक्स्चेंज व्हिजिटर व्हिसा, ट्रान्झिट व्हिसा, रिलिजस वर्कर व्हिसा, डोमेस्टिक वर्कर व्हिसा, मिडिया आणि जर्नालिस्ट व्हिसा..अमेरिकेत प्रवेशासाठी इतरही अनेक व्हिसा असले तरी सामान्यपणे हे व्हिसा भारतीय नागरिकांकडून सामान्यपणे जास्त प्रमाणात वापरले जातात.मात्र याशिवाय आणखीही एक प्रकारचा व्हिसा अलीकडे जास्त प्रमाणात वापरला जाऊ लागलाय.बऱ्याच जणांना त्याची माहिती नसली तरी त्याची चौकशी मात्र मोठ्या प्रमाणात व्हायला लागलीय.या व्हिसाचं नाव आहे ‘के’ व्हिसा..अमेरिकेत गेल्यानंतर, तिथे रुळल्यानंतर, अमेरिकन कल्चर त्या त्या व्यक्तीच्या अंगवळणी पडतंच. त्यामुळे अशा व्यक्ती बऱ्याचदा तिथल्या तरुण किंवा तरुणीच्या प्रेमात पडतात आणि तिच्याशीच विवाह करतात.भारतीय नागरिकांनी अमेरिकन नागरिकाशी विवाह करण्याच्या घटना अलीकडे बऱ्याच प्रमाणात वाढलेल्या दिसतात. भारत आणि अमेरिकेचे राजकीय संबंध कसेही असले तरी अमेरिकन नागरिकांनाही भारतीय जोडीदार हवाहवासा वाटू लागलाय. त्यामुळे अमेरिकन आणि भारतीय नागरिकांचे विवाह अलीकडे वाढताहेत.त्यामुळेच ‘के’ व्हिसाची मागणीही अलीकडे वाढलीय.काय आहे हा ‘के’ व्हिसा?अमेरिकन तरुण किंवा तरुणीशी एंगेजमेण्ट झालेली असल्यास ‘के’ व्हिसाद्वारे त्या व्यक्तीला अमेरिकेत प्रवेश मिळू शकतो. मात्र या व्हिसाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या व्यक्तीनं अमेरिकेत प्रवेश केल्यावर ९० दिवसांच्या आत त्याला अमेरिकन व्यक्तीशी विवाह करणं बंधनकारक आहे. अन्यथा ही व्हिसा रद्दबातल ठरतो आणि त्या व्यक्तीला पुन्हा आपल्या मायदेशी परतावं लागतं.अमेरिकन नागरिकाशी विवाह केल्यानंतर त्या परदेशी व्यक्तीला कायमस्वरुपी नागरिकत्वासाठी अर्ज करता येतो. ‘के-वन’ व्हिसा हा तांत्रिकदृष्ट्या नॉन इमिग्रण्ट व्हिसा आहे. या व्हिसामुळे परदेशी व्यक्तीला अमेरिकेत वास्तव्य करण्याची परवानगी मिळते, मात्र इमिग्रण्ट व्हिसासाठी आवश्यक असलेले निकष तिनं पूर्ण केलेले हवेत. विवाहानंतर ‘के-वन’ व्हिसाधारक व्यक्तीला अपत्य झाल्यास त्या अल्पवयीन अपत्यासाठी ‘के-टू’ व्हिसासाठी ती अर्ज करू शकते.‘के-1’ व्हिसासाठी अटी‘के-वन’ व्हिसावर अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तिंसाठी काही अत्यावश्यक बाबींचीही पूर्तता करावी लागते.१- या व्हिसावर अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या व्यक्तिसाठी अर्ज करणारी व्यक्ती अमेरिकन असावी.२- या दोन्ही व्यक्तींचे अमेरिकेत होणारे लग्न कायदेशीरदृष्ट्या वैध असावे. त्यात कोणतीही अडचण नसावी.३- या दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या चांगल्या परिचित आणि गेल्या दोन वर्षांत एकमेकांची त्यांनी प्रत्यक्ष भेटही घेतलेली असावी.४- एंगेजमेण्ट झालेली आणि अमेरिकेत येऊ इच्छिणाऱ्या या व्यक्तीचं पोलीस रेकॉर्ड स्वच्छ असावं. त्याचं आरोग्यही सुदृढ असावं. त्यासंदर्भातली कागदपत्रं त्याला अमेरिकन प्रशासनाला सादर करणं अनिवार्य आहे.५- विवाहेच्छुक दोन्ही उमेदवारांनी अमेरिकन काऊन्सिलरसमोर मुलाखतीसाठी प्रत्यक्ष हजर राहणं आणि आम्ही दोघं अमेरिकेत राहू इच्छित असल्याचं त्यांना सांगणंही बंधनकारक आहे.या साऱ्या अटींची पूर्तता झाल्यानंतरच ‘के-वन’ व्हिसा मिळू शकतो.