शहरं
Join us  
Trending Stories
1
८ दिवस रस्त्यावर आंदोलन, सरकार दखल घेईना; बिऱ्हाड आंदोलक मनसे प्रमुख राज ठाकरेंना भेटणार
2
मुंबईत लँडिंग आधी पायलटने 'PAN PAN PAN' मेसेज पाठवला; इंडिगोच्या विमानात नेमके काय घडले?
3
जीजू अन् मेहुणीचा सुरू होता बेडरूम रोमान्स, इतक्यात पती आला; पुढे जे घडलं त्यानं अख्खं गाव सुन्न झालं!
4
ज्येष्ठांसाठी जॅकपॉट आहे Post Officeची ही स्कीम; फक्त एकदा गुंतवा पैसे, दर महिन्याला ₹२०,५०० चं इन्कम फिक्स
5
Bihar Election: मोफत वीज देणार, ऑगस्टपासून योजना लागू; नितीश कुमारांनी केली घोषणा, किती यूनिट वीज देणार मोफत?
6
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
7
"मी तुझ्यावर प्रेम करतो, लग्न करशील?", जिनिलियाला चाहत्याचा मेसेज, अभिनेत्री म्हणाली- "मी विचार केला असता पण..."
8
राज्यातील आजी-माजी मंत्री, बडे अधिकारी हनी ट्रॅपमध्ये? कोण कोण अडकले...
9
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
10
फडणवीसांशी बोलले...! पुढे दोन पावलांवर ठाकरे-शिंदे आमने-सामने, बाजूला बसणे सोडा बघणेही टाळले
11
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
12
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
13
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
14
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
15
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
16
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
17
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
18
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
19
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
20
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती

मंदीतही उद्योग-व्यवसाय यशस्वी करण्याची 10 सूत्रं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 07:05 IST

ग्रामीण भागात छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय करणारे तरुण मुलं पटकन हबकून जातात. मात्र त्यांनी धीर न सोडता काही गोष्टी सावधपणे केल्या, तर मंदीतूनही संधीची वाट चालता येऊ शकेल.

ठळक मुद्देमंदीच्या चक्रात आपला उद्योग सापडून नुकसान होऊ नये म्हणून नवउद्योजकांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे.

- विकास पाटील.

सध्या मंदीची चर्चा बरीच आहे. कुणी कर्मचारी कपात केली, कुणी करणार आहे. मंदी येणार आहे अशा चर्चा माध्यमांपासून समाजमाध्यमांत तापल्या आहेत. अशा स्थितीत तरुण मुलांनी, विशेषतर्‍ जे छोटे-मोठे उद्योग करू पाहतात, त्यांनी कसं तगून राहायचं? तसं पाहता मंदी हा कोणत्याही उद्योग-व्यवसायाचा अविभाज्य भाग आहे. तेजी नंतर मंदी व मंदी नंतर तेजी हे चक्र  चालूच राहातं. मात्र मंदीचा सगळ्यात मोठा त्नास हा तरुण नवउद्योजकांना होतो. मात्र या मंदीच्या चक्रात आपला उद्योग सापडून नुकसान होऊ नये म्हणून नवउद्योजकांनी काही काळजी घेणं गरजेचं आहे. मुळात सजग राहून अत्यंत प्रॅक्टिकल दृष्टीनं आपल्या उद्योगाकडे पहायला हवं. विशेषतर्‍ ग्रामीण भागात छोटे-मोठे उद्योग-व्यवसाय करणारे तरुण मुलं पटकन हबकून जातात. त्यांनी धीर न सोडता काही गोष्टी सावधपणे केल्या तर मंदीतूनही संधीची वाट चालता येऊ शकेल.

* उद्योग हाच फोकसज्यावेळी आपला उद्योग-व्यवसाय व्यवस्थित चालू असतो त्यावेळी आपण बरेचवेळा आपल्या उद्योग-व्यवसायाकडे दुर्लक्ष करतो, फारशी काळजी करत नाही, कारण उद्योग-व्यवसाय अडचण नसतो; पण जेव्हा मंदीची चाहूल लागते तेव्हा मात्न त्याकडे अतिरिक्त लक्ष द्यायला हवं. यापूर्वी कधीही न लक्षात आलेल्या उद्योग- व्यवसायातील खाचाखोचा यानिमित्तानं तुमच्या लक्षात येतील. त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी मागे सारून आपल्या उद्योगावरच पूर्ण लक्ष केंद्रित करायला हवं. 

* नफावाढीवर लक्षबरीच वर्षे आपण उद्योग-व्यवसायातील नफ्याचा अभ्यास केलेला नसेल तर मंदीच्या निमित्ताने तुम्हाला तुमच्या उद्योग-व्यवसायातील नफावाढीसाठीचा अभ्यास करता येईल. आपला नफा उत्तम आणि रास्त मार्गानं कसा वाढेल, बाजारात किमती चढउतार कशा होतात, याकडे लक्ष द्या. 

* कच्चा माल किंमतकच्च्या मालाची किंमत ही नफ्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावते. मंदीत ज्यावेळी आपल्याला उत्पादनांच्या किमतीवर नियंत्नण ठेवायचं असतं अशावेळी कच्च्या मालाच्या खरेदीत थोडीसी सजगता दाखवली तर पैसे वाचू शकतात. त्यातून काही पैसे वाचले तर त्याचा ग्राहकाला फायदा देऊन मंदीतही आपण ग्राहक टिकवूच पण त्याबरोबर नवीन ग्राहक जोडू शकतो. 

* कर्ज-व्याज फेडताय ना?ज्यावेळी मंदी नसते त्यावेळी आपण व्याजदराची फारशी काळजी करत नाही; परंतु मंदीची चाहूल लागल्यावर आपले व्याज किती जातंय याचा अभ्यास करा. कमीत कमी व्याज कसं जाइल याचा विचार करा. बॅँकेशी चर्चा करून व्याजदरात कपात करून घ्या. त्याचबरोबर यानिमित्ताने काही अनुदानांचे आपल्या व्यवसायाला लाभ घेता येईल का? याचाही विचार करा. व्याज वेळच्या वेळी फेडा.

* उपलब्ध मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापरव्यवसाय टिकवायचा असेल तर उपलब्ध मनुष्यबळाचा जास्तीत जास्त वापर करून घेता यायला हवा, तरच खर्चावर नियंत्रण राहील आणि दर्जावरही. ग्राहकाला कमीत कमी दरात उत्पादन देता येइल. मनुष्यबळावर अतिरिक्त खर्च करणं मंदीत शक्य नसतं, मात्र उत्तम मनुष्यबळ टिकवून ठेवणंही गरजेचं असतं,  हा तोल सांभाळा.

* कन्झ्युमर कनेक्ट    उद्योग-व्यवसायात काही ग्राहक नाराज होणं साहजिकच आहे. मात्र असे नाराज ग्राहक निवडून, त्यांच्याशी संपर्क करून त्यांना पुन्हा आपल्याशी जोडून आपण नवीन नातं निर्माण करू शकतो. 

नवीन ग्राहक जोडानवीन ग्राहक जोडणं ही निरंतर चालणारी प्रक्रिया असते. ज्यावेळी सगळीकडे बाजारात मरगळ असते, अशावेळी तुमचे स्पर्धक कदाचित नवीन ग्राहक  जोडण्याच्या मनर्‍स्थितीत नसतात त्याचाच फायदा घेऊन आपण नवीन ग्राहक जोडायला हवा.

 *खर्च कमी करा!पैसे वाचवणं म्हणजेच पैसे मिळवण्ां हे तर आपल्या सर्वाना माहीतच आहे. त्यामुळे जी साधनं आहेत, ती पूर्णतर्‍ वापरा. अनावश्यक खर्च टाळा. आवश्यक खर्चातून जास्तीत जास्त लाभ मिळेल असा विचार करा. वीजबचत, पाणीबचत यापासूनही खर्चात कपातीची सुरुवात होऊ शकते.

* उचलीवर नियंत्रण ठेवाउद्योजक म्हणून आपल्याला उचल घेणं गरजेचं असतं. परंतु बरेचवेळा अनियंत्नित उचल व्यवसायाला अडचणीत आणू शकते. उचल कमी करायची असेल तर प्रथमतर्‍ आपल्याला आपल्या खर्चावर नियंत्नण आणणं गरजेचं आहे. जेवढा आपला खर्च कमी तेवढा उद्योग- व्यवसायावरील उचलीचा भार कमी.

* उधारीवर नियंत्रण ठेवाकाही व्यवसाय असे असतात की जे उधार दिल्याशिवाय चालूच शकत नाहीत; परंतु ही उधारी वेळेवर वसूल करणं गरजेचं असतं. उधारी जेवढी जास्त दिवस दिली जाते तेवढं व्यवसायातील खेळते भांडवल कमी होत जाते. त्यामुळे ते टाळा.

( लेखक कर सल्लागार आहेत.)