शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

5 पॉवरफुल अ‍ॅप्स

By admin | Updated: January 14, 2016 21:20 IST

‘कम्युनिकेशन इज किलिंग कम्युनिकेशन’ असा नवा सिद्धांत सध्याच्या काळात मांडला जातोय.

‘कम्युनिकेशन इज किलिंग कम्युनिकेशन’
असा नवा सिद्धांत सध्याच्या काळात मांडला जातोय.
म्हणजे काय तर हातात आलेल्या तमाम नव्या कम्युनिकेशन माध्यमांमुळे लोक बोलत सुटलेत, शेअर करत सुटलेत; मात्र त्यामुळे संवाद वाढत नाही, तर अनेकदा व्यक्तिगत आणि सार्वजनिक आयुष्यातही विसंवाद वाढतो आहे, असं या नव्या संकल्पनेचं म्हणणं आहे.
मात्र दुसरीकडे हेदेखील तितकंच खरं आहे की, तंत्रज्ञान आणि माहिती साधनांचा योग्य आणि विधायक उपयोग केला तर संवादकौशल्य वाढवताही येऊ शकतं.
त्यासाठी घरबसल्या काही चकटफू अ‍ॅप्स वापरून आपल्या मोबाइलच्या माध्यमातूनच आपलं संवादकौशल्य नक्की सुधारता येऊ शकतं.
त्यासाठी मदत करतील असे हे काही अ‍ॅप्स..
 
१) Fluent English
ज्यांना आपलं इंग्रजी सुधारण्याची मनापासून इच्छा आहे, त्यांच्यासाठी हे अ‍ॅप महत्त्वाचं. अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइल असेल तर हे अ‍ॅप डाऊनलोड होऊ शकतं. ते थोडी जास्त जागा खातं हे खरं पण त्याचे फायदेही खूप आहेत. वाचनकौशल्य, श्रवणकौशल्य आणि संवादकौशल्य या तिन्ही गोष्टींसाठी हे अ‍ॅप मदत करतं. नव्या परिभाषेतलं इंग्रजी इथं ऐकण्याचा सराव करता येतो. त्याचा अर्थबोध वाढतो. उच्चार सुधारता येतात. डिक्शनरीही आहे. अरेबिक, चायनिज यांसह हिंदी डिक्शनरीही यात आहे. त्यामुळे हे अ‍ॅप वापरायला सोपं आहे.
प्ले स्टोअरमध्ये ते उपलब्ध आहे.
 
२) लिसन अ‍ॅण्ड स्पीक
अनेकदा होतं काय आपल्याला एखाद्या थीमवर भाषण करायचं असतं. त्यासाठीचे शब्द हवे असतात पण ते काही जमत नाही. हे अ‍ॅप तुम्हाला थीम बेस कण्टेट ऐकवतं. त्यामुळे कानाला ते शब्द सरावाचे होतात. मुख्य म्हणजे इंग्रजी ही आपल्यासाठी परकी भाषा असली आणि आपण मातृभाषेत विचार करत असलो, तरी या अ‍ॅपमधला थीम कण्टेट ऐकून ऐकून मूळ इंग्रजी बोलणाऱ्यांच्या शुद्ध उच्चारांप्रमाणे आपण बोलू, ऐकू शकतो.
ज्यांना उत्तम इंग्रजी ऐकण्याचा सराव करायचा, त्यांच्यासाठी हे अ‍ॅप उत्तम.
हे अ‍ॅपही प्ले स्टोअरमध्ये मिळू शकतं.
 
३) स्पीक इंग्लिश
इंग्रजी सुधारायला मदत करणारं हे आणखी एक अ‍ॅप.
ऐकायचं, बोलून पाहायचं, पुन्हा ऐकायचं, पुन्हा बोलून पाहायचं आणि आपले उच्चार नीट आहेत का हे तपासायचं. ते तपासून उच्चार दुरुस्त करत राहायचं. हे अ‍ॅप हा एक उत्तम खेळ असावा इतक्या सोप्या रीतीनं इंग्रजी शिकवतं.  हे प्ले स्टोअरमध्ये मिळू शकतं. 
४) Enstint brain trainer HD
 
इतरांशी संवाद साधायचा तर तो स्वत:शीही साधता यायला हवा. त्यासाठी उपयोगी ठरावं असं हे एक अ‍ॅप. हे आपल्या मेंदूलाच विविध कोडी घालून ट्रेन करतं. त्यातून आपली कोडी सोडवण्याची क्षमता तर वाढतेच; पण आपण कुठल्यावेळी कसा विचार करतो, कसे निष्कर्ष काढतो हेदेखील त्यातून आपलं आपल्यालाच कळत जातं. जसा तुमचा स्कोअर वाढेल तशी कोडी अवघड होत जातात. पण मेंदूला चांगला व्यायाम होत स्वत:शी बोलायची सवय लागते.
 
५) Lift
फार मोठं जाऊद्या, आपल्याला आपल्या छोट्या छोट्या सवयी बदलायच्या असतात. पण त्या बदलत नाहीत. म्हणजे रोज रात्री झोपताना दात घासायचे. पण ते राहून जातं, विसर पडतो. मग त्याचा गिल्ट वाटतो. त्या छोट्या सवयींसाठी हे अ‍ॅप. तुम्हाला ते आठवण करतं, रोज चांगलं काम केलं आणि ते झाल्याचं टीक केलं की शाबासकी देतं. सध्या हे अ‍ॅप फक्त आयफोनवर उपलब्ध आहे. पण लवरकच अ‍ॅण्ड्रॉइडवर उपलब्धही होऊ शकेल!