Neeraj Chopra, World Athletics Championships : टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील गोल्ड मेडलिस्ट नीरज चोप्राने जागतिक अॅथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत भालाफेकीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. अंजू बॉबी जॉर्ज यांच्यानंतर जागतिक स्पर्धेत भारताला मागील १९ वर्षांत एकही पदक जिंकता आलेलं नाही. पदकाचा हा दुष्काळ नीरज चोप्राच संपवेल अशी सर्वांना अपेक्षा आहे आणि पात्रता फेरीत त्याने त्याची झलक दाखवून दिली. नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.३९ मीटर लांब भालाफेकला अन् अंतिम फेरीतील प्रवेश पक्का केला. त्याच्यापाठोपाठ झेक प्रजासत्ताकच्या जाकुब व्हॅद्लेचने ८५.२३ मीटरसह फायलनमधील स्थान पक्के केले. ८३.५०मीटर हे थेट फायनल प्रवेशासाठीचे लक्ष्य होते. नीरज प्रथमच या स्पर्धेत पदकाच्या शर्यतीत खेळणार आहे. अंतिम स्पर्धा रविवारी सकाळी ७.०५ वाजता होणार आहे.
Neeraj Chopra, World Athletics Championships : मारलं मैदान! पहिल्या प्रयत्नात नीरज चोप्रा फायनलमध्ये, आता पदकाचा दुष्काळ संपवणार, Video
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 06:19 IST