शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
थोडं थांबा, मोबाईल रिचार्ज १०-१२ टक्क्यांनी महाग होणार; मे महिन्याने कंपन्यांना एवढे भरभरून दिले...
3
Pune: पुणे रेल्वे स्थानकाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना, तरुणाला अटक!
4
अलिबागजवळ अरबी समुद्रात संशयित बोट; पोलिसांनी बोटीकडे जाण्याचा प्रयत्न केला, पण...
5
पगार आला की गायब होतोय? महिन्याच्या शेवटी खिसा रिकामा राहतोय? या सवयींनी व्हाल श्रीमंत
6
Viral Video : असं कोण करतं रे... भर मांडवात नवरदेवाला आडवा पाडला; एवढा गदारोळ कशासाठी? बघाच 
7
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
8
IND vs ENG 2nd Test: भारताच्या ऐतिहासिक विजयाचं श्रेय कुणाला? विराट कोहली म्हणाला...
9
"माझी बहीण १६ वर्षांनी लहान आहे, पण मी तिचं..." रश्मिका मंदानाने व्यक्त केली खंत
10
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
11
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
12
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
13
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
14
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
15
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
16
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
17
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
18
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
19
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
20
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...

योगेश्वर दत्त करणार भारताचे नेतृत्व

By admin | Updated: July 8, 2015 01:06 IST

लंडन आॅलिम्पिकचा कांस्य विजेता मल्ल योगेश्वर दत्त हा अमेरिकेतील लॉस वेगास येथे ७ ते १४ सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहे.

नवी दिल्ली : लंडन आॅलिम्पिकचा कांस्य विजेता मल्ल योगेश्वर दत्त हा अमेरिकेतील लॉस वेगास येथे ७ ते १४ सप्टेंबर या कालावधीत आयोजित होणाऱ्या विश्व कुस्ती स्पर्धेत भारतीय पथकाचे नेतृत्व करणार आहे.२०१६ च्या रियो आॅलिम्पिकचे तिकीट पक्के करण्यासाठी भारतीय मल्लांना विश्व स्पर्धेत चमकदार कामगिरी करावी लागेल. या स्पर्धेसाठी खाशाबा जाधव कुस्ती स्टेडियममध्ये भारतीय संघाची निवड चाचणी घेण्यात आली. ही चाचणी एखाद्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला साजेशी अशीच होती. छत्रसाल आखाड्याचे प्रतिनिधित्व करणारा योगेश्वर ६५ किलो वजनी गटात विजयी ठरला. चुरशीच्या लढतीत त्याने अमित धनकड याच्यावर ६-३ ने विजय साजरा केला. अमित कुमार याने संदीप तोमरवर ३-२ ने विजय नोंदविला. सलग दोन आॅलिम्पिकमध्ये पदक विजेता सुशील कुमार आणि राष्ट्रकुलचा पदक विजेता बजरंग(६१ किलो) हे जखमेमुळे चाचणीत सहभागी होऊ शकले नाहीत.लंडन आॅलिम्पिकचा कांस्य विजेता योगेश्वरशिवाय आॅलिम्पियन नरसिंग यादव, राष्ट्रकुल पदक विजेता अमित कुमार, आशियाई पदक विजेता मौसम खत्री यांनी आपापल्या अंतिम लढती जिंकून विश्व चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान पटकावले. अरुणला ७० किलो गटात पुढे चाल मिळाली. भारतीय कुस्ती महासंघाच्या निवड पॅनलच्या देखरेखीत चाचणी पार पडली. महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरणसिंग यांनी स्वत: उपस्थित राहून मल्लांना प्रोत्साहन दिले. ते म्हणाले, ‘‘चाचणी पाहण्यासाठी स्टेडियम खच्चून भरल्याचा मला आनंद आहे. यावरून आमच्याकडे मल्लांची दुसरी फळी सज्ज असून, भविष्यात पदक जिंकू शकतात, हा विश्वास आला. चाचणीच्यावेळी महाबली सतपाल, महासंघाचे उपाध्यक्ष राजसिंग आणि निवड समितीचे कार्यकारी सदस्य रेखा यादव यांनीदेखील हजेरी लावली.’’ (वृत्तसंस्था) भारतीय फ्री स्टाईल कुस्ती संघअमित कुमार ५७ किलो, सोनू ६१ किलो, योगेश्वर दत्त ६५ किलो, अरुण ७०, नरसिंग यादव ७४ किलो, नरेश कुमार ८६ किलो, मौसम खत्री ९७ किलो आणि सुमित १२५ किलो.कोटा मिळविणाऱ्यालाच आॅलिम्पिकला पाठवा : नरसिंग यादव> स्टार मल्ल सुशीलकुमार खांद्याच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने नरसिंग यादव याला आॅलिम्पिक कोटा मिळविण्यासाठी कुस्ती खेळण्याची संधी मिळाली. रियो आॅलिम्पिकसाठी आपली निवड व्हावी, यासाठी आपण कुठलीही कसर शिल्लक ठेवणार नसल्याचा निर्धार नरसिंगने व्यक्त केला.> २५ वर्षांच्या नरसिंगने प्रवीण राणा याला लोळवून विश्व चॅम्पियनशिपसाठी भारतीय संघात स्थान पटकावले. तो रियो आॅलिम्पिकची पात्रता मिळविण्याबद्दल आश्वस्त आहे. नियमानुसार आॅलिम्पिक कोटा हा खेळाडूला नव्हे, तर देशाला मिळतो. पुरुष फ्री स्टाईल संघाचे मुख्य कोच कुलदीप मलिक आणि सुशील यांनी आधीच स्पष्ट केले, की ७४ किलो वजनगटात भारतासाठी कोण खेळेल, याचा निर्णय रियो आॅलिम्पिकआधीच्या फॉर्मवर अवलंबून असेल. > नरसिंगचे विचार यापेक्षा वेगळे आहेत. तो म्हणतो, ‘‘ज्याने आॅलिम्पिक कोटा मिळविला असेल, त्याच मल्लाला आॅलिम्पिक खेळण्याची संधी देण्यात यावी.’’