शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
3
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
4
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
5
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
6
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
7
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
8
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
9
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
10
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
11
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
12
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
13
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
14
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
15
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
16
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
17
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."
18
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
19
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
20
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू

यंदाचे वर्ष माझ्यासाठी सुपर डुपर हिट - सानिया

By admin | Updated: November 21, 2015 01:24 IST

२०१५ या मोसमात स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने दोन ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकविले. शिवाय दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही झेप घेतली आहे. एका वर्षातील

हैदराबाद : २०१५ या मोसमात स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने दोन ग्रॅण्डस्लॅम जेतेपद पटकविले. शिवाय दुहेरीत जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावरही झेप घेतली आहे. एका वर्षातील या सरस कामगिरीची पुनरावृत्ती होणे कठीण असल्याचे मत सानियाने व्यक्त केले आहे.ती म्हणाली, ‘पुढील सत्रात यापेक्षा सरस कामगिरी करू शकलो नाही तरी किमान मागील वर्षी जे मिळविले ते कायम राखण्याचे आव्हान असेलच. यंदाच्या मोसमात जे कमविले त्यापेक्षा आणखी सरस करणे कठीणच आहे. मार्टिना हिंगीससोबत आणखी हखादी ग्रॅण्डस्लॅम जिंकणे आनंददायी ठरेल.’सानियाने मार्टिना हिंगीससोबत दोन ग्रॅण्डस्लॅमसोबतच अन्य आठ विजेतेपद देखील पटकविले आहेत. केवळ हेच वर्ष नव्हे तर माझे संपूर्ण करियर शानदार राहिले. यंदा मात्र आम्ही दोघींनी वर्चस्व कायम केले. मी आणि मािर्टनाने गेली अनेक वर्षे कठोर मेहनत केली त्याचे हे फळ आहे.’मी आणि मार्टिना एकमेकींना पूरक आहोत. परस्परांना आम्ही सहकार्य करतो. कोर्टच्या आत आणि बाहेरही आमचा समन्वय आहे. पुढील वर्षी आणखी आव्हान मिळण्याची शक्यता असल्याने गरज भासल्यास दोघीही खेळात बदल करण्याची तयारी ठवू, असे सानियाने सांगितले. यापेक्षा वेगळा बदल करण्याची गरज भासणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करीत सानिया पुढे म्हणाली, ‘पुढील सत्रात प्रतिस्पर्धी तीन जोड्या तयारीनिशी खेळणार असल्याने आम्हीदेखील जेतेपद कायम राखण्याच्या इराद्यानिशी खेळू. आम्ही दीर्घ काळापासून अपराजित असल्याने आम्हाला नमविण्याचा प्रतिस्पर्धी जोडी विचार करत असतील. गरज भासेल तेव्हा खेळात बदल करण्याची आमची तयारी आहेच पण माझ्यामते सध्यातरी खेळ आहे तसाच ठेवू. पदक जिंकण्यासाठी प्रत्येक खेळाडू खेळतो पण खेळात काहीही सातत्यपूर्ण नसते. विजय मिळाला नाही तरी जीवन थांबणार नाही. विजय मिळाला तर मात्र स्वप्नपूर्तीचा आनंद मिळतो. पुढील वर्षी आॅलिम्पिक पदक जिंकण्याची तयारी करीत आहे पण कुठल्याही स्पर्धेत पदक जिंकण्याची हमी नसल्याचेही सानियाने स्पष्ट केले. (वृत्तसंस्था)