ते 50 तास- काय घडलं त्या प्रवासात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 03:53 PM2020-05-21T15:53:21+5:302020-05-21T15:53:31+5:30

यूपीएससी करायला दिल्लीत गेलेली महाराष्ट्रातली तरुण मुलं. लॉकडाउन वाढलं तसं त्यांनाही घरी यायचे वेध लागले. सुमारे 50 तासांचा हा रेल्वेप्रवास त्यांच्यासाठी एक ‘अनुभव’ होता.

That 50 hours- train to Mumbai- story of a journey- UPSC Delhi students. | ते 50 तास- काय घडलं त्या प्रवासात?

ते 50 तास- काय घडलं त्या प्रवासात?

googlenewsNext

- उमेश जाधव, -शर्मिष्ठा भोसले

16 मे रोजी जुनी दिल्ली रेल्वेस्थानकावर रात्नी साधारणत: सव्वानऊच्या सुमारास रेल्वे आली. स्थानकाबाहेर बसमध्ये बसलेले विद्यार्थी रेल्वेची आतुरतेने वाट पाहत होते. साडेनऊ वाजल्यावर रेल्वे पोलिसांनी मुलांना रेल्वेत पाठवण्यास सुरु वात केली.
दिल्लीत यूपीएससीची तयारी करणारी. भविष्यात प्रशासकीय सेवेत जाण्याचं स्वप्न पाहणारे हे तरुण-तरुणी. एक अॅपद्वारे दिल्लीतल्या या तरुणांपैकी काहींनी नेतृत्व करत तरुणांची नावनोंदणी केली. 
या मुलांनाही महाराष्ट्रात स्क्रिनिंग केल्याशिवाय महाराष्ट्रात धाडणं शक्य नव्हतं. सकाळी 9 वाजल्यापासूनच बसने मुलांना स्क्रिनिंग केंद्रावर नेण्यात आलं. काही जणांचं स्क्रिनिंग 4 वाजेर्पयत उरकलं तर काही ठिकाणी 5 वाजता ते सुरू झालं. सायंकाळी 5 ते रात्नी 1क् वाजेर्पयत स्क्रिनिंग उरकल्यावर या मुलांना बसने रेल्वेर्पयत सोडण्यात आलं.  
आपल्या वाटय़ाला निदान ट्रेन तरी आहे या आनंदात अनेकांनी डब्यात प्रवेश केल्यावर हा जनरलचा डबा असल्याचं काही जणांच्या लक्षात आले म्हणून त्यांनी गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्न, पोलिसांनी जबरदस्ती करत त्याच डब्यात बसायला सांगितलं. काही कळायच्या आधीच रेल्वे सुरू झाली. रेल्वे प्रशासनाने पूर्णपणो र्निजतुकीकरण केलेलीच गाडी पाठवण्यात येईल, असं स्पष्ट केलं होतं.
पण गाडी अवस्था बिकट होती, डब्यात साधी स्वच्छताही नव्हती असं हे तरुण दोस्त सांगतात.  स्लीपर कोच नसल्याने प्रत्येकाला बसून प्रवास करण्याशिवाय पर्याय नव्हता. प्रत्येक डब्यात अडीचशे विद्यार्थी असे पाच डब्यात तब्बल एक हजार विद्यार्थी होते.
मात्र तरीही आपल्याला निदान घरी येता आले, या आनंदात चोवीस तास उपवास सहन करत ही मुलं कशीबशी आपापल्या घरी पोहोचली. ही सगळी चाळीस-पन्नासहून अधिक तासांची रोलर कोस्टर राइड कशी होती?
- ट्रेनने प्रवास करणा:या काही तरुण मुलांशी गप्पा मारल्या. तर त्यांनी या प्रवासाचा अनुभव सांगितला.
विद्याथ्र्यानी विनंती केली म्हणून त्यांची नावं प्रसिद्ध करणं टाळतो आहोत. काहींची 
एक दोस्त म्हणाला, मी मूळचा नांदेडचा. 2क्17 पासून दिल्लीत यूपीएससीची तयारी करतोय. या आधीची सेण्ट्रल आर्म पोलीस फोर्सची एक मेन्स परीक्षा पास झालो. शेवटचा मुलाखतीचा टप्पा बाकी होता. आणि एकदमच हे कोरोनाचं भूत समोर उभं राहिलं. सुरवातीला आम्ही सगळेच या विचारात होतो, की हे काय जास्त काळ चालणार नाही. होईल कमी, संपेल. आपण आपला अभ्यास इथेच सुरू ठेवूया. पण हळूहळू लक्षात यायला लागलं, प्रकरण वाटतं तितकं साधं नाही. आता आपल्या परीक्षेचं काय असं वाटून आम्ही अस्वस्थ होऊ लागलो.  झोप येईनाशी झाली. मेस, लायब्ररी बंद झाल्या. सगळी लाइफस्टाइलच बदलली. घरची आठवण यायला लागली.
सोशल डिस्टन्सिंग पाळायचं होतं. पण आमचा ओल्ड राजेंद्र नगरचा एरिया आणि तिथल्या रूम्स अशा, की एकाच रूममध्ये पाच-सहा जण राहतात. दरम्यान, घराचे सतत फोन करत राहायचे. त्यांच्या दिवसेंदिवस काळजीत पडलेला आवाज जाणवायचा. आम्ही स्पर्धा परीक्षावाले जनरली टेलिग्राम अॅप वापरतो. त्यावर महाराष्ट्रातल्या मुलांचा ग्रुप आहे. त्यावर एक लिंक होती. महाराष्ट्र पीपल स्टक इन दिल्ली. तिथं नाव नोंदणी करायची होती. मीही नावनोंदणी केली. अनेकांना वाटलं, की यातून काय होणार नाही. म्हणता म्हणता तिथली नावनोंदणी 14क्क्-15क्क् र्पयत गेली. महाराष्ट्र शासनाने हा आकडा पाहून पुढची कार्यवाही सुरू केली. केंद्र सरकार आणि नॅशनल डिजास्टर मॅनेजमेंट ऑथोरिटी यांच्यासोबत समन्वय साधत ही ट्रेन सोडली शासनाने. यात स्पर्धा परीक्षेची तयारी करणा:यांव्यतिरिक्त मेडिकल स्टुडंट्स, काही दिल्ली फिरायला आल्यावर तिथे अडकलेले तरु ण असे बरेच कोणकोण होते.
रात्नी साडेदहा वाजता ट्रेन दिल्लीहून निघाली. आमच्यासोबत कुणी कर्मचारी वगैरे नव्हते. आमच्यातलेच लोक प्रत्येक डब्ब्यात 1-2 असे स्वयंसेवक बनले.
प्रवासात स्वछतागृहात पाणी नव्हतं. मग आमच्यातल्या एकाने हा प्रकार ट्विटरवर टाकला. सगळ्या गैरसोयीची गोष्ट यंत्नणोर्पयत गेली. मग सूत्नं हलली आणि पाणी आलं.
प्रवासात सगळे एकमेकांशी दुरून बोलत राहिलो. काहीजण एकमेकांच्या ओळखीचे होते, काही नव्या ओळखी झाल्या. खाण्या-पिण्याची गैरसोय होतीच. पण एकमेकांना आम्ही सोबत असलेली ग्लुकोज पावडर, थोडीबहुत बिस्किटं शेअर करत राहिलो.
त्नास झाला; पण घरी तरी जायला मिळतंय ना, असा दिलासा होता.
घरच्यांचे आणि मित्नांचे फोन सतत यायचे. पण फोनला जास्त हात लावला नाही. नाहीतर मग सतत हात सॅनिटाइज करावे लागायचे. ट्रेनमध्ये सगळे स्वत:ची आणि  एकमेकांची काळजी घेत होते. मात्न काही बेजबाबदार होतेच. त्यांनी मास्कपण घातला नव्हता. 
ट्रेनच्या मार्गावरची सगळी गावं-शहरं सुनसान, भकास दिसायची. ते पाहणं नको झालं मला. वेळ जात नव्हता मग स्लीपिंग इज द बेस्ट मेडिटेशन असं मी स्वत:ला सांगितलं नी झोपलो. मला नांदेडला जायचं होतं. मराठवाडा आणि विदर्भाच्या लोकांना भुसावळमध्ये उतरवलं. आम्हाला क्वॉरण्टाइनचा स्टॅम्प मारून एसटीत बसवलं. 
 नांदेडला पोहोचलो तेव्हा रात्नीचे 2 वाजले होते. बस स्टॅण्डवर पोहोचल्यावर तिथं काही काही स्टॅण्डवरचे कर्मचारी आणि एक कॉन्स्टेबल सोडल्यास कुणीच नव्हतं. तसंच ताटकळत वाट बघण्यात पहाटेचे 4 वाजले. मग त्यावेळी एक आरोग्य अधिकारी आला. सकाळी सहा-साडेसहा वाजता स्क्रिनिंग झालं. हे तिसरं स्क्रिनिंग होतं.
मला होम क्वॉरण्टाइन सांगितलं आहे. आई-वडील मला पाहून खूप खूश झाले. मी 20 दिवस क्वॉरण्टाइन राहायचं ठरवलंय. 
***
दुसरा एक तरुण दोस्त सांगतो, मी नाशिक रोडला राहतो. ऑगस्टमध्ये दिल्लीला गेलो होतो. दीडेक महिन्यावर परीक्षा आलेली असताना अचानक कोरोनाची साथ उद्भवली.
राजेश बोनावटे, माधुरी गरुड हे आमचे सहकारी अॅडमिन्स. त्यांनी दिवसरात्न सगळी व्यवस्था ठेवायला खूप मेहनत घेतली, अजूनही घेतायत. त्यांच्या अॅडमिनशिप खाली आमचा दिल्लीतल्या 2क्क्क् यूपीएससी करणा:या तरुणांचा टेलिग्राम ग्रुप तयार केला. तो अजूनही अॅक्टिव्ह आहे. या ग्रुपच्या माध्यमातून सगळे एकमेकांची काळजी घेत राहिलो. सतत संपर्कात राहिलो. पण तिथं व्यवस्थेत मोठा गोंधळ होता शासनस्तरावर. म्हणजे बघा, तिथं सकाळी 7 वाजता आमची पहिली  बॅच बोलावली. पण स्क्रिनिंग मात्न संध्याकाळी 6 वाजता झालं. गोल चक्कर आणि आंबेडकर मैदान इथं आमचं स्क्रिनिंग झालं. आम्हाला त्यासाठी सकाळी बोलावलं होतं. आधी ट्रेन संध्याकाळी 8 वाजता सुटणार होती. साडेदहा वाजता रात्नी ट्रेन निघाली. दिल्ली सरकार आणि रेल्वेनं सांगितलं होतं, की रात्नीचं जेवण आम्ही तुम्हाला ट्रेनमध्ये पुरवू. पण त्यांनी तो शब्द पाळला नाही. 
प्रत्येक डब्यात आमचे दोन समन्वयक होते. मुलांची कुठलीही तक्र ार असली की ते तत्परतेनं सोडवायचे. ट्रेनच्या प्रवासात आता अभ्यास, परीक्षा यांचं पुढं काय कसं होणार याच्याच चर्चा होत होत्या. प्रवासात टेलिग्राम ग्रुपवर सगळे अॅक्टिव्ह होते. काहीही अडचण आली की प्रत्येकजण ग्रुपवर वैयक्तिक मेसेज करायचा. लगेच आमचे अॅडमिन त्यावर कार्यवाही करायचे. डबा, नंबर आणि नाव सांगितलं, की ते तिकडं येऊन अडचण सोडवायचे.
असा ट्रेन प्रवास झाला आता  मी होम क्वॉरण्टीन आहे. आमचा टेलिग्राम ग्रुप अजून अॅक्टिव्ह आहे. येत्या काळात कुणाला काही लक्षणं दिसली तर संबंधिताना अलर्ट करता येईल आणि पुढची मदत देता येईल यासाठी हे केलंय. आपापल्या गावी अनेकांना गाववाल्यांनी तुम्ही गावात येऊ नका म्हणत अडवणूक करायला सुरुवात केली. मग आमच्या एडमिन्सनी तत्परतेने त्या त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींना संपर्क केला. सगळी बाब कानावर टाकत या मुलांना गावात क्वॉरण्टीन होण्यासाठी प्रवेश मिळवून दिला.


 


 

Web Title: That 50 hours- train to Mumbai- story of a journey- UPSC Delhi students.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.