ब्युनोस आयरिस : युवा जागतिक आणि युवा राष्ट्रकुल स्पर्धेत अनुक्रमे रौप्यपदक व सुवर्णपदक जिंकणाऱ्या जेरेमी लालरीनुंगाने भारताला यंदाच्या युवा ऑलिम्पिक स्पर्धेत पहिलेवहिले सुवर्णपदक पटकावून दिले. मिझोरमच्या या १५ वर्षीय वेटलिफ्टिंगपटूने त्याचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले. ६४ किलो वजनी गटात त्याने एकूण २७४ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले.
Youth Olympic Games 2018 : मिझोरामच्या जेरेमीने भारताला जिंकून दिले पहिले सुवर्ण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 08:36 IST