शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
3
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
4
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
5
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
6
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
7
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
8
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
9
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,
10
वधू-वरांनी एकमेकांना हार घातले; लग्नही झालं, पण, एका घटनेमुळे झाला घोळ, त्यानंतर...
11
मोबाइल सिग्नल वृद्धीसाठी मुंबई मेट्रोच्या आयबीएस सेवेचे दर दूरसंचार कंपन्यांना अमान्य
12
परभणीत लहान मुलांच्या वादातून दोन गटांमध्ये तुफान दगडफेक, वाहनांची नासधूस, शहरात तणावपूर्ण शांतता
13
बांगलादेशने तोडला इंदिरा गांधी-मुजीब उर रहमान यांच्या काळातील करार, सीमेवर केलं असं कृत्य 
14
विशेष लेख: तहव्वुर राणाला आणले, मेहुल चोक्सीचे काय? प्रत्यार्पणाचा इतिहास
15
"आता सुरूवात झालीय, येत्या काळात..."; देवेंद्र फडणवीसांचा महाविकास आघाडीला इशारा
16
विद्यार्थ्यांने धागा काढला नाही, म्हणून परीक्षेला बसवले नाही; कॉलेजच्या प्राचार्य अन् कर्मचाऱ्यांवर कारवाई
17
ट्रम्प यांच्या धोरणांविरुद्ध हजारो लोक रस्त्यावर उतरले, देशभर निदर्शनांची नवी लाट
18
सावध व्हा,  आलाय नवीन स्कॅम! तुम्ही तीर्थयात्रेचे पॅकेज ऑनलाइन बुक केले आहे का?
19
नियमांचे उल्लंघन कराल, तर वाळू डेपो होणार रद्द; महसूल मंत्र्यांचा इशारा

वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप : भारताच्या कोनेरु हम्पीने पटकावले ऐतिहासिक जगज्जेतेपद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2024 07:45 IST

"झोप झालेली नव्हती. येथे मी व्यवस्थित झोपू शकलेले नाही. त्यामुळे खेळणे सोपे नव्हते; पण तरीही मिळवलेले विजेतेपद संस्मरणीय आहे. माझी कामगिरी देशवासीयांना प्रेरित करेल."

न्यूयॉर्क : भारताच्या कोनेरू हम्पी हिने GORP रविवारी इंडोनेशियाच्या इरीन सुकंदर हिला पराभूत करताना ऐतिहासिक दुसऱ्यांदा वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. हम्पीने २०१९मध्ये जॉर्जिया येथे ही स्पर्धा जिंकली होती. भारताची आघाडीची महिला खेळाडू चीनच्या जू वेनजुन हिच्यानंतर एकपेक्षा अधिकवेळा या स्पर्धेचे विजेतेपद जिंकणारी दुसरी खेळाडू आहे. ३७ वर्षीय हम्पीने संभाव्य ११ पैकी ८.५ गुणांसह स्पर्धेचा शेवट केला.विजयानंतर हम्पी म्हणाली की, मी खूप उत्साहित आहे आणि मला खूप आनंद आहे. मला माहिती होते की एखाद्या ट्रायब्रेकसारखा हा खूप कठीण दिवस असेल. काळ्या मोहऱ्यांसह खेळणाऱ्या या भारतीय खेळाडूने सांगितले की, हे FREED विजेतेपद अगदीच अनपेक्षित आहे. कारण मी वर्षभर संघर्ष करत होतो आणि अनेक स्पर्धांमध्ये मी शेवटचे स्थान मिळवले त्यामध्ये अतिशय खराब कामगिरी केली होती. हम्पीच्या यशासह भारतीय बुद्धिबळासाठी एका अद्भुत वर्षाची अखेर झाली आहे. याआधी डी. गुकेशने सिंगापूर येथे नुकत्याच झालेल्या जागतिक अजिंक्यपदाच्या लढतीत चीनच्या डिंग लिरेनचा पराभव करून जगज्जेतेपद पटकावले होते. 

सप्टेंबरमध्ये भारताने बुडापेस्ट येथे बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पहिल्यांदाच खुल्या आणि महिला गटात सुवर्णपदक जिंकून इतिहास घडवला होता. हम्पीने या यशाचे श्रेय आपल्या कुटुंबाला दिले आहे. ती म्हणाली की, मला वाटते की माझ्या कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे शक्य झाले. माझे पती आणि आई-वडील यांनी मला पूर्ण पाठिंबा दिला. जेव्हा मी स्पर्धेसाठी बाहेर देशात जाते तेव्हा माझे आई-वडील माझ्या मुलीचा सांभाळ करतात. ३७व्या वर्षी जगज्जेतेपद पटकावणे सोपे नाही. जसजसे तुमचे वय वाढते तसे ती प्रेरणा टिकवून ठेवणे आणि आवश्यकतेनुसार तंदुरुस्त राहणे अधिक कठीण होते. मी हे करू शकले, याचा आनंद आहे. अनुभवी हम्पी म्हणाली की, पहिल्या फेरीतील पराभवानंतर मी विजेतेपदाबाबत विचारच केला नव्हता; पण त्यानंतर खेळ चांगला होत गेला आणि काल चार सामने जिंकण्यास मदत मिळाली. देशातील युवकांना मिळेल प्रेरणा हम्पीला भारत आणि अमेरिकेतील मोठ्या अंतरामुळे खेळाबाहेरच्या अनेक आव्हानांचा सामना करावा लागला. ती म्हणाली की, वेळेच्या फरकामुळे हा दौरा माझ्यासाठी अतिशय कठीण होता. 

-  झोप झालेली नव्हती. येथे मी व्यवस्थित झोपू शकलेले नाही. त्यामुळे खेळणे सोपे नव्हते; पण तरीही मिळवलेले विजेतेपद संस्मरणीय आहे. माझी कामगिरी देशवासीयांना प्रेरित करेल.-  देशातील अनेक तरुणांना डी. गुकेश आणि माझ्यामुळे व्यावसायिक बुद्धिबळ खेळण्याची प्रेरणा मिळेल. रशियाच्या १८ वर्षीय व्होलोडर मुर्जिनने पुरुष गटाचे विजेतेपद पटकावले.

महिला वर्ल्ड रॅपिड चेस चॅम्पियनशिप जिंकल्याबद्दल कोनेरु हम्पीचे मनापासून अभिनंदन. तिची चिकाटी आणि प्रतिभा लाखो लोकांना प्रेरणा देईल. हा विजय ऐतिहासिक आहे, कारण हे तिचे दुसरे विजेतेपद आहे. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय ठरली आहे. -नरेंद्र मोदी, पंतप्रधान

टॅग्स :Chessबुद्धीबळ