शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

आपलं जगणं बसल्या जागी ‘हॅपनिंग’ आहे म्हणणारं व्यसन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 08:00 IST

भारतीय नागरिक दिवसाला सरासरी ७ तास स्मार्ट फोन वापरतात इंटरनेटचा वापर ७५ टक्के वाढला आहे, तर ८४ टक्के लोक म्हणतात की, झोपेतून उठल्यावर पहिली १५ मिनिटं आम्ही मोबाइलच पाहतो. हे स्क्रीनचं व्यसन आपल्याला कुठं नेणार?

-प्राची पाठक

आपल्या घरातल्या लोकांना आपण उठता बसता गुड मॉर्निंग, गुड अफ्टरनून, गुड नाईट वगैरे म्हणतो का? पण सोशल मीडियात सतत गुड मॉर्निंग, गुड नाईटवाले फॉरवर्ड्स लोक एकमेकांना पाठवतात, कारण ते आयते मिळतात, आले की ढकल पुढे. एरवी कधीही सेलिब्रेट न केलेल्या सणांचे, दिवसांचे देखील शुभेच्छा मेसेज वाट्टेल तसे फॉरवर्ड होतात. त्यात फॉरवर्ड्समध्ये आलेली सर्व माहिती आपण खरी मानायला लागतो. त्यातल्या तमाम थिअरीजवर विश्वास ठेवू लागतो आणि त्यात कमालीचे गुरफटत जातो, हेही अनेकदा लक्षातही येत नाही.

इंटरनेट, सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म्स. खऱ्या-खोट्या, अर्धसत्य, अर्धवट, आपल्या कोणत्याही विचारांना सोयीस्कर अशा माहितीचं इतकं प्रचंड मोठं जाळं आपल्याभोवती आहे की सतत नवीन काहीतरी त्यात बघायला, वाचायला मिळेल असं आपल्याला वाटतं. जगातली सोशल मीडियावर फिरणारी सगळी माहिती जणू आपल्याला शोषून घ्यायची आहे. दणादण व्हाट्स ॲप स्टेट्स अपलोड करायचे आहेत. फिरायला जाण्यापेक्षा वेगवगळ्या ठिकाणी जाऊन स्वतःचेच आणि आपल्या ग्रुप्सचे फॅशनेबल फोटोज काढून घ्यायचे आहेत. सेल्फीच्या आपण इतके आहारी गेलो आहोत की, जीवाची पर्वादेखील न करता वेगवेगळ्या जीवघेण्या स्पॉट्सवर ॲडव्हेंचर करत आपल्याला सेल्फी काढत सुटायचे आहे! रेसिपी खाण्यासाठी करायच्या आहेत की, फोटो काढून फ्लॉण्ट करण्यासाठी याचा विचार करण्याइतकी फुरसतही उरलेली नाही, असं चित्र आहे.

सकाळी उठल्यावर आधी आपल्या मोबाइलमध्ये डोकावणं ही आपली सवय झालेली आहे. जणू जगातले सगळ्यांत महत्त्वाचे असे मेसेजेस आपल्यालाच दररोज येत असतात. ते वाचले नाहीत, पाहिले नाहीत, त्यांना रिस्पॉन्स दिला नाही, तर फार मोठ्ठं आकाश कोसळणार आहे. बसल्या बसल्या काहीही न करता आपलं जगणं हॅपनिंग आहे, असा फिल जो तो स्वत:ला देत सुटला आहे.

कोरोना काळात तर लॉकडाऊनशिवाय आपण जगणंच जणू विसरलो.

शाळा, कॉलेज ऑनलाइन, वर्क फ्रॉम होमही आलंच; पण खरा विचार केला तर अशी किती काळ असते ऑनलाइन शिक्षणाची वेळ. तो वेळ सोडून घरोघर हीच ओरड आहे की, पोरं फोनच्या बाहेर यायलाच तयार नाहीत. रिकाम्या हातांना काही काम नाही ही हतबलता मान्य करता एका लिमिटपर्यंत हे सर्व गरजेचं आणि ठीकच आहे, असंही म्हणावं लागतंच; पण दिवसातला किती वेळ आपण इलेक्ट्रॉनिक स्क्रीन्सला चिकटलो आहोत, ह्याचं भान खूपच आवश्यक आहे.

प्रत्येकाला वाटत असतं की मी तर फक्त गरजेपुरतंच नेट-फोन- सोशल मीडिया वापरतो. माहिती मिळवत आहोत, कामासाठी वापरत आहोत; पण ते खरंच तसं आहे का, हा प्रश्न स्वतःला प्रत्येकानं विचारायला हवा. बसल्याजागी सतत नेट सर्फ करत बसणं, सोशल मीडियावर, कॉल्सवर कित्येक तास वेळ घालवणं हे आपल्या हाताच्या स्नायूंना, शरीराच्या पोश्चरला, मेंदूला, मनाला, डोळ्यांना आणि कानालाही अपायकारक ठरू शकतं, ह्याचं भान आपण बाळगतो का, हेही विचारूच घेऊ स्वतःला!

या व्यसनाचं काय?

अनियंत्रित दारू पिणं, सिगारेटचं व्यसन असणं, ही व्यसनं सहज कळून येतात. त्याबद्दल आपल्या आजूबाजूचे चार लोक जागरूक असतात. त्यांच्या आहारी आपण जाऊ नये, म्हणून खबरदारी घेत असतात; पण स्मार्ट फोनचं, स्क्रीन्सचं देखील कमालीचं व्यसन आपल्याला लागत चाललेलं आहे, ह्याचं भान मात्र आपल्याला राहत नाही. ह्यात गंमत अशी आहे की, त्याची जाणीव करून देऊ शकणारे बहुतांश लोक देखील त्याच सर्व स्क्रीन्सच्या जाळ्यात अडकले आहेत. कोणी कोणाला सांगायचं, हाच मुळात प्रश्न आहे!

( प्राची मानसशास्त्रासह पर्यावरण आणि सूक्ष्मजीवशास्त्राची अभ्यासक आहे.)

prachi333@hotmail.com