मेलबोर्न : भारताचा युवा टेनिसपटू युकी भांबरी याने आॅस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेच्या क्वालिफायर लढतीत शानदार विजय मिळवून आगेकूच केली़ मात्र, सोमदेव देववर्मन आणि रामकुमार रामनाथन यांना पराभव स्वीकारावा लागला़जागतिक क्रमवारीत ३१४ व्या स्थानावर असलेल्या युकीने रशियाच्या १५ व्या मानांकनप्राप्त इवगेनी डोनस्कोई याच्यावर पहिल्या फेरीच्या सामन्यात ४-६, ७-६, ८-६ अशा फरकाने विजय मिळविला़ पुढच्या फेरीच्या सामन्यात आता युकीला २२ वर्षीय जपानच्या योशिहितो निशियोकाशी झुंज द्यावी लागणार आहे़ योशिहितो याने स्पर्धेतील अन्य लढतीत चिलीच्या गोंजालो लामा याला ६-२, ६-१ ने धूळ चारली़ भारताच्या सोमदेवला मात्र आपल्यापेक्षा कमी रँकिंग असलेल्या अमेरिकेच्या आॅस्टिन क्राईजेककडून ४-६, ६-३, ४-६ अशी मात खाण्याची नामुष्की ओढावली, तर जागतिक क्रमवारीत २८४व्या स्थानावर असलेल्या रामकुमारला जर्मनीच्या निल्स लँगरकडून ५-७, ६-४, ४-६ अशी मात खावी लागली़ (वृत्तसंस्था)
युकी भांबरीचा विजय
By admin | Updated: January 15, 2015 03:11 IST