शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी पलटनवर यू मुंबा ‘भारी’

By admin | Updated: August 17, 2015 22:51 IST

पुन्हा एकदा तगड्या यू मुंबाने आपला धमाकेदार खेळ कायम ठेवताना यजमान पुणेरी पलटनला त्यांच्या घरच्या मैदानावर ३९-३४ असे लोळवले. विशेष म्हणजे या सामन्यात दोन्ही संघांनी

विशाल शिर्के, पुणेपुन्हा एकदा तगड्या यू मुंबाने आपला धमाकेदार खेळ कायम ठेवताना यजमान पुणेरी पलटनला त्यांच्या घरच्या मैदानावर ३९-३४ असे लोळवले. विशेष म्हणजे या सामन्यात दोन्ही संघांनी आपल्या राखीव खेळाडूंना संधी दिली आणि यामध्ये मुंबईच्या नवोदितांनी मिळालेली संधी साधताना पुणेकरांना आपला हिसका दाखवला. या विजयासह यू मुंबाने ६० गुणांसहित अव्वल स्थान भक्कम केले असून, त्यांचा पुढील सामना तेलुगू टायटन्स विरुद्ध मंगळवारी होईल. तर, पुणेरी पलटन प्रतिष्ठा जपण्यासाठी घरच्या मैदानावर मंगळवारी व बुधवारी अनुक्रमे पटणा पायरेट्स व बंगळुरू बुल्स विरुध्द लढेल.कर्णधार अनुप कुमार, शब्बीर बापू, विशाल माने आणि रिशांक दिवाडिगा या चार स्टार खेळाडूंना विश्रांती देऊन मैदानात उतरलेल्या यू मुंबाने पुणेकरांना सहज लोळवले. या दिमाखदार विजयासह मुंबईकरांनी इतर प्रतिस्पर्ध्यांना धोक्याचा इशारा देताना आपली दुसरी फळी देखील मजबूत असल्याचे दाखवले. प्रदीप कुमारच्या नेतृत्वाखाली उतरलेल्या यू मुंबाने आक्रमक खेळ करताना पुणेकरांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला. पुणेरी पलटनेदेखील तोडीस तोड खेळ करताना मध्यंतराला १३-१३ अशी बरोबरी साधत सामन्यातील आव्हान कायम ठेवले.यानंतर मात्र यू मुंबाच्या खेळाडूंनी तुफान आक्रमण करताना यजमानांची हवा काढली. प्रदीपने जबरदस्त अष्टपैलू खेळ करताना एकहाती दबदबा राखला. तर फझेल अत्राचली आणि भूपेंद्र सिंग यांनी नेत्रदीपक पकडी करून पुणेकरांना जेरीस आणले. पुण्याकडून मनोज कुमार, मनोज धुल आणि अमित राठी यांनी अपयशी झुंज दिली. या सामन्यात पुणेरी पलटनला हुकमी वझीर सिंगची अनुपस्थिती जाणवली.