नवी दिल्ली : विश्वचषक स्पर्धेनंतर लगेच आयपीएल स्पर्धा होत असली तरी किंग्ज इलेव्हन पंजाब संघाच्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारचा थकवा जाणवत नाही. घरच्या सराव सत्रात त्यांचा खेळही चांगला होत असून, संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असल्याचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी सांगितले. किंग्ज इलेव्हन पंजाबने गत आयपीएल स्पर्धेत साखळी सामन्यात चांगली कामगिरी केली होती. मात्र अंतिम सामन्यात कामगिरीत सातत्य राखण्यात खेळाडू अपयशी ठरले. या सत्रास संघ नव्याने समोरा जात असून, गत सत्रातील चुका ध्यानात घेऊन पुढे वाटचाल करेन. विश्वचषक समाप्तीनंतर केवळ दोन आठवड्यांतच आयपीएल होत आहे.
‘विश्वचषकचा थकवा नाही’
By admin | Updated: April 7, 2015 04:05 IST