शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

महिला क्रिकेट विश्वचषक : भारताचा विजयी ‘चौकार’

By admin | Updated: July 5, 2017 23:16 IST

सलग तीन लढतींमध्ये विजय मिळविलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने चौथ्या लढतीत सुद्धा विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.

डर्बी : दीप्ती शर्मा आणि कर्णधार मिताली राज यांच्या शानदार अर्धशतकानंतर गोलंदाजांनी केलेल्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारतीय संघाने महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत सलग चौथा विजय मिळवताना श्रीलंकेला १६ धावांनी नमवले. भारताने प्रथम ५० षटकात ८ बाद २३२ धावा उभारल्यानंतर, श्रीलंकेमे ५० षटकात ७ बाद २१६ धावा काढल्या.

धावांचा पाठलाग करताना लंकेने सावध सुरुवात केली. दिलानी मनोदरा (६१), शशिकला सिरिवर्देने (३७) आणि निपुनी हंसिका (२९) यांच्या जोरावर श्रीलंकेने आपले आव्हान कायम राखले होते. परंतु, अनुभवी गोलंदाज झुलन गोस्वामी आणि पुनम यादव यांनी मोक्याच्यावेळी प्रत्येकी २ बळी घेत लंकेची कोंडी केली. दीप्ती आणि एकता बिस्त यांनीही प्रत्येकी एक बळी घेत चांगला मारा केला. कांऊटी मैदानावर नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्विकारली. परंतु, पूनम राऊत (१६) आणि स्मृती मानधना (८) या फॉर्ममध्ये असलेल्या सलामीवीरांना झटपट बाद करुन श्रीलंकेने भारताचा निर्णय चुकीचा ठरवला. यानंतर राज - शर्मा या जोडीने ११८ धावांची महत्त्वपुर्ण भागीदारी करुन भारताला सावरले. ही जोडी भारताला मोठी मजल मारुन देणार अशी अपेक्षा असताना अमा कांचना हिने शर्माला बाद करुन ही जोडी फोडली. यानंतर भारतीयांनी आक्रमक फटके खेळण्याच्या प्रयत्नात विकेट फेकल्याने धावसंख्या मर्यादित राहिली. शर्मा परतल्यानंतर झूलन गोस्वामी (९) व मिताली पाठोपाठ परतल्याने भारतीय फलंदाजी काहीशी दडपणाखाली आली. हरमनप्रीत कौर (२०) आणि वेदा कृष्णमुर्ती (२९) यांच्यामुळे भारताला दोनशेच्या पलीकडे मजल मारण्यात यश आले. श्रीलंकेच्या श्रीपाल वीराकोडीने ३ आणि इनोका रणवीराने २ बळी घेत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले. (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक :भारत : ५० षटकात ८ बाद २३२ धावा (दीप्ती शर्मा ७८, मिताली राज ५३, वेदा कृष्णमुर्ती २९; श्रीपाल वीराकोडी ३/२८, इनोका रणवीरा २/५५). श्रीलंका : ५० षटकात ७ बाद २१६ धावा (दिलानी मनोदरा ६१, शशिकला सिरिवर्दने ३७, निपुनी हंसिका २९; पुनम यादव २/२३, झुलन गोस्वामी २/२६, दीप्ती शर्मा १/४६.)