शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महिला कुस्ती चाचणी : साक्षी मलिकवर सोनमची मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2020 05:59 IST

दोनवेळची विश्व कॅडेट चॅम्पियन सोनम मलिक हिने शनिवारी महिला कुस्ती चाचणीत रिओ आॅलिम्पिकची कांस्य विजेती मल्ल साक्षी मलिक हिच्यावर खळबळजनक मात केली.

लखनौ : दोनवेळची विश्व कॅडेट चॅम्पियन सोनम मलिक हिने शनिवारी महिला कुस्ती चाचणीत रिओ आॅलिम्पिकची कांस्य विजेती मल्ल साक्षी मलिक हिच्यावर खळबळजनक मात केली. दुसरीकडे ज्युनियर अंशु मलिक हिने विश्व चॅम्पियनशिपची पदक विजेती पूजा ढांढा हिच्यावर मात करीत आशियाई चॅम्पियनशिपचे तिकीट पक्के केले. सोनम आणि अंशु यांच्यापुढे सुरुवतीलाच बलाढ्य मल्लांचे आव्हान होते. मात्र, दोघींनीही साहसी कामगिरीच्या जोरावर बाजी मारली.फायनलमध्ये सोनमने साधिकाचा ४-१ असा पराभव करीत ६२ किलो गटात भारतीय संघात स्थान निश्चित केले. अंशुने पूजाला धूळ चारल्यानंतर ५७ किलो गटाच्या अंतिम लढतीत मानसीवर मात केली. अन्य वजन गटात आश्चर्यकारक निकालांची नोंद होऊ शकली नाही. विनेश फोगाट (५३ किलो) आणि दिव्या कांकरान (६८ किलो) यांनी आपापल्या लढती सहज जिंकल्या. निर्मला देवी (५० किलो) आणि किरण गोदारा (७६ किलो) यांनीदेखील चाचणीत बाजी मारली. विजेते सर्व महिला मल्ल १५ ते १८ जानेवारीपर्यंत रोममध्ये होणाऱ्या रँकिंग सीरिजमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यानंतर नवी दिल्लीत होणाºया आशियाई चॅम्पियनशिपमध्येही हे खेळाडू सहभागी होतील. या दोन्ही स्पर्धांमध्ये मल्लांनी पदके जिंकल्यास २७ ते २९ मार्च या कालावधीत जियान येथे होणाºया आशियाई आॅलिम्पिक पात्रता फेरीत त्यांना देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे. (वृत्तसंस्था)