-श्रुती साठे
सेलिब्रिटीज नेहमीच वेगवेगळे रंग, स्टाइल्स वापरताना दिसतात. त्यांच्या अशा वेगवेगळ्या प्रयोगाचा कळत नकळत आपल्यावर प्रभाव असतो आणि आपणसुद्धा तसे रंग, कपडे वापरण्याचा प्रयत्न करतो; परंतु आपल्यासारखेच सेलेब्स सुद्धा मोनोक्रोम किंवा काळ्या पांढ-या रंगसंगतीचे कपडे आवर्जून वापरताना दिसतात. कुठलाही ऋतूू असतो, कुठलाही फॅशन ट्रेण्ड असो, आपल्या हाताशी असणारे पांढरे, ऑफ व्हाइट आणि काळ्या रंगाचे कपडे नेहमीच हवेहवेसे वाटणारे असतात.
याला ऐश्वर्यासुद्धा अपवाद नाहीये बरं का? तिच्या चित्रपटाच्या प्रोमोशनसाठी ती काळ्या आणि पांढ-या रंगाच्या स्टाइल्समध्ये अगदी कम्फर्टेबल दिसली.
व्हिक्टोरियन स्टाइल पांढर्या बेस वर काळी लेस असलेला लेस कॉर्सेट टॉप आणि त्यावर पांढ-या रंगाचा शर्ट ड्रेस या अनोख्या कॉम्बिनेशनमध्ये ऐश्वर्या खुलून दिसली. छाती आणि कमरेला टाइट फिट बसणारा कॉर्सेट हे सहसा शेप वेअर म्हणूनसुद्धा ओळखले जाते; परंतु नाजूक लेस, फ्रिल वापरून केलेले कॉर्सेट टॉप वेअरसुद्धा बाजारात उपलब्ध असतात. ऐश्वर्याने हा लूक लेस हिल्सने पूर्ण केला.
तोच कॉर्सेट टॉप, काळी लेगिंग आणि त्यावर काळ्या रंगाचा लांब केप यामध्ये ऐश्वर्या सुरेख दिसली. काळ्या रंगाचा केप त्यावर असलेल्या मेटल वर्कमुळे उठून दिसला.
ही स्टाइल म्हटलं तर सोपी, म्हटलं तर सहज करता येइल.
सो, ट्राय इट.