शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही करताय का फॅशनच्या नावाखाली या 6 चुका?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2018 15:10 IST

ज्याला आपण ‘मॉडर्न’ म्हणतो, जे स्वातंत्र्याचा भाग म्हणून मिरवतो ते खरंच ‘आपली आवड’ असतं का?

ठळक मुद्देस्वच्छता, सुरक्षितता याचं भान ठेवा. ते बिघडलं तर आपण नस्ती आफत ओढावून घेऊ शकतो

- निकिता महाजन

लहान मुलं पाहून पाहून शिकतात, हे वाक्य तर आपण ऐकलेलं असतंच; पण तरुण मुलं?- ते तर कुणाचंच ऐकत नाहीत! असं जोरदार वाक्य तुमच्या मनात आलं असेल तर थांबा, कारण वाक्यात ठसका असला तरी आपल्या मतांवर माध्यमांचा, आता तर सोशल मीडियाचा, व्हॉट्सअ‍ॅप स्कूलचा आणि जाहिरातींचाही प्रचंड प्रभाव असतो. आपण सतत जे स्क्रीन पाहतो, म्हणजे जी दृश्यं सतत आपल्या डोळ्यांसमोर असतात, मेंदूवर आदळतात त्यांचा आपल्यावर काय परिणाम होतो याचा सामाजिक अभ्यास आता जगभर सुरू आहे. मात्र त्यातला एक अत्यंत छोटासा पण टोकदार भाग म्हणजे फॅशन. अनेक गोष्टी आपण फॅशन म्हणून स्वीकारतो, त्या करतो, त्याच आपल्याला करायच्या आहेत म्हणून घरच्यांशी भांडतो, त्याला आधुनिक म्हणतो आणि तीच आपली आवड असंही आपणच ठरवून टाकतो.मात्र ते सारं खरंच आहे, असं नाही. कारण त्या सार्‍या फॅशन आपल्याही नकळत आपल्यावर सिनेमा, जाहिराती, बाजारपेठ यांनी लादलेल्या असतात. आणि त्या आपण आपली आवड म्हणून करत बसतो. खरं नाही वाटत ना, एक लिटमस टेस्ट म्हणून फक्त या 7 गोष्टी तपासून पाहा. त्या आपण करतो, फॅशनेबल म्हणून वावरतो पण त्या आपल्या फायद्याच्या आहेत का, हे कधीही तपासून पाहत नाहीत. उलट त्या हानिकारकच आहेत, हे कुणीही अगदी कॉमन सेन्स म्हणून सांगेल; पण आपण मात्र त्या स्वीकारताना या सार्‍यांचा विचारच केलेला नाही.चेक करून पाहा. या 6 गोष्टीच कशाला आपण रोजच्या जगण्यात ताळा करून पाहिला तरी अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या आपण आवश्यक म्हणून करतो, पण त्या अनावश्यकपणे आपल्याही नकळत आपल्यावर लादल्या गेलेल्या आहेत, त्या आपणही स्वीकारल्या आहेत. पण त्या फायद्याच्या नाहीत.ही घ्या लिस्ट.

1. मोठ्ठे कानातले

अलीकडेच दीपिका पदुकोणच्या लग्नाचे, स्वागत समारंभाचे फोटो आपण पाहिले. त्यात तिनं कानात घातलेले झुमकेही पाहिले. हे भलेमोठे. वजनदार. अनेक सिरीअल्स, सिनेमातही असेच कानातले दिसतात. आता तरी ट्रेनमध्ये आणि रस्त्यावरच्या ठेल्यांवरही असे कानातले सहज उपलब्ध दिसतात. स्वस्तही असतात. फॅशन म्हणून अनेकजणी असे कानातले घालतात. पण त्यानं कान दुखणं, कानाखालचा मानेचा भाग दुखणं, कानाची छिद्र मोठी होणं असे अनेक त्रास होतात; पण फॅशन म्हणून मोठ्ठी कानातली घातली जातात.

2.स्किनी जिन्स

एकतर बारीक होण्याची होड, त्यात स्किनी जिन्स घालण्याची हौस. या अंगावर शिवल्यासारख्या जिन्स घालायला हव्यात हे आपल्याला जाहिरातींनी सांगितलं. आपणही आपल्याकडच्या उष्ण वातावरणात, जिन्स मॉडर्न आहे आणि आपणही मॉडर्न आहोत म्हणत घालतो. परिणाम असा की स्किन रॅश, फंगल इन्फेक्शन, घामाचा त्रास आणि पुरळ, चट्टे असे अनेक प्रकार आढळतात. हे आपण का करतो असं मात्र कुणी कुणाला विचारत नाही.

3.कॉर्सेटफिट दिसा, पोट दिसणार नाही असे आतून घालायचे कपडे म्हणजे हे कॉर्सेट. ते आता टीव्हीवर तातडीनं फोन करा, वस्तू मागवा अशा टेलिमार्केटिंग शोमध्येही मिळतात. अनेकजणी ते मागवतात. मात्र त्याचा शरीरावर काय परिणाम होतो, आपल्या बॉडी इमेजवर काय परिणाम होतो हे मात्र समजून घेत नाहीत.

4. सिंथेटिक फॅब्रिकचकचकीत, अंगाला चिकटणारं सिंथेटिक फॅब्रिक चांगलं दिसतं म्हणून घातलं जातं. पण त्यानं त्वचेला काय अपाय होतो, ते टोचतं का रुततं का, पायांना काचतं का, याचा काहीही विचार केला जात नाही. त्यामुळे रोडसाइड फॅशनेबल सिंथेटिक कपडे घालताना जरा विचार करा. चमकतं ते चांगलंच नसतं.

5. हाय हिल्सआता हाय हिल्स घालू नये हे तरुण मुलींना पटलंय कारण त्यानं टाचा दुखतात, कंबर दुखते. भयंकर वेदना होतात. पाय घसरून पडले तर पडलेच. मग काही विचारायलाच नको. त्यामुळे हाय हिल्स घालणं ना फॅशनेबल आहे ना मॉडर्न हे लक्षात ठेवलेलं बरं.

6. पिअरसिंग आणि टॅटूपिअरसिंग आणि टॅटू करण्याची फॅशन आहे. विराट कोहली ते हार्दिक पांडय़ा ते तमाम सेलिब्रिटी आताशा टॅटू करतात. मात्र आपणही ते करणार असू तर त्यातली स्वच्छता, सुरक्षितता याचं भान ठेवा. ते बिघडलं तर टॅटू करण्यातून आपण नस्ती आफत ओढावून घेऊ शकतो.