शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

महिला रिले संघ सातव्या स्थानी, पुरुष संघ अपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2016 05:18 IST

भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स पथकाची निराशादायी कामगिरी संपण्याची चिन्हे नाहीत. ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये महिला संघ हिटमध्ये सातव्या स्थानी घरसला तर पुरुष संघाला अपात्र घोषित करण्यात आले.

रिओ : भारतीय अ‍ॅथ्लेटिक्स पथकाची निराशादायी कामगिरी संपण्याची चिन्हे नाहीत. ४ बाय ४०० मीटर रिलेमध्ये महिला संघ हिटमध्ये सातव्या स्थानी घरसला तर पुरुष संघाला अपात्र घोषित करण्यात आले.निर्मला शेरॉन, टिंटू लूका, एम. आर. पुवम्मा आणि एनिल्डा थॉमस यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या हिटमध्ये ३ मिनिटे २९.३३ सेकंद वेळ नोंदविली. आठ संघात भारतीय मुली क्युबाच्या तुलनेत पुढे आल्या. मोहम्मद कुंजू, मोहम्मद अनस, अयासामी धारुन तसेच राजीव यांचा समावेश असलेल्या पुरुष संघाने ३ मिनिटे ०२.२४ सेकंद वेळ नोंदविली खरी पण अखेरच्या टप्प्यात धारुन आणि राजीव यांच्यात बॅटन चुकीच्या पद्धतीने हस्तांतरणामुळे संघाला अपात्र ठरविण्यात आले.१६ संघांमध्ये भारतीय महिला संघ एकूण १३ व्या स्थानावर राहिला. महिला संघाकडून निर्मलाने चांगली सुरुवात केली. पण पहिल्या लॅपमध्ये माघारली. नंतर टिंटू लूकाला पिछाडी भरून काढण्यात अपयश आले. पुवम्मा आणि एनिल्डा यांच्याकडे तर कुठलीही संधी नव्हती. जमैका, ब्रिटन, कॅनडा, इटली, जर्मनी आणि बहमास नंतर भारत सातव्या स्थानी आला. जमैका, ब्रिटन आणि कॅनडा हिटमध्ये पहिल्या तीन स्थानांवर आले. प्रत्येक हिटमध्ये पहिल्या तीन स्थानांवर राहणाऱ्या संघांमधून सर्वोत्कृष्ट वेळ नोंदविणारे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतात. पुरुषांच्या ५० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत राष्ट्रीय विक्रमवीर संदीप कुमार ४ तास ७ मिनिटे वेळ नोंदवित ३४व्या स्थानी आला. संदीपचा राष्ट्रीय विक्रम ३ तास ५६ मिनिटे २२ सेकंद असा आहे. ३ मे २०१४ साली त्याने हा विक्रम नोंदविला होता. महिलांच्या २० किमी पायी चालण्याच्या शर्यतीत आशियाई रौप्य विजेती खुशबीर कौर १ तास ४० मिनिटे ३३ सेकंदांसह ६३ खेळाडूंमध्ये ५४ व्या स्थानावर राहिली. खुशबीरची ही सर्वांत खराब कामगिरी आहे. सपना पुनिया मात्र शर्यत पूर्ण करू शकली नाही.आता स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी पुरुष मॅरेथॉन होईल. त्यात भारताचे धावपटू नीतेंद्रसिंग रावत, खेता राम आणि गोपी टोंकवाला हे आव्हान सादर करतील. (वृत्तसंस्था)