शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

विश्वकप जोड १

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

पाकची आशा कर्णधार मिसबाह व शाहीद आफ्रिदी यांच्या कामगिरीवर होती. आफ्रिदीने जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आपला निर्धार स्पष्ट केला. त्यानंतर आफ्रिदीला मात्र विशेष चमक दाखविता आली नाही. शमीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात आफ्रिदीचा उडलेला झेल कोहलीने टिपला. आफ्रिदीने २२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. शमीने त्याच षटकात वहाब रियाज (४) याला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर पाकिस्तानने ३३ व्या षटकात पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेच्या पाच षटकात पाकिस्तानने आफ्रिदी व रियाज यांच्या विकेट गमावित ४४ धावा फटकाविल्या. दरम्यान, मिसबाहने कारकीर्दीतील ३९ वे अर्धशतक पूर्ण केले. मिसबाहने यासिर शाहच्या(१३) साथीने आठव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मोहितने यासिरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. पाकला अखेरच्या १० षटक

पाकची आशा कर्णधार मिसबाह व शाहीद आफ्रिदी यांच्या कामगिरीवर होती. आफ्रिदीने जडेजाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत आपला निर्धार स्पष्ट केला. त्यानंतर आफ्रिदीला मात्र विशेष चमक दाखविता आली नाही. शमीच्या गोलंदाजीवर आक्रमक फटका खेळण्याच्या प्रयत्नात आफ्रिदीचा उडलेला झेल कोहलीने टिपला. आफ्रिदीने २२ चेंडूंमध्ये २२ धावा केल्या. शमीने त्याच षटकात वहाब रियाज (४) याला तंबूचा मार्ग दाखविला. त्यानंतर पाकिस्तानने ३३ व्या षटकात पॉवर प्ले घेण्याचा निर्णय घेतला. पॉवर प्लेच्या पाच षटकात पाकिस्तानने आफ्रिदी व रियाज यांच्या विकेट गमावित ४४ धावा फटकाविल्या. दरम्यान, मिसबाहने कारकीर्दीतील ३९ वे अर्धशतक पूर्ण केले. मिसबाहने यासिर शाहच्या(१३) साथीने आठव्या विकेटसाठी ४९ धावांची भागीदारी केली. मोहितने यासिरला बाद करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. पाकला अखेरच्या १० षटकांत विजयासाठी १०७ धावांची गरज होती. शमीने त्यानंतर मिसबाहला रहाणेकडे झेल देण्यास भाग पाडत पाकला नववा धक्का दिला. मिसबाहने ८४ चेंडूंच्या खेळीमध्ये ९ चौकार मारले व १ षटकार ठोकला. मोहितने सोहेल खान (७) याला बाद करीत विजयाची औपचारिकता पूर्ण केली.
त्याआधी, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघातर्फे कोहलीने आपल्या आवडीच्या ॲडिलेड ओव्हल मैदानावर शतक झळकावित सूर गवसल्याचे सिद्ध केले. पाकिस्तानतर्फे युवा वेगवान गोलंदाज सोहेलने (५५ धावात ५ बळी) डेथ ओव्हरमध्ये अचूक मारा केल्यामुळे भारताला अखेरच्या पाच षटकांत केवळ २७ धावा फटकाविता आल्या. कोहलीने कारकीर्दीतील २२ वे शतक झळकाविताना सौरव गांगुलीच्या विक्रमाची बरोबरी केली. पाकला उंच चणीचा गोलंदाज मोहम्मद इरफानकडून चमकदार कामगिरी आशा होती, पण त्याने निराशा केली. १० षटकांत ५६ धावा बहाल करणाऱ्या इरफानची बळीच्या बाबतीत पाटी कोरीच राहिली.