शहरं
Join us  
Trending Stories
1
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
2
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
3
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
4
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
5
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
6
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
7
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
8
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
9
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
10
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
11
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
12
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
13
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
14
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
15
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
16
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
17
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
18
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको
19
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
20
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र

झिम्बाब्वे काढला पाकचा घामटा

By admin | Updated: March 2, 2015 00:52 IST

वहाब रियाजची अष्टपैलू कामगिरी व मोहम्मद इरफानचा अचूक मारा याच्या जोरावर पाकिस्तानने विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या लढतीत झिम्बाव्बेचा

ब्रिस्बेन : वहाब रियाजची अष्टपैलू कामगिरी व मोहम्मद इरफानचा अचूक मारा याच्या जोरावर पाकिस्तानने विजयाचे पारडे दोलायमान असलेल्या लढतीत झिम्बाव्बेचा २० धावांनी पराभव केला आणि २०१५ च्या विश्वकप क्रिकेट स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली. भारत व वेस्ट इंडिजविरुद्ध मोठ्या फरकाने पराभव स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघावर झिम्बाब्वेविरुद्धही पराभवाची नामुष्की ओढवणार, असे चित्र होते. पाकिस्तान संघाला ७ बाद २३५ धावांची मजल मारता आली. पाकच्या डावात कर्णधार मिसबाह उल-हक (१२१ चेंडू ७३ धावा) आणि वहाब रियाज (४६ चेंडूंत नाबाद ५४ धावा) यांची कामगिरी उल्लेखनीय ठरली. रियाजने गोलंदाजीमध्येही छाप सोडताना ४५ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. त्याला मोहम्मद इरफानची (४-३०) योग्य साथ लाभली. झिम्बाब्वेपुढे मोठे लक्ष्य नसले तरी ३० ते ४० षटकांदरम्यान त्यांनी ५ विकेट गमाविल्यामुळे ते बॅकफूटवर आले. झिम्बाब्वेचा डाव ४९.४ षटकांत २१५ धावांत संपुष्टात आला. झिम्बाब्वेतर्फे ब्रेन्डन टेलरने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. पाकिस्तान संघाचा या स्पर्धेतील हा पहिला विजय आहे. या निकालामुळे ‘ब’ गटात पाकिस्तान संघाला गुणतालिकेतील स्थानात सुधारणा करण्यात यश मिळाले. चौथा सामना खेळणाऱ्या झिम्बाब्वे संघाला तिसऱ्यांदा पराभवाला सामोरे जावे लागले.आजच्या लढतीत पाक संघाची भिस्त गोलंदाजांच्या कामगिरीवर अवलंबून होती. इरफानने झिम्बाब्वेचे दोन्ही सलामीवीर चामू चिभाभा (९) आणि सिकंदर रजा (८) यांना सातव्या षटकात माघारी परतवले. टेलरने त्यानंतर हॅमिल्टन मासकाद््जा (२९) व सीन विलियम्स (३३) यांच्या साथीने अनुक्रमे ५२ व ५४ धावांची भागीदारी केली. इरफानने मासकाद््जाला बाद केले. मिसबाहने त्याचा झेल टिपला. रियाजने टेलरचा अडथळा दूर केला. क्रेग इर्विन (१४) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. कर्णधार एल्टन चिगुंबुराने (३५) संघर्ष केला, पण संघाचा पराभव टाळण्यात अपयशी ठरला. त्याआधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या पाकिस्तान संघाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर नासीर जमशेद (१) आणि अहमद शहजाद (०) माघारी परतले त्यावेळी धावफलकावर केवळ ४ धावांची नोंद होती. त्यानंतर मिसबाहने संयमी फलंदाजी करीत हारिस सोहेलसोबत (४४ चेंडू २७ धावा) ५४ धावांची तर उमर अकमलसोबत (४२ चेंडू ३३ धावा) ६९ धावांची भागीदारी करीत डाव सावरला.पाकिस्तानची धावगती संथ होती. रियाज खेळपट्टीवर आल्यानंतर पाकिस्तानच्या धावगतीला वेग आला. त्याने अर्धशतकी खेळी ६ चौकार व एका षटकाराने सजवली. त्याआधी शोएब मकसूदने २१ धावांची खेळी केली, पण शाहिद आफ्रिदीने (०) पुन्हा एकदा निराशा केली. विश्वकप स्पर्धेत वाढदिवसाच्या दिवशी शून्यावर बाद होणारा तो दुसरा फलंदाज ठरला.