शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

यू मुंबाचा विजयी ‘पंच’

By admin | Updated: July 25, 2015 01:14 IST

पहिल्या सत्रातील बचावात्मक खेळानंतर बलाढ्य यू मुंबाने अप्रतिम आक्रमक खेळ करताना यजमान बंगाल वॉरीयर्सला २९-२५ असे नमवत

कोलकाता : पहिल्या सत्रातील बचावात्मक खेळानंतर बलाढ्य यू मुंबाने अप्रतिम आक्रमक खेळ करताना यजमान बंगाल वॉरीयर्सला २९-२५ असे नमवत प्रो कबड्डी लीग स्पर्धेत सलग पाचव्या विजयासह विजयी ‘पंच’ लगावला. यासह यू मुंबाने २५ गुणांसह अग्रस्थान मजबूत केले. तत्पूर्वी अटीतटीच्या लढतीत पुणेरी पलटनला सलग तिसऱ्या पराभवासह दबंग दिल्लीविरुध्द ३७-३८ अशी हार पत्करावी लागली.यू मुंबा - बंगाल वोरीयर्स सामना पहिल्या १५ मिनीटात समान स्थितीमध्ये होता. मध्यंतराला यू मुंबाने ११-९ असे वर्चस्व राखले खरे, मात्र यजमानांनी जबरदस्त मुसंडी मारली. महेंद्र राजपूतने खोलवर चढाया केल्या. तर कर्णधार निलेश शिंदे आणि सचिन खांबे यांनी सुपर टॅकलसह मुंबईकरांना जेरीस आणले. बजीराव होडगेने देखील मजबूत पकडी केल्या. याजोरावर बंगालने मुंबईवर २३-१६ अशी ७ गुणांची मजबूत आघाडी घेतली. मात्र नंतर मुंबई कर्णधार अनुप कुमारने आक्रमक चढायांच्या जोरावर सामनाच फिरवला. त्याने सलग दोन चढायांमध्ये अनुक्रमे ३ व २ गडी मारुन मुंबईचे पुनरागमन केले. जीवा कुमारने पुन्हा एकदा जबरदस्त पकडी करत मुंबईच्या विजयात मोलाचे योगदान दिले. अखेरच्या मिनिटाला मुंबईने २९-२५ अशी आघाडी घेत विजयावर शिक्कामोर्तब केले.तत्पूर्वी, थरारकर झालेल्या सामन्यातील शेवटच्या चढाईत दबंग दिल्लीच्या पकडीतून पुणेरी पलटणचा कर्णधार वझीर सिंग मध्यरेषेपर्यंत पोहचण्यात दोन इंच कमी पडल्याने पुण्याला दिल्ली विरुध्द ३७-३८ असा पराभव पत्करावा लागला. ३९व्या मिनिटांपर्यंत पुणेकर ३७-३६ असे आघाडीवर होते. मात्र ४०व्या मिनिटाला दिल्लीच्या काशिलिंग आडकेने निर्णायक चढाईत एक गुण मिळवत सामना बरोबरीत आणला.