शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
2
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
3
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
4
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
5
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
7
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
8
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
9
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
10
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
11
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी
12
पाकिस्तानात शरणार्थी, मशिदीतून शिक्षणाची सुरुवात; तालिबानी परराष्ट्रमंत्री मुत्ताकी किती शिक्षित आहेत? जाणून घ्या...
13
ईतवारी एक्सप्रेसमध्ये सापडले सोन्याचे घबाड, एकाला अटक; साडेतीन कोटींचे सोने जप्त!
14
उल्हासनगर भाजपाकडून पाणी टंचाई विरोधात मोर्चा; योगेश म्हात्रे यांच्याकडून आत्महत्येचा प्रश्न 
15
"शेतकरी पॅकेज, कर्जमाफी, लाडकी बहीण या मुद्द्यांवर  महायुती सरकारकडून जनतेची फसवणूक’’, रमेश चेन्नीथला यांचा आरोप
16
"डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळावा म्हणून आम्ही..."; इस्रायलचे PM बेंजामिन नेतन्याहूंनी मानले ट्रम्प यांचे आभार
17
तेज प्रताप यादव यांनी २१ जागांवर उमेदवार उभे केले; स्वतः या जागेवरून निवडणूक लढवणार
18
अरे देवा हे काय, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्येच कोयते-चॉपर! नाशिकमधील भाईगिरीचे 'फॅड' शाळेपर्यंत
19
मुंबईत ठाकरे बंधूंसोबत लढायचं की स्वतंत्रपणे? काँग्रेसच्या नेत्यांनी हायकमांडकडे केली अशी मागणी
20
सात दिवस उलटूनही IPS पूरन कुमार यांच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम नाही; पत्नीने केली मोठी मागणी...

पावसाच्या जोरावर विंडिजने जिंकली मालिका

By admin | Updated: August 29, 2016 02:00 IST

दोन सामन्यांची टी२० मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी रविवारचा सामना अनिवार्य असलेल्या भारताच्या पदरी अखेर निराशाच आली.

फ्लोरिडा : दोन सामन्यांची टी२० मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी रविवारचा सामना अनिवार्य असलेल्या भारताच्या पदरी अखेर निराशाच आली. पावसाच्या व्यत्ययामुळे दुसरा सामना पहिल्या डावानंतर रद्द करण्यात आल्याने टीम इंडियाला टी२० मालिकेत ०-१ असा पराभव पत्करावा लागला. वेस्ट इंडिजने पहिला सामना अवघ्या एका धावेने जिंकून मालिकेत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली होती.भारतीय संघाने रविवारी दुसऱ्या व अखेरच्या टी-२० लढतीत वेस्ट इंडिजचा डाव १९.४ षटकांत १४३ धावांत गुंडाळला. विशेष म्हणजे तांत्रिक कारणामुळे आधीच या सामन्यास ४० मिनिटे उशीराने सुरुवात झाली होती. विजयी लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने २ षटकात नाबाद १५ धावा काढल्या होत्या. मात्र, नेमकी यावेळी पावसाने दमदार खेळी करुन सामना रद्द करण्यास भाग पाडले. तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी अचूक मारा करीत विंडीजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. विं ब्न डीजतर्फे जॉन्सन चार्ल्सने सर्वाधिक ४३ धावांची खेळी केली. लेंडल सिमन्स (१९), किरोन पोलार्ड व आंद्रे रसेल (प्रत्येकी १३ धावा) आणि कार्लोस ब्रेथवेट (१८) यांनी दुहेरी धावसंख्या नोंदवली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. धोनीने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून विंडीजला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. गोलंदाजांनी शनिवारी केलेल्या चुकांपासून बोध घेत आज अचूक मारा करीत विंडीजच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारताने आज स्टुअर्ट बिन्नीच्या स्थानी फिरकीपटू अमित मिश्राला संधी दिली तर विंडीजने शनिवारी खेळलेला संघच कायम राखला. मिश्राचा खेळविण्याचा निर्णय यशस्वी ठरला. त्याने २४ धावांच्या मोबदल्यात ३ बळी घेतले. जसप्रित बुमराह (२-२६), रविचंद्रन अश्विन (२-११), शमी (२-३१) व भूवनेश्वर (१-३६) यांची त्याला योग्य साथ लाभली. धावफलकवेस्ट इंडिज : जॉन्सन चार्ल्स झे. रहाणे गो. मिश्रा ४३, लुइस झे. मिश्रा गो. शमी ०७, मार्लोन सॅम्युअल्स झे. धोनी गो. बुमराह ०५, लेंडल सिमन्स यष्टिचित धोनी गो. अश्विन १९, आंद्रे फ्लेचर त्रि. गो. बुमराह ०३, किरोन पोलार्ड पायचित गो. अश्विन १३, आंद्रे रसेल झे. कोहली गो. भूवनेश्वर १३, ड्वेन ब्राव्हो त्रि. गो. मिश्रा ०३, कार्लोस ब्रेथवेट त्रि. गो. मिश्रा १८, सुनील नरेन नाबाद ०९, सॅम्युअल बद्री त्रि. गो. शमी ०१. अवांतर (९). एकूण १९.४ षटकांत सर्वबाद १४३. बाद क्रम : १-२४, २-५०, ३-७६, ४-७६, ५-९२, ६-९८, ७-१११,८-१२३, ९-१३३, १०-१४३. गोलंदाजी : भुवनेश्वर ४-०-३६-१, शमी २.४-०-३१-२, मिश्रा ४-०-२४-३, जडेजा २-०-११-०, अश्विन ३-०-११-२, बुमराह ४-०-२६-२.भारत : रोहित शर्मा नाबाद १०, अजिंक्य रहाणे नाबाद ४. अवांतर -१, एकूण : २ षटकात बिनबाद १५. गोलंदाजी : आंद्रे रसेल १-०-७-०; सॅम्युअल बद्री १-०-७-०.