शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
2
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
3
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
4
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
5
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
6
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
7
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
8
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
9
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
10
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
11
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
12
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
13
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
14
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
15
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
16
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
17
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
18
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
19
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
20
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

झिम्बाब्वेचा पहिला विजय; भारतावर १० धावांनी मात

By admin | Updated: July 19, 2015 22:21 IST

चामू चिभाभाच्या (६७) अर्धशतकी खेळीनंतर लेग स्पिनर ग्रीम क्रेमरच्या (१८ धावांत ३ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर झिम्बाब्वेने रविवारी भारताचा १० धावांनी पराभव केला

हरारे : चामू चिभाभाच्या (६७) अर्धशतकी खेळीनंतर लेग स्पिनर ग्रीम क्रेमरच्या (१८ धावांत ३ बळी) अचूक माऱ्याच्या जोरावर झिम्बाब्वेने रविवारी भारताचा १० धावांनी पराभव केला आणि दोन टी-२० सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत सोडवली. प्रथम फलंदाजी करताना झिम्बाब्वेने ७ बाद १४५ धावांची समाधानकारक मजल मारली आणि भारताचा डाव ९ बाद १३५ धावांत रोखला. या पराभवासह भारताची झिम्बाब्वे दौऱ्याची सांगता झाली. या पराभवामुळे भारताचे वन-डे मालिकेप्रमाणे टी-२० मालिकेतही क्लीन स्वीप देण्याचे स्वप्न भंगले.भारताच्या युवा संघाने या दौऱ्यात तीन वन-डे सामन्यांच्या मालिकेत ३-० ने विजय मिळवला तर टी-२० सामन्यांची मालिका १-१ ने बरोबरीत संपली. टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झिम्बाब्वेचा हा भारताविरुद्ध पहिला विजय आहे. यापूर्वी झिम्बाब्वेने भारताविरुद्ध सर्व तीन टी-२० सामने गमाविले आहेत. लक्ष्याचा पाठलाग करताना भारतातर्फे रॉबिन उथप्पाने सर्वाधिक ४२ धावा केल्या. १२ धावांच्या अंतरात चार बळी गमावणे भारतासाठी सामन्याचा टर्निंग पॉर्इंट ठरला. भारताच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. पहिल्याच षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे (४) चोरटी धाव घेण्याच्या प्रयत्नात बाद झाला. त्याच्या स्थानी आलेल्या उथप्पाने गोलंदाजांवर वर्चस्व गाजवण्याचा पवित्रा स्वीकारला. उथप्पा व विजय खेळपट्टीवर असताना भारत सहज विजयाची नोंद करेल असे वाटत होते. झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रजाने गोलंदाजीमध्ये वारंवार बदल केले, पण उथप्पाने तौराई मुजारबनी, ख्रिस मोफू आणि चिभाभा यांच्या गोलंदाजीवर सहज चौकार वसूल केले. विजयने सीन विलियम्सनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आपला निर्धार जाहीर केला. पहिल्या सात षटकांत गोलंदाजीमध्ये केलेला सहावा बदल झिम्बाब्वेसाठी यश देणारा ठरला. एकवेळ १ बाद ५७ अशा मजबूत स्थितीत असताना भारताची ५ बाद ६९ अशी घसरगुंडी उडाली. लेग स्पिनर क्रेमरने सुरुवातीला विजय (११ चेंडू,१३ धावा) आणि त्यानंतर मनीष पांडे (०) यांना तंबूचा मार्ग दाखवला. उथप्पाने आपल्या खेळीत ९ चौकार ठोकले. भारतातर्फे अखेरच्या वन-डेमध्ये शतकी खेळी करणारा केदार जाधव आज केवळ ५ धावा काढून बाद झाला. स्टुअर्ट बिन्नी (२३ चेंडू, २४ धावा) आणि संजू सॅम्सन (२४ चेंडू, १९ धावा) यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण नेट रनरेट वाढल्यामुळे त्यांच्यावर दडपण आले. क्रेमरने बिन्नीला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. भारताला अखेरच्या तीन षटकांत विजयासाठी ३२ धावांची गरज होती. भारताची भिस्त पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या सॅम्सनवर होती, पण मोफूच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात तो सीमारेषेवर झेल देत माघारी परतला. अक्षर पटेल (१३) आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. भारताने अखेरच्या पाच षटकांत केवळ ३० धावा फटकावल्या आणि चार फलंदाज गमावले. त्याआधी, सलामीवीर चामू चिभाभाच्या (६७) अर्धशतकी खेळीनंतरही भारतीय गोलंदाजांनी झिम्बाब्वेचा डाव ५ बाद १४५ धावांत रोखला. चिभाभाने ५१ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार लगावले. धावफलकझिम्बाब्वे :- हॅमिल्टन मस्काद््जा झे. उथप्पा गो. संदीप शर्मा १९, चामू चिभाभा त्रि. गो. भुवनेश्वर ६७, सिकंदर रजा झे. सॅम्सन गो. मोहित शर्मा ०८, सीन विलियम्स झे. व गो. पटेल १७, चार्ल्स कॉव्हेंट्री पायचित गो. बिन्नी ०४, क्रेग इर्व्हिन त्रि. गो. भुवनेश्वर ०७, माल्कम वालेर नाबाद ०६, प्रॉस्पर उत्सेया झे. पटेल गो. मोहित शर्मा ०१, ग्रीम क्रेमर नाबाद ००. अवांतर (१६). एकूण २० षटकांत ७ बाद १४५. बाद क्रम : १-२८, २-४८, ३-८५, ४-११३, ५-१३२, ६-१३९, ७-१४२. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-२६-२, संदीप शर्मा ४-०-३९-१, बिन्नी २-०-१४-१, मोहित शर्मा ४-०-२८-२, विजय २-०-९-०, पटेल ४-०-२३-१. भारत :- अजिंक्य रहाणे धावबाद ०४, मुरली विजय त्रि. गो. क्रेमर १३, रॉबिन उथप्पा झे. व गो. विलियम्स ४२, मनीष पांडे पायचित गो. क्रेमर ००, केदार जाधव धावबाद ०५, स्टुअर्ट बिन्नी झे. चिभाभा गो. क्रेमर २४, संजू सॅम्सन झे. वालेर गो. मोफू १९, अक्षर पटेल झे. विलियम्स गो. मुजारबनी १३, भुवनेश्वर कुमार धावबाद ०९, मोहित शर्मा नाबाद ०३, संदीप शर्मा नाबाद ०३. अवांतर (०२). एकूण २० षटकांत ९ बाद १३५. बाद क्रम : १-४, २-५७, ३-५७, ४-६१, ५-६९, ६-१०५, ७-११७, ८-१२४, ९-१३१. गोलंदाजी : उत्सेया ३-०-१८-०, मुजारबनी ३-०-२३-१, मोफू ३-०-२६-१, चिभाभा १-०-९-०, विलियम्स ४-०-३१-१, क्रेमर ४-०-१८-३, रजा २-०-९-०.(वृत्तसंस्था)