- प्रवीण दाभोलकर
ज्ञानोबा, तुकोबांचा वसा घेतलेल्या महाराष्ट्राला सध्या वारीचे वेध लागले आहेत. संताचा वसा आपल्या पद्धतीने पुढे सुरु ठेवण्Þयाचं काम मुंबईतील अभंग रिपोस्टची मंडळी करीत आहेत. गिटारीच्या धुनमध्ये अभंगाचे स्वर मिसळत तयार झालेली गितं सध्या तरु णाईला भूरळ पाडत आहेत. वारीच्या पाशर््वभूमीवर सोशल मीडीयावर सध्या अभंग रिपोस्टची चर्चा पाहायला मिळत आहे. दुष्यंत देवरुखकर, स्वप्नील तर्फे , प्रसाद मोरे यांच्या अभंग रिपोस्ट या संकल्पनेला गिटारीस्ट अजय वाव्हळ, पियानोवादक अमेय देसाई, तबलावादक विराज आचार्य यांची साथ मिळत आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधून आपल्या कलेची चुणूक दाखिवणारे हे तरुण अभंग रिपोस्टचे व्हिडीओ यूट्यूबवर सध्या गाजत आहेत. भारतीय आणि पाश्चिमात्Þय संगीताचा मिलाप असलेल्या ‘अभंग रिपोस्ट’मुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत अभंग पोहोचण्यास मदत होत आहे. मुळ कलाकृतीला कोणतीही इजा होऊ न देता जॅझ, वेस्टर्न, कंटेपररी वाद्यांचा वापर करीत अनोखे संगीत या ग्रुपतर्फे तयार केले जात आहे. लहानमुलांची आवड ओळखून ‘लहानपण देगा देवा’ या अभंगाला पाश्चिमात्य तालाची जोड देण्यात आली. तरुणांची विठ्ठलनामाची गोडी आणि रॉक बँडची आवड ओळखून गेल्यावर्षी तयार केलेल्या ‘सुंदर ते ध्यान’ या व्हिडीओनेही या ग्रुपला वेगळी ओळख निर्माण करु न दिली. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या अभंगातून सामाजिक भानही जपले गेले. मुंबईत वारीच्या निमित्ताने होणाऱ्या कार्यक्रमांचे अभंग रिपोस्टला हमखास आमंत्रण असते. सध्या अंभग रिपोस्टने बनविलेला ’आम्ही बि-घडलो तुम्ही बिघडांना’ सोशल मीडियावर चर्चचा विषय ठरत आहे. तो अभंग पुढीलप्रमाणे.... आम्ही बि-घडलो तुम्ही बिघडांना सद्गुरु च्या संगे शिष्य बिघडला शिष्य बिघडला सद्गुरु ची झाला परिसाच्या संगे लोह बिघडले लोह बिघडले सुवर्णची झाले सागराच्या संगे नदी बिघडली नदी बिघडली सागरची झाली संघाचिया संगे आम्ही बिघडलो आम्ही बिघडलो संघरूप झालो