शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

विश्व यूथ महिला बॉक्सिंग : नीतू, साक्षी सुवर्णपदकांच्या शर्यतीेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2017 03:17 IST

हरियाणाच्या कन्या नीतू घनघास आणि साक्षी चौधरी यांनी उपांत्य फेरीत विजय नोंदवित येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची शनिवारी अंतिम फेरी गाठली.

गुवाहाटी : हरियाणाच्या कन्या नीतू घनघास आणि साक्षी चौधरी यांनी उपांत्य फेरीत विजय नोंदवित येथे सुरू असलेल्या एआयबीए विश्व यूथ महिला बॉक्सिंग स्पर्धेची शनिवारी अंतिम फेरी गाठली. अनुपमाला मात्र लाईट हेवीवेट (८१ किलो) प्रकारात उपांत्य लढत कठीण गेली. रशियाची अनास्तासिया रिबेक हिच्याकडून ती ५-० अशी पराभूत होताच भारताला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. काल तीन खेळाडू तर आज दोन खेळाडूंनी अंतिम फेरीत धडक देताच भारतीय पथकाला पाच सुवर्णपदकांची आशा आहे.कर्मवीर नवीनचंद्र बारडोलाय इनडोअर स्टेडियममध्ये सायंकालिन सत्रात झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतींत भारतीय बॉक्सर सरस ठरले. नीतूने ४-१ ने विजय नोंदविला तर साक्षीने प्रतिस्पर्धी बॉक्सरवर निर्विवाद वर्चस्व गाजविले. सडपातळ पण काटक असलेल्या डावखुºया नीतूने लाईट फ्लाय प्रकारात अवघड आव्हान सर केले. सुवर्णपदकासाठी नीतूची अंतिम फेरीत गाठ पडेल ती कझाकिस्तानची झझिरा उराकबायेव्हा हिच्याविरुद्ध.बँटम प्रकारात (५४ किलो) हरियाणाची आणखी एक बॉक्सर साक्षी चौधरी हिने उपांत्य सामना एकतर्फी जिंकला. जपानची सेना इरी हिला साक्षीने दीड मिनिटाआधी नॉक आऊट केले. साक्षीचा ठोसा इरीच्या थेट जबड्यावर बसताच ती रक्तबंबाळ झाली. रेफ्रीने लढत मध्येच थांंबविण्याचा निर्णय घेत साक्षीला विजयी घोषित केले. अंतिम सामन्यात तिच्यापुढे इंग्लंडची इव्ही जेन स्मिथ हिचे आव्हान असेल.शुक्रवारी भारताच्या ज्योती गुलिया, शशी चोपडा आणि अंकुशिता बोरी यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय महिलांचा आतापर्यंतचे या स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन असेल. २०११ नंतर एकही सुवर्णपदक जिंकले नव्हते. सरजूबाला देवी आघाडीवर होती. २०१५मध्ये भारतीय संघाने फक्त एक कांस्यपदक जिंकले होते.या वेळी भारताच्या पाच महिला सुवर्णपदकाच्या लढतीत आहेत.

टॅग्स :boxingबॉक्सिंग