शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

३ दोस्त आणि १०० माणसं

By admin | Updated: April 28, 2016 13:53 IST

रेल्वेच्या सेकंडक्लास डब्यातून विनाआरक्षण प्रवास करत देशाची चारी टोकं फिरणाऱ्या दोस्तांचा आॅँखो देखा विशेष रिपोर्ट.

- आॅक्सिजन टीम

तीन दोस्त.मुंबईकर. उच्चशिक्षित.मात्र नोकरी आणि बड्या पगाराच्या मळलेल्या वाटा सोडून आपले क्रिएटिव्ह आनंद शोधत त्याप्रमाणे करिअरची वाट चालणारे..समर्थ महाजन, रजत भार्गव, ओमकार दिवेकर.एकदा समर्थच्या आॅफिसमध्ये बसलेले असताना घमासान चर्चा, ब्रेनस्टॉर्मिंग चाललं होतं. समर्थ आयआयटीवाला. मात्र ती लाइन सोडून क्रिएटिव्ह डिरेक्टर होत कलेच्या जगात आपला आनंद शोधणारा.दोस्तांशी चाललेल्या घमासान चर्चेत त्यानं एक कल्पना मांडली की, आपल्याला माणसं, त्यांचं जगणं, जग, सुखदु:ख समजून घ्यायची, आपला देश पाहायचा तर आपण रेल्वेनं देशाच्या चारी दिशांना जाऊ! तेही विनाआरक्षित जनरल कम्पार्टमेण्टमधून..त्यात जे दिसेल, सापडेल, अनुभव येतील, ते सारे आपले!रजत आणि ओमकारलाही ती आयडिया आवडली.रजत पटकथा लेखक, तर ओमकार सिनेमॅटोग्राफर.काहीही उद्देश नाही, कसलाही हेतू नाही.कुठलंही पर्यटन नाही, अमुक एक बघायचंच असा अट्टहास नाही, आणि कसलीही चंगळ नाही. मुख्य म्हणजे पर्यटक म्हणून आपला देश पाहायचा नाही, तर हा देश समजून घ्यायचा. इथल्या माणसांच्या जगण्यातून त्यातले ताणेबाणे समजून घ्यायचे एवढंच त्यांनी ठरवलं.सोबत फक्त प्रवासाचे टप्पे, ठिकाणं ठरवली. त्यासाठी किती वेळ लागेल हे अंदाजे प्लॅन केलं.आणि ‘देश पाहायचा, माणसं वाचायची’ म्हणत त्यांनी मुंबईहून सेकंडक्लास डबा गाठत बिनधास्त भ्रमंती सुरू केली..मुंबई-गुजरात-दिल्ली-काश्मीर-आसाम-तामिळनाडू-मुंबई असा मोठ्ठा प्रवास करत, रात्रंदिवस रेल्वेत बसून लोकांशी गप्पा मारत एक मोठा ऐवज कमवून ते मुंबईत परतले..या प्रवासात किमान १०० लोकांशी तरी त्यांच्या विस्तृत गप्पा झाल्या, प्रांत-भाषा-आर्थिक स्थिती-सामाजिक समस्या आणि व्यक्तिगत स्वप्न याची बदलती रूपं त्यांनी अनुभवलीच; पण त्यासोबत एक ठाम विश्वासही कमावला..ते म्हणतात, ‘‘प्रचंड गर्दीत सुविधांची पुरती वानवा. स्वत:साठी त्या गर्दीत जागा करून घेणंही अवघड अशा अवस्थेतही लोक इतरांना समजून घेतात, सामावून घेतात, गप्पा मारतात, सुखदु:ख वाटतात. हे किती वेगळं आहे. माणसं इतकी चांगली असू शकतात, याचा अनुभव एरवी घरबसल्या कसा यावा?’’अशाच थरारक अनआरक्षित प्रवासाची एक भन्नाट रेल्वे डायरी.१० ट्रेन, १७ दिवस, २६५ तास