शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

महिला संघाचा शानदार विजय

By admin | Updated: February 8, 2017 00:30 IST

दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी व युवा महिला फलंदाज देविका वैद्य व कर्णधार मिताली राज यांची वैयक्तिक अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारता

कोलंबो : दीप्ती शर्माची अष्टपैलू कामगिरी व युवा महिला फलंदाज देविका वैद्य व कर्णधार मिताली राज यांची वैयक्तिक अर्धशतकी खेळी याच्या जोरावर भारताने मंगळवारी यजमान श्रीलंकेचा ११४ धावांनी पराभव केला आणि आयसीसी महिला विश्वकप पात्रता फेरीच्या स्पर्धेत शानदार सुरुवात केली. ‘अ’ गटातील या लढतीत भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दीप्ती शर्मा (५४), देविका (८९) व मिताली (नाबाद ७०) यांच्या चमकदार फलंदाजीच्या जोरावर भारताने ५० षटकांत ४ बाद २५९ धावांची दमदार मजल मारली. प्रत्युत्तरात खेळताना श्रीलंकेचा डाव ८ बाद १४५ धावांवर रोखला गेला. या विजयासह भारताने दोन गुणांची कमाई केली. भारतीय फिरकीपटूंनी सुरुवातीपासून श्रीलंकेच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. डावखुरी फिरकीपटू राजेश्वरी गायकवाडने १० षटकांत १९ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले, तर एकता बिश्तने २७ धावांत २ फलंदाजांना माघारी परतवले. फलंदाजीमध्ये छाप सोडणाऱ्या दीप्तीने गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली. तिने १० षटकांत १२ धावांच्या मोबदल्यात एक बळी घेतला. श्रीलंका संघाने सुरुवातीपासून नियमित अंतरात विकेट गमावल्या. त्यांच्यातर्फे हसीनो परेराने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली, तर चमारी अटापट्टू (३०) व ईर्शानी कौशल्या (२६) यांनीही संघर्षपूर्ण खेळी केली. त्याआधी, दीप्तीने भारताला संथ, पण चांगली सुरुवात करून दिली. मोना मेश्राम (६) पाचव्या षटकात बाद झाल्यानंतर दीप्ती व देविका यांनी दुसऱ्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करून डाव सावरला. मितालीने चमकदार खेळी करताना देविकाच्या साथीने तिसऱ्या विकेटसाठी ४९ आणि हरमनप्रीत कौरसोबत (२०) चौथ्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली. व्ही. कृष्णमूर्ती १० धावा काढून नाबाद राहिली. दीप्ती व देविका यांनी कारकिर्दीत प्रथमच अर्धशतके झळकावली.देविकाने १०३ चेंडूंना सामोरे जाताना ११ चौकार लगावले, तर मितालीने ६२ चेंडूंमध्ये ८ चौकार ठोकले. दीप्तीच्या ९६ चेंडूंच्या खेळीमध्ये ४ चौकार व एका षटकाराचा समावेश आहे. श्रीलंकेतर्फे उदेशिका प्रबोधिनीने दोन, तर श्रीपाली वीराकोडी व इनोशी प्रियदर्शिनी यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कारकिर्दीतील दुसरा सामना खेळणारी देविका सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराची मानकरी ठरली. बांगलादेशाने ‘ब’ गटात पापुआ न्यूगिनी संघाचा ११८ धावांनी पराभव केला. बांगलादेशाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद २१५ धावा फटकावल्या आणि प्रतिस्पर्धी पापुआ न्यूगिनी संघाचा डाव ३२.१ षटकांत ९७ धावांत गुंडाळला. (वृत्तसंस्था)