शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

यूथ आॅलिम्पिक : सौरभ चौधरीचे सुवर्ण यश; दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात गोल्डन नेम

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2018 02:24 IST

सौरभ चौधरी याने यूथ आॅलिम्पिकमध्ये बुधवारी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. भारतीय नेमबाजांची यूथ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली.

ब्युनासआयर्स : सौरभ चौधरी याने यूथ आॅलिम्पिकमध्ये बुधवारी दहा मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्ण पदक जिंकले. भारतीय नेमबाजांची यूथ आॅलिम्पिकमध्ये आतापर्यंतची ही सर्वोत्कृष्ट कामगिरी ठरली. १६ वर्षांच्या सौरभने २४४.२ गुणांची कमाई केली. त्याने द. कोरियाचा सुंग युन्हो (२३६.७) आणि स्वित्झर्लंडचा सोलारी जेसन (२१५.६) यांना मागे टाकले. आठ नेमबाजांच्या अंतिम फेरीत सौरभने दहापेक्षा अधिक गुणांची १८ वेळा नोंद केली.आशियाई क्रीडा स्पर्धा आणि ज्युनियर आयएसएसएफ विश्व चॅम्पियनशिोमध्ये सुवर्ण विजेत्या राहीलेल्या सौरभने पात्रता फेरीतही ५८० गुणांसह अव्वल स्थान पटकविले होते. काल १६ वर्षांच्या मनू भाकरने महिलांच्या पिस्तुल प्रकारात सुवर्ण जिंकले होते. सुरुवातीला दहापेक्षा कमी गुण चारवेळा घेणाऱ्या सौरभने आघाडी कायम राखली. त्याने १०.७, १०.४, १०.४ आणि १०.० गुणानसह वर्चस्व राखले. दरम्यान जेसन आणि युन्होकडून त्याला कडवे आव्हान मिळाले. आधी जेसन आघाडीवर होता. युन्होने त्याला मागे टाकले. सौरभने मधल्या कायात आघाडी कायम राखली होती.चार दिवसात चौथ्यांदा भारताच्या नेमबाजांनी पदक जिंकले आहे. शानू माने आणि मेहली घोष यांना रौप्य पदक मिळाले होते. सौरभने मागच्या महिन्यात झालेल्या आयएसएसएफ विश्व नेमबाजीत एअर पिस्तुलमध्ये विश्व विक्रमासह सुवर्ण जिंकले होते. त्यानंतर आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण जिंकणारा तो पाचवा भारतीय नेमबाज ठरला. (वृत्तसंस्था)अर्चना कामत पराभूतटेबल टेनिसमध्ये भारताच्या पदरी निराशा आली. स्पर्धेत शानदार वाटचाल केलेल्या अर्चना कामतची लक्षवेधी आगेकूच अखेर उपांत्य फेरीत संपुष्टात आली. चीनच्या दुसºया मानांकीत यिंगशा सुनविरुद्ध १-४ असा पराभव झाल्याने अर्चनाला स्पर्धेतील आपला गाशा गुंडाळावा लागला.दरम्यान, अर्चना उपांत्य फेरीत पराभूत झाली असली, तरी तिला स्पर्धेत कांस्य पदक जिंकण्याची संधी आहे. यासाठी तिला रोमानियाच्या आंद्रिया ड्रगोमनच्या कडव्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे.उपांत्य फेरीआधी अर्चनाने उपांत्यपूर्व फेरीत रंगलेल्या ७ गेममध्ये रंगलेल्या चुरशीच्या लढतीत बाजी मारली. यावेळी तिने अझरबैझानच्या नाइन जिंगचा १३-११, ८-११, ६-११, ११-३, ६-११, १२-१०, ११-७ असा पराभव केला.

टॅग्स :Youth Olympic Games 2018 युवा ऑलिम्पिक स्पर्धा 2018