शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
‘स्थानिक’ निवडणुकीत दोस्त दोस्त ना रहा! महायुती अन् महाविकास आघाडी फुटणार
8
चांदी दीड लाखांवर, ९ महिन्यांत ७५% लाभ! का वाढतेय चांदीची किंमत?
9
संपादकीय : संवेदनशीलतेचा पंचनामा! आता केवळ आर्थिक नव्हे, सरकारी मनाची कसोटी लागणार
10
आता विद्यार्थी ऑनलाइनही शाळेमध्ये दिसणार हजर; यू-डायस प्रणालीत प्रवेश नोंदीसाठी १७ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
11
राजेंद्र लोढांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; फॉरेन्सिक ऑडिट सुरू
12
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
13
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
14
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
15
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
16
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
17
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
18
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
19
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
20
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट

2019 हे वर्ष म्हणजे जगभरात रस्त्यावर उतरलेल्या तारुण्याची एक अस्वस्थ कहाणी!

By meghana.dhoke | Updated: December 19, 2019 08:15 IST

2019 हे वर्ष जगभरात तरुण मुलांच्या विशेषत: विद्याथ्र्याच्याच आंदोलनांनी गाजवलं. नुस्तं गाजवलं नाही, तर त्यापायी त्यांनी फटके खाल्ले, गोळ्या झेलल्या, मस्तवाल आणि अजस्र सत्तेसमोर ही तरुण मुलं ठाम उभी राहिली! आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी, न्याय हक्कांसाठी, कधी कामाच्या मोबदल्यासाठी, तर कधी स्व-निर्णयाच्या अधिकारांसाठी! आपलं सारं आयुष्य पणाला लावून ही मुलं रस्त्यावर उतरली आणि म्हणू लागली की, बाकी सगळं सोडा, आमच्या शिक्षणाचं बोला, रोजगाराचं बोला, आमच्या लोकशाही हक्कांचं बोला, आम्ही गुलाम नाही, त्यामुळे सत्ता म्हणेल तसं आम्ही वागणार नाही, तर सत्तेला आम्ही म्हणू तसं वागावं लागेल.

ठळक मुद्देजगभरातल्या सार्‍या तरुण आंदोलनांची नोंद घेणारा हा ‘ऑक्सिजन’चा विशेष अंक.

-मेघना  ढोके / कलीम  अजीम

जो साहील से टकराता है उसे तुफान कहते है और जो तुफान से टकराता है  उसे ‘जवान’ कहते है.- हे असे शेर कॉलेजातल्या वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धेत ऐकणार्‍यांच्या कानावर फेकले जातात. मात्र प्रत्यक्षात खरोखर असं तुफान अंगावर घेण्याचं साहस असतं का तरुण मुलांमध्ये?सध्या जगभर एकच चर्चा आहे की, विचारधारा संपल्याचा काळ आहे. म्हणजेच एण्ड ऑफ आयडिऑलॉजीचा काळ आहे. तरुण मुलांना साधं ‘डावं-उजवं’ कळत नाही. त्यांना पुरोगामी, सुधारणावादी कोण हे कळत नाही, मागास, जुनाट विचारांनी समाजाच्या पायात बेडय़ा घालणारे कोण हे कळत नाही, आय-मी-मायसेल्फ यापलीकडे ही तरुण मुलं आयुष्यच जगत नाही, इतका व्यक्तिकेंद्र असा हा तरुण आहे. त्यांना काय पडलंय, जगात काय चाललं आहे त्याचं? त्यांचा निषेध आणि संताप म्हणजे सोशल मीडियातले फॉरवर्ड आणि इमोटिकॉन्स. एक कॉपी-पेस्ट मारला, चार ओळी खरडल्या, एक अ‍ॅँग्री इमोटी टाकली की झाला त्यांचा सामाजिक प्रश्नातला सहभाग, संपली त्यांची जबाबदारी, त्यांना समाजाचंच काय स्वतर्‍च्या भवतालाचंही काही पडलेलं नाही, ते काय बदल घडवतील?-असे प्रश्न आजच्या तरुण पिढीविषयी  सर्रास  विचारले जातात. - मात्र हे खरं आहे का?

‘ऑक्सिजन’ने जरा शोधून पहायचं ठरवलं. भारतात आज जेएनयूच्या विद्याथ्र्यासह सारा ईशान्य भारत आणि आसाम तरुण मुलांच्या आंदोलनानं भडकला आहे. ही मुलं राजकीय निर्णयांना विरोध करत आपला हक्क मागत आहेत.पण ‘ही’ अशी आंदोलनं अपवाद आहेत का? आणि असतील तर जगभरात काय चित्र आहे.-शोधून पाहिलं तर आश्चर्य वाटेल की, सहज टपलीमारू शेरे मारावेत इतकं काही तरुण मुलांचं जग समाजापासून आणि वास्तवापासून तुटलेलं नाही. भारतात तर नाहीच नाही.जगभरातही नाही.खोटं वाटेल, पण 2019 हे साल जगभरात तरुण मुलांच्या विशेषतर्‍ विद्याथ्र्याच्याच आंदोलनांनी गाजवलं. नुस्तं गाजवलं नाही, तर त्यापायी त्यांनी फटके खाल्ले, गोळ्या झेलल्या, मस्तवाल आणि अजस्र सत्तेसमोर ते ठाम उभे राहिले.आणि भांडले, आपल्या देशातल्या लोकशाहीसाठी. न्याय हक्कांसाठी, कधी कामाच्या मोबदल्यासाठी तर कधी स्व-निर्णयाच्या अधिकारांसाठी.आपलं सारं आयुष्य पणाला लावून ही मुलं रस्त्यावर उतरली आणि म्हणू लागली की, बाकी सगळं सोडा, आमच्या शिक्षणाचं बोला, रोजगाराचं बोला, आमच्या लोकशाही हक्कांचं बोला, आम्ही गुलाम नाही, त्यामुळे  सत्ता म्हणेल तसं आम्ही वागणार नाही, तर सत्तेला आम्ही म्हणू तसं वागावं लागेल.***आणि त्या सत्ता तरी कोणत्या.?पाकिस्तानात फीवाढीच्या विरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले. त्यांचं नेतृत्व मुली करत होत्या.या मुली सरकारला जाब विचारत होत्या की, लष्करासाठीचा खर्च तुम्ही वाढवता आणि शिक्षणावरचा कमी करता, हे करण्याचा अधिकार तुम्हाला दिला कुणी?***इराकमधली 17-18 वर्षाची मुलं सरकारविरोधात उभी राहिली आणि म्हणाली, आमच्या देशावर आमची सत्ता; इराणची चालणार नाही.या मुलांना मरणाची भीती नाही.त्यांच्यातला एकजण सांगतो की, मरणाची वाट पाहत जगायचं की स्वतर्‍हून मरण पत्करायचं हाच पर्याय असेल तर भांडून तरी मरू!***इराणमध्ये पेट्रोल महागलं आणि बाकीही महागाई भडकली तरी तरुण रस्त्यावर होते.सरकारने इंटरनेट बंद केलं तर कुणीही न सांगता हजारो तरुण शहराशहरांत चौकांत आंदोलनं करू लागली.***हॉँगकॉँगच्या आंदोलनाचा 23 वर्षाचा तरुण विद्यार्थी नेता चीनसारख्या महाकाय सत्तेला पुरून उरला आहे.नाकीनव आणलेत त्यानं.

***जपानी तरुणींनी हायहिल्स, चष्मा ते अगदी पिरिएड्स या विषयात मल्टिनॅशनल कंपन्यांना आव्हान दिलं आहे.**फ्रान्समधली यलो वेस्ट चळवळ तर कामगारांच्या न्याय हक्कासाठी व्यवस्थेला नवे हादरे देते आहे.***2019 हे या तरुण आंदोलनांचं वर्ष आहे. त्यातून जगभरात सत्ताबदल झालाय का? समाजपरिवर्तन झालंय का?-तर नाही.मात्र पोराटोरांची आंदोलनं म्हणून या आंदोलनांना कुणी मोडीतही काढू शकलेलं नाही. तसं करण्यास धजावणार नाही.

त्याचं कारण एकच -तरुणांनी पुकारलेले हे बंड सुरुवात आहे. असू शकते. नव्या बदलाची. अख्ख्या जगभरातल्या सत्ताधार्‍यांना हादरे देणारी ग्रेटा थनबर्ग हा या वर्षाचा तरुण चेहरा आहे.एकेकाळी फ्रेंच राज्यक्रांतीही अशीच तर तरुणांच्या असंतोषानं जन्माला आली होती. म्हणूनच जगभरातल्या सार्‍या तरुण आंदोलनांची नोंद घेणारा हा ‘ऑक्सिजन’चा विशेष अंक.ही एक वेगळी दीवानी जवानी आहे.