वर्ल्डकप
By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST
विजयाचा षटकार
वर्ल्डकप
विजयाचा षटकारविश्वकप स्पर्धेत भारताचा पाकवर सहावा विजयविराट कोहलीची शतकी खेळी, रैना व धवनची अर्धशतकेमोहम्मद शमीचे ३५ धावांत ४ बळी, मोहित शर्मा व उमेश यादवचे प्रत्येकी २ बळीॲडिलेड : विश्वकप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धचे वर्चस्व यावेळीही कायम राखले. विराट कोहलीच्या शतकी खेळीनंतर मोहम्मद शमीच्या नेतृत्वाखाली गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने रविवारी पाकिस्तानचा ७६ धावांनी पराभव करीत विश्वकप स्पर्धेत विजयी सलामी दिली. आजपर्यंत जे घडले नाही ते यावेळी घडणार, अशी आस ठेवून असणाऱ्या पाकिस्तानी चाहत्यांच्या पदरी या निकालामुळे पुन्हा एकदा निराशा पडली. भारताने वन-डे विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध सहाव्यांदा सरशी साधताना विजयाचा षटकार ठोकला. १९९२ मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या विश्वकप स्पर्धेपासून पाकिस्तानविरुद्ध प्रारंभ झालेली विजयाची मालिका यावेळीही भारताने कायम राखली. विश्वकप स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध शतकी खेळी करणारा विराट कोहली पहिला भारतीय फलंदाज ठरला. कोहलीने १२६ चेंडूंना सामोरे जाताना १०७ धावांची खेळी केली. शतकवीर कोहली व्यतिरिक्त सुरेश रैना (७४) आणि शिखर धवन (७३) यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानाच्या जोरावर भारताने ७ बाद ३०० धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना पाकिस्तानचा डाव ४७ षटकांत २२४ धावांत संपुष्टात आला. भारतातर्फे मोहम्मद शमी (३५ धावांत ४ बळी), मोहित शर्मा (३५ धावांत २ बळी) आणि उमेश यादव (५० धावांत २ बळी) यांनी अचूक मारा करीत पाकिस्तानचा डाव गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पाकिस्तानतर्फे कर्णधार मिसबाह उल-हकने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली.