शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

भारताच्या अंशू मलिकला रौप्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2020 02:21 IST

वैयक्तिक कुस्ती विश्व कप स्पर्धेत पदकाची मानकरी ठरलेली एकमेव भारतीय महिला मल्ल

बेलग्रेड : युवा अंशू मलिकने ५७ किलो वजन गटात रौप्यपदक पटकावत वैयक्तिक कुस्ती विश्व कप स्पर्धेत पदकाची मानकरी ठरलेली एकमेव भारतीय महिला मल्ल ठरली. ज्युनिअर गटात ओळख निर्माण केल्यानंतर सीनिअर गटात खेळत असलेल्या अंशूने या स्तरावर तीन स्पर्धेत पदकाचा मान मिळवला. बुधवारी रात्री झालेल्या अंतिम लढतीत अंशूला मालदाेवाच्या अनास्तासिया निचिताविरुद्ध १-५ ने पराभव स्वीकारावा लागला. अंशूने यंदा नवी दिल्ली आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक पटकावले होते तर जानेवारीमध्ये रोमध्या मातियो पेलिकोन स्पर्धेत रौप्यपदकाचा मान मिळवला होता. अंशूने ५७ किलो वजनगटात विश्व चॅम्पियनशिपची पदक विजेता पूजा ढांडा व अनुभवी सरिता मोर यांच्या उपस्थितीनंतरही या गटात आपला दावा मजबूत केला आहे.भारतीय मल्लाने आपल्या मोहिमेची सुरुवात अजरबेजानच्या एलयोना कोलेसनिकविरुद्ध ४-२ ने विजय मिळवित केली त्यानंतर क्वॉर्टर फायनलमध्ये जर्मनीच्या लॉरा मर्टेन्सचा ३-१ ने पराभव केला. अंशूने उपांत्य फेरीत रशियाच्या वेलोनिका चुमिकोव्हाला चित केले. एक अन्य भारतीय मल्ल पिंकीनेही ५५ किलो वजन गटात उपांत्य फेरी गाठली होती. उपांत्य फेरीत पिंकीला बेलारुसच्या इरीना कुराचकिनाविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. पिंकीला त्यानंतर कांस्यपदकाच्या लढतीत रशियाच्या ओल्गा खोरोशावत्सेव्हाविरुद्ध तांत्रिक आधारावर पराभवाला सामोरे जावे लागले. सरिता (५९ किलो), सोनम मलिक (६२) आणि साक्षी मलिक (६५) यांना आपापल्या गटात उपांत्यपूर्व फेरीच्या पुढे मजल मारता आली नाही. अनुभवी गुरशरणप्रीतने ७२ किलो गटात रेपेचेज गटात स्थान मिळवले, पण तांत्रिक दक्षतेच्या आधारावर तिला येवगेनिया जखारचेनकोविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. नरसिंग यादव, रवी दहिया यांचे आव्हान संपुष्टातडोपिंगमुळे चार वर्षांच्या बंदीनंतर पुनरागमन करणाऱ्या नरसिंग यादवचे  विश्वचषक कुस्ती स्पर्धेत पात्रता फेरीत आव्हान संपुष्टात आले. तसेच, टोकियो ऑलिम्पिकचे तिकीट पक्के करणाऱ्या रवी दहिया हाही प्रारंभीच स्पर्धेतून बाद झाला. या स्पर्धेत नरसिंग यादव फ्री स्टाईल गटाच्या ७४ किलो वजन गटात खेळला. या गटात भारताने आतापर्यंत ऑलिम्पिक कोटा मिळवलेला नाही.