शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
2
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
3
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
4
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
5
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
6
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान
7
RCB समोर पंजाबी शेर ढेर! रडत खडत शंभरी गाठली; पण PBKS च्या नावे झाला हा लाजिरवाणा विक्रम
8
"पाकिस्तानच्या गोळीबारामुळे बाधित पूंछ आणि इतर भागांसाठी मदत पॅकेज...", राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींना लिहिले पत्र
9
IPL 2025 PBKS vs RCB Qualifier 1 : "आप आये बहार आयी"; जोश हेजलवूडनं ७ चेंडूत अय्यरह-इंग्लिसचा खेळ केला खल्लास! अन्...
10
प्राची पिसाटला 'तो' मेसेज माझ्याच अकाउंटवरून गेला, पण...; सुदेश म्हशिलकरांचा अभिनेत्रीलाच उलट प्रश्न
11
आधी यादीतले कुख्यात दहशतवादी भारताकडे सोपवा, तरच...; भारताने पाकिस्तानला पुन्हा खडसावले!
12
RCB vs PBKS: आरसीबीचा मास्टरस्ट्रोक! प्लेईंग इलेव्हनमध्ये घातक गोलंदाजाचं नाव, पंजाबचं टेन्शन वाढलं
13
अफगाणिस्तान-पाकिस्तान सीमेवर गोळीबार, युद्धजन्य परिस्थिती; शरीफ सरकारवर नवं संकट
14
IPL 2025 Qualifier 1 : पावरप्लेमध्ये RCB कडून यश दयालसह भुवीचा जलवा! PBKS ची हिट जोडी ठरली फ्लॉप
15
सीबीआयची पासपोर्ट कार्यालयात धाड; लाच घेताना अधिकाऱ्यासह दलालास अटक
16
Video : "टॉयलेट वापरायचाय पण विमानतळावर पाणीच नाही"; पाकिस्तानी महिलेने केली स्वतःच्या देशाची पोलखोल
17
विम्याचा लाभ, वैद्यकीय सुविधेसह टोलमाफी; वारकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतले निर्णय
18
महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या वाहनाच्या धडकेत डिलिव्हरी बॉय ठार, अंधेरीतील घटना
19
जो संघ Qualifier 1 खेळलाय तोच चॅम्पियन ठरल्याचा इतिहास! एक अपवाद त्यात RCB ला पराभवाचा टॅग
20
फॉर्च्युनर, मोबाईल घेऊन हगवणेंच्या मनाला शांती नाही; अधिक महिन्यात सोने, चांदीची ताट मागितली - अनिल कस्पटे

महिला संघांतही होणार ‘काँटे की टक्कर’

By admin | Updated: March 30, 2016 02:51 IST

आॅस्ट्रेलिया-इंग्लंड हे क्रिकेटमध्ये एकमेकांचे हाडवैरीच! आयसीसी महिला क्रिकेट स्पर्धेत हेच दोन संघ अंतिम सामना खेळतात; पण २००९ नंतर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत उभय संघ

नवी दिल्ली : आॅस्ट्रेलिया-इंग्लंड हे क्रिकेटमध्ये एकमेकांचे हाडवैरीच! आयसीसी महिला क्रिकेट स्पर्धेत हेच दोन संघ अंतिम सामना खेळतात; पण २००९ नंतर टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य लढतीत उभय संघ परस्परांविरुद्ध आज बुधवारी खेळणार आहेत. आॅस्ट्रेलियाने न्यूझीलंड पाठोपाठ गटात दुसरे स्थान घेतले. इंग्लंड मागच्या पराभवाचा वचपा काढण्यास इच्छुक आहे. दोन्ही संघांतील खेळाडूंना एकमेकांचा खेळ माहिती असून इंग्लिश महिला खेळाडू ‘बिग बॅश’मध्येही खेळतात. आॅस्ट्रेलियाच्या खेळाडूही इंग्लंडमधील महिलांच्या सुपर लीगमध्ये सहभागी होणार आहेत. इंग्लंडची कर्णधार चार्लोट एडवर्डस् आणि आॅस्ट्रेलियाची कर्णधार मेग लेनिंग स्वत:ला विजयाच्या दावेदार मानायला तयार नाहीत. आॅस्ट्रेलियाची जमेची बाब ही की त्यांनी कोटलावर दोन सामने खेळले आणि दोन्ही जिंकले. हा संघ येथील परिस्थितीशी एकरूप झाला. इंग्लंड मात्र बदला चुकविण्याच्या इराद्याने खेळणार आहे. इंग्लंडने २००९ मध्ये पहिल्यांदा विश्वचषक जिंकला. त्यानंतर आॅस्ट्रेलियाने २०१० ते २०१४ या काळात जेतेपदाची हॅट्ट्रिक साधली. यंदाच्या विश्वचषकात खेळलेल्या सर्वच सामन्यात दोन्ही कर्णधार येथील विकेटस्वर समाधानी नाहीत. फिरोजशहा कोटला, नवी दिल्लीदुपारी ३.०० पासून‘‘याआधी दोनदा फायनलमध्ये हरलो. यंदा भाग्याची साथ लाभेल व आॅस्ट्रेलियाला नमवू अशी आशा आहे. आमच्यातील स्पर्धा जगजाहीर असल्याने कुठलेही दडपण नाही. आॅस्ट्रेलियाचा रथ उपांत्य फेरीतच रोखू.’ - चार्लोट एडवडर््सकर्णधार, इंग्लंड‘‘आम्ही जेतेपदाचे प्रबळ दावेदार आहोत, असे म्हणणार नाही; पण आक्रमक खेळून विजय मिळवू. स्पर्धा दीर्घकाळापासून सुरू आहे. यंदा काट्याची टक्कर होईल, अशी आशा आहे.’’- मेग लेनिंग, कर्णधार आॅस्ट्रेलिया.