शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

1984, कल्पनेतील गोष्ट आयुष्यात जगतो तेव्हा..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 08:42 IST

एकेकाळी जे फक्त कल्पनेत होतं, ते आयुष्य आपण जगतो तेव्हा..

1984 असं म्हणतात की काही गोष्टी ज्या निष्णात अभ्यासकाला किंवा त्या विषयातल्या तज्ज्ञाला कळत नाहीत, त्या एका सर्जनशील लेखकाला पटकन जाणवू शकतात. असंच काहीसं जॉर्ज ऑरवेल यांच्या १९८४ या कादंबरीबद्दल म्हणता येईल. १९८४ साली लिहिलेल्या या कादंबरीमध्ये एका अशा परिस्थितीचं वर्णन केलं आहे, जिथे एक देश कायम कोणत्या ना कोणत्या युद्धाला सामोरं जात आहे. या देशात माणसाला कोणतंही स्वातंत्र्य नाही, सदा सर्वकाळ त्यांच्यावर एक ‘बिग ब्रदर’ पाळत ठेवून आहे. इथे राजकीय सत्ता ही फक्त आणि फक्त स्वत:चा विचार करते, माणसांना कोणत्याही प्रकारचं विचार स्वातंत्र्य दिलं गेलेलं नाहीये.आज हे पुस्तक, या पुस्तकामध्ये घडणाºया गोष्टी, त्यांनी वापरलेलं तंत्रज्ञान हे सारं चक्क आज आपल्या अवतीभोवती आहे. ते आपण सर्रास वापरात असतो. ते वापरताना, आपल्याला आपलं स्वातंत्र्य, आपले विचार, त्यांच्यावर सरकारचा होणारा परिणाम याचा कोणताही विचार करत नसतो. नेमकं हेच चित्र जॉर्ज ऑरवेल यांनी या कादंबरीत रेखाटलं आहे.‘ओशिनया’ या काल्पनिक देशात राहणारे लोक, त्यांची स्वमग्नता, दुसºयांचा अजिबात विचार न करण्याची सवय, लोकांनी आपल्यासाठी पाहिलेल्या स्वप्नांच्या मागे धावत गेलेलं अख्खं आयुष्य.. असं अतिशय निराशावादी वाटणारं चित्र आॅरवेल रंगवतो. वाचताना पुस्तकातल्या पात्रांबद्दल कमालीचं वाईट वाटायला लागत. पात्रांबद्दल राग येतो. पण हळूहळू आपल्याला पटायला लागतं की आपण जरा त्यांच्या सारखेच आहोत की!या पुस्तकात वापरलेली भाषा आज आपल्याला अनेक वेळा वापरली गेलेली दिसून येते. विशेषत: शब्द जसे, बिग ब्रदर, न्यूजिस्पक, थॉटक्राइम इत्यादी.जॉर्ज ऑरवेलच्या इतर अनेक पुस्तकांप्रमाणेच या पुस्तकाचं अनेक ठिकाणी रूपांतरण झालं आहे. लोकांनी भाषांतरे तर केलीच, पण अनेक चित्रपट, नाटकं, पुस्तकं या पुस्तकातल्या मूळ कल्पनेवर आधारलेली आहेत.यावर आधारलेला चित्रपट १९८४ हा यूट्यूबवरही तुम्हाला पाहता येईल. १९५६ साली प्रदर्शित झालेला हा चित्रपट पुस्तकात मांडलेल्या कल्पनांना चांगला न्याय देतो.ऑरवेल यांची इतर ‘राजकीय’ पुस्तकं जसं अ‍ॅनिमल फार्म किंवा होमेज टू कॅटालोनिया ही पुस्तकंही जरूर वाचा!