शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

तंत्रज्ञानाची कमाल! देशाच्या बॉर्डरवरही उभे राहतील भविष्यात रोबोट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 15:48 IST

देशाच्या सीमांवरही काही दिवसांनी रोबोट उभे असतील आणि संकटसमयी मदतीला धावतील

ठळक मुद्देमहत्त्वाची गोष्ट म्हणजे देशांतर्गत एखादा अतिरेकी हल्ला झाला, तर तिथंदेखील या रोबोटची मदत घेता येणार आहे. 

- प्रसाद ताम्हनकर 

जगभरातील अनेक लहान-मोठे देश हे आपल्या देशातील आणि देशाच्या सीमेवरील सुरक्षेसाठी मोठय़ा प्रमाणावर तंत्नज्ञानाचा वापर करत आहेत. विविध प्रकारच्या रोबोट्सना आर्टिफिशल इंटेलिजन्स अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देऊन त्यांचा वापर विविध प्रकारच्या संरक्षण कार्यासाठी करून घेतला जात आहे.  तंत्नज्ञान क्षेत्नात प्रगती करणारा आणि जगातील अनेक मोठय़ा तंत्नज्ञान कंपन्यांना तंत्नज्ञ पुरवणारा भारत सैन्यासाठी अथवा देशांतर्गत सुरक्षेच्या कामांसाठी  रोबोट तंत्नज्ञानाचा वापर कधी सुरू करणार, अशी चर्चा तर सोशल मीडियावरही पाहायला मिळते. मात्र संरक्षणासारखी मूलभूत गोष्टसुद्धा तंत्रज्ञान कसं बदलत आहे, त्याची ही फक्त एक झलक.1. देशाच्या अंतर्गत अथवा सीमांवरती टेहळणीसाठी ड्रोन रोबोट्स वापरले जात आहेत, जे आग, भूकंप अशा आपत्तीतदेखील मदत करण्यास सक्षम आहेत. 2. अलीकडे फ्रान्समध्ये नात्नो डॅमला लागलेल्या आगीच्या वेळी तिथल्या अग्निशमन दलाच्या मदतीला आलेले रोबोट्स आणि त्यांचं जबरदस्त मदतकार्य सगळ्या जगानं पाहिलं.3. देशाच्या आंतरराष्ट्रीय सीमांच्या निगराणीसाठी लवकरच रोबोट्स भारतीय सैन्यात दाखल होण्याची शक्यता आहे. सीमांची निगराणी करणे, तिथे तैनात असलेल्या सैनिकांच्या जिवांचं रक्षण करणं हे या रोबोट्सचं प्रमुख कार्य असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज अशा या रोबोट्सवरती सध्या भारतीय शास्रज्ञ काम करत आहेत. बेंगलुरू स्थित उील्ल31ं’ फी2ीं1ूँ छुं1ं318 ा ीिील्ल2ी ढरव इँं1ं3 ए’ीू31ल्ल्रू2 छ्र्रे3ी ि(इएछ) मधील 80 लोकांची टीम सध्या या रोबोटच्या तंत्नज्ञानावरती काम करते आहे. या टीमची संख्या वाढवून लवकर 100 केली जाण्याची शक्यता आहे. हा पेट्रोलिंग रोबोट सेन्सर्सनी सुसज्ज असणार असून, तो कंट्रोल सेंटरशी जोडलेला असणार आहे. या सेंटरशी संवाद साधणं, माहिती देवाण-घेवाण करणं हे कामदेखील हा रोबोट सहजतेनं पार पाडू शकणार आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे देशांतर्गत एखादा अतिरेकी हल्ला झाला, तर तिथंदेखील या रोबोटची मदत घेता येणार आहे. 4. सध्या या रोबोट्स निर्मितीची छोटी ऑर्डर दिल्यास, तिचा खर्च अंदाजे 70 ते 80 लाख रु पयांच्या घरात जाणार आहे. मात्न सैन्याने मोठय़ा प्रमाणावरती हे रोबोट्स वापरायचे ठरवून मोठी ऑर्डर दिल्यास, ही किंमत खूप मोठय़ा प्रमाणात खाली येण्याची शक्यता असल्याचं शास्रज्ञांचं म्हणणं आहे. सध्या शास्रज्ञांनी प्राथमिक स्तरावरती अशा प्रकारचा एक रोबोट तयार करण्यात यश मिळवलं असून, त्याच्या पुढील प्रगत पिढीच्या निर्मितीचे काम सुरू करण्यात आले आहे. डिसेंबर महिन्यापर्यंत या रोबोटचा प्रोटोटाइप तयार करून, त्याच्या चाचण्यादेखील सुरू करण्याचं उद्दिष्ट शास्रज्ञांनी समोर ठेवलं आहे. या रोबोट्सच्या प्रत्यक्ष सीमेवरील चाचण्या या फेब्रुवारी 2020 मध्ये अपेक्षित आहेत.. 5. या रोबोट्सच्या निर्मितीबरोबरच कृत्रिम बुद्धिमत्तेवरती आधारित इतरही अनेक तंत्नज्ञान आणि शस्र सैन्यदलासाठी उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात असल्याचं कंपनीतर्फे नमूद करण्यात आलं आहे.

*******************

गूगलमध्ये यूजरची माहिती साठवली जाते का? मला त्यावर नियंत्रण  कसं ठेवता येईल? 

माहितीच्या साठय़ाचं अर्थात डेटाबेसचं प्रचंड वाढलेलं महत्त्व बघता, खरं तर इंटरनेटवर खासगी माहितीची सुरक्षा हा गहन प्रश्न बनत चालला आहे. गूगलसारखी दिग्गज कंपनीदेखील यूजर्सची माहिती अनेक स्वरूपात साठवत असते. तुम्ही भेट दिलेल्या वेबसाइट्स, गूगल मॅप्सवरती सर्च केलेली ठिकाणं, तुमचे विविध वेळी नोंदवण्यात आलेले लोकेशन, तुम्ही कोणकोणत्या अ‍ॅप्सवरती आणि किती वेळासाठी लॉग-इन केलेत अशी अनेक प्रकारची माहिती गूगलमध्ये संग्रहित होत असते. या माहितीचं नियंत्नण करण्यासाठी गूगलने यूजर्सला अगोदर सुविधा दिलेली आहे. त्यातलीच ही एक सुविधा.ऑटो डिलीटआता गूगलने यूजर्सला ‘ऑटो डिलीट’चा अनोखा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. यासाठी यूजरला आपल्या गूगल अकाउंटमध्ये लॉग-इन करावं लागणार आहे. त्यानंतर सेटिंगमध्ये जायचं आणि तेथील ‘वेब अ‍ॅड अ‍ॅप अ‍ॅक्टिव्हिटी’ या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. त्यामध्ये असलेल्या ‘ऑटो डिलीट’ हा डेटा डिलीट करण्याचा पर्याय निवडून या सुविधेचा वापर सुरू करता येणार आहे. सध्या गूगलने यूजरला तीन महिने ते 18 महिन्यांच्या अवधीचा पर्याय दिलेला आहे. तीन महिन्यांचा पर्याय आपण निवडला तर बरोबर तीन महिन्यांनंतर आपली गूगलवर असणारी वेब व इतर अ‍ॅपच्या अ‍ॅक्टिव्हिटीची सर्व संग्रहित माहिती आपोआप डिलीट होणार आहे. सध्या हे फीचर फक्त लोकेशन हिस्ट्रीपुरतंच मर्यादित असलं तरी, काही काळातच वेब आणि अ‍ॅप्सच्या माहिती संग्रहालादेखील डिलीट करण्यास ते सक्षम असेल. 

(लेखक तंत्रज्ञानविषयक लेखक/मुक्त पत्रकार आहेत.)