शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B व्हिसा पार्श्वभूमीवर एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
4
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
5
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
6
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
7
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
8
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
9
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
10
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
11
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
12
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
13
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
14
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
15
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
16
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
17
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
18
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
19
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
20
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  

न्यूझीलंडकडून झिम्बाब्वेचा धुव्वा

By admin | Updated: August 4, 2015 22:50 IST

सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि टॉम लॅथमच्या नाबाद शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने झिम्बाब्वेचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवला

हरारे : सलामीवीर मार्टिन गुप्टिल आणि टॉम लॅथमच्या नाबाद शतकांच्या जोरावर न्यूझीलंडने झिम्बाब्वेचा दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवला. त्यांनी हा सामना दहा गड्यांनी जिंकला. याबरोबरच त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली आहे. लक्ष्याचा पाठलाग करताना एकही गडी न गमावता मिळवलेला हा सर्वांत मोठा विजय ठरला. यापूर्वी हा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. त्यांनी २०११ च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात इंग्लंडविरुद्ध २३१ धावांचा पाठलाग करताना एकही गडी न गमावता विजय मिळवला होता. झिम्बाब्वेने सिकंदर राजा (नाबाद १००) याच्या योगदानामुळे खराब सुरुवातीनंतरही ९ बाद २३५ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडने एकही गडी न गमावता ४६ चेंडू राखत सामना जिंकला. यामध्ये गुप्टिलने नाबाद ११६, तर लॅथमने ११० धावांची नाबाद खेळी केली. गुप्टिलने १३८ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने शानदार शतक झळकाविले. तर लॅथमने ११६ चेंडूंचा सामना करीत सात चौकार आणि दोन षटकार ठोकत ११० धावा केल्या. त्याची ही सर्वाेत्कृष्ट खेळी ठरली. आता मालिकेतील निर्णायक सामना याच मैदानावर शुक्रवारी रंगणार आहे.संक्षिप्त धावफलक : झिम्बाब्वे ५० षटकांत ९ बाद २३५ (चिभाबा ४५, विलियम्स २६, सिकंदर राजा १००) गोलंदाजी : सोधी-३८/३. न्यूझीलंड : ४२.२ षटकांत बिनबाद २३६. गुप्टिल नाबाद ११६, लॅथम नाबाद ११०.