शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

मुंबई सुपर ओव्हरमध्ये विजयी

By admin | Updated: April 30, 2017 05:40 IST

हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सवर सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी चित्तथरारक विजय मिळवताना

राजकोट : हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये आज मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सवर सुपर ओव्हरमध्ये पाच धावांनी चित्तथरारक विजय मिळवताना प्लेआॅफच्या दिशेने मजबूत पाऊल टाकले आहे.आयपीएल १0 मधील पहिल्या टाय झालेल्या लढतीत मुंबईने प्रथम फलंदाजी करताना ११ धावा केल्या तर विजयासाठी १२ धावांचे लक्ष्य मिळालेल्या लायन्सला फक्त ६ धावाच करता आल्या.त्याआधी लायन्सच्या १५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पार्थिव पटेलच्या ४४ चेंडूंत ९ चौकार व एका षटकारासह फटकावलेल्या ७0 धावा आणि कृणाल पंड्याच्या २९ धावांच्या खेळीनंतरही मुंबई इंडियन्स २0 षटकात १५३ धावांत सर्वबाद झाला. त्यामुळे सामना टाय झाला. लायन्ससाठी आशा उंचावण्याचे श्रेय बासिल थंपी (२९ धावांत ३ बळी) आणि फॉकनर (३४ धावांत २ बळी) यांना जाते. या विजयामुळे मुंबईचे ९ सामन्यात १४ गुण झाले आहेत. लायन्सचे ९ सामन्यात ६ गुण झाले असून ते पाचव्या स्थानी कायम आहेत.पार्थिव पटेलच्या स्फोटक फलंदाजीमुळे मुंबईचा संघ लिलया विजय मिळवणार अशीच चिन्हे होती. एकवेळ त्यांची स्थिती ४ बाद १२७ अशी होती; परंतु त्यांनी अखेरचे ६ फलंदाज अवघ्या २६ धावांत गमावले. अखेरच्या षटकात विजयासाठी ११ धावांची गरज मुंबईला होती आणि कृणाल पंड्या याने पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकल्यानंतरही मुंबईला या षटकात १0 धावाच करता आल्या. त्याआधी कृणाल पंड्याच्या शानदार गोलंदाजीच्या बळावर मुंबई इंडियन्सने गुजरात लायन्सला ९ बाद १५३ या धावसंख्येवर रोखले होते. कृणालने त्याच्या कारकीर्दीत सर्वोत्तम गोलंदाजी करताना १४ धावांत ३ गडी बाद केले. जसप्रीत बुमराह आणि लसिथ मलिंगा यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले. यासाठी त्यांनी अनुक्रमे ३२ व ३३ धावा मोजल्या. हरभजनसिंगने २३ धावंत १ गडी बाद केला. लायन्सकडून सलामीवीर इशान किशनने सर्वाधिक ४८ धावा केल्या. अँड्र्यू टाय (१२ चेंडूंत २५ आणि जेम्स फॉकनर (२७ चेंडूंत २१ धावा) यांनी आठव्या गड्यासाठी १९ चेंडूंत ४३ धावांची भागीदारी करताना संघाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून दिली.सुपर ओव्हरमुंबई फलंदाजी : फलंदाज : जोस बटलर व केरॉन पोलार्ड, गोलंदाज : जेम्स फॉकनर, पहिला चेंडू : बटलर १ धाव, दुसरा चेंडू : पोलार्ड ४ धावा, तिसरा चेंडू : पोलार्ड षटकार, चौथा चेंडू : पोलार्ड फिंचकरवी झेलबाद, पाचवा : चेंडू बटलर इशान किशनकरवी झेलबाद, एकूण : ५ चेंडूंत २ बाद ११गुजरात लायन्स : फलंदाज : ब्रॅण्डन मॅक्युलम व अ‍ॅरोन फिंच, गोलंदाज : जसप्रीत बुमराह, पहिला चेंडू : नो बॉल, फ्री हिट (फलंदाज : फिंच), पहिला चेंडू : लेगबाय (फलंदाज : फिंच), दुसरा चेंडू : वाईड (फलंदाज : मॅक्युलम), दुसरा चेंडू : मॅक्युलम 0 धाव, तिसरा चेंडू : बाय (फलंदाज : मॅक्युलम), चौथा चेंडू : फिंच 0 धाव, पाचवा : फिंच १ धाव, सहावा चेंडू : मॅक्युलम १ धाव, एकूण : एका षटकात बिनबाद ६ धावा.संक्षिप्त धावफलकगुजरात लायन्स : २0 षटकांत ९ बाद १५३. (इशान किशन ४८, रवींद्र जडेजा २८, टाय २५. कृणाल पंड्या ३/१४, बुमराह २/३२, मलिंगा २/३३)मुंबई इंडियन्स : २0 षटकांत सर्वबाद १५३. (पार्थिव पटेल ७0, कृणाल पंड्या २९, पोलार्ड १९. बासिल थंपी ३/२९, फॉकनर २/३४)