ब्युनोस आयरिस : भारतीय युवा खेळाडूंना आपली प्रतिभा दाखवण्याची संधी युवा ऑलिम्पिक स्पर्धेत मिळणार आहे. अर्जेंटिनाची राजधानी ब्युनोस आयरिस येथे आजपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आज होणार असून मुख्य स्पर्धा रविवारपासून सुरू होईल. नेमबाज मनु भाकेर ही भारताची ध्वजधारक असणार आहे. या स्पर्धेत 206 देशांतील स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे. भारताचे 43 खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून 13 विविध क्रीडा प्रकारात ते पदकासाठी प्रयत्न करणार आहेत.
Youth Olympic Games 2018 : 'Google Doodle' कडून युवा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी खेळाडूंना शुभेच्छा
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 10:46 IST