शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

अफगाणिस्तानचा विंडीजला धक्का

By admin | Updated: March 28, 2016 03:33 IST

अफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषकाच्या समारोपाच्या सामन्यात रविवारी कमाल केली. ओळीने तिन्ही सामने जिंकून ‘ग्रुप एक’मध्ये टॉपवर असलेल्या वेस्ट इंडिजला विदर्भ क्रिकेट

- किशोर बागडे,  नागपूरअफगाणिस्तान संघाने टी-२० विश्वचषकाच्या समारोपाच्या सामन्यात रविवारी कमाल केली. ओळीने तिन्ही सामने जिंकून ‘ग्रुप एक’मध्ये टॉपवर असलेल्या वेस्ट इंडिजला विदर्भ क्रिकेट संघटनेच्या जामठा स्टेडियमवर या युवा संघाने सहा धावांनी पाणी पाजले. हा विजय अफगाणिस्तानसाठी चॅम्पियन बनल्यासारखाच होता. विंडीजला पराभवाचा फारसा फटका बसला नसला, तरी अपराजित राहण्याच्या त्यांच्या आशा मात्र धुळीस मिळाल्या आहेत.पुरेसा अनुभव नसलेल्या या संघाने फलंदाजीपाठोपाठ गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात प्रतिस्पर्धी खेळाडूंसोबतच प्रेक्षकांनादेखील चकित करीत विजयी नृत्यासह आनंदी निरोप घेतला. या सामन्याचा हिरो ठरला तो नजीबुल्लाह जदरान. त्याने एकाकी संघर्ष करीत नाबाद ४८ धावांच्या बळावर २० षटकांत ७ बाद १२३ पर्यंत मजल गाठून दिली. त्यानंतर अखेरच्या षटकांत तिसऱ्या चेंडूवर कार्लोस ब्रेथवेटचा सीमारेषेवर अप्रतिम झेल घेत विंडीजला २० षटकांत ८ बाद ११७ धावांत रोखून विजयावर कळस चढविला. अफगाणिस्तानला विजयाचे जितके श्रेय जाते, तितकाच विंडीज संघ पराभवास जबाबदार ठरला. मधल्या फळीतील एकाही फलंदाजाने जबाबदारीने खेळी केली नाही. ड्वेन ब्राव्होने सर्वाधिक २८ धावांचे योगदान दिले. मोहम्मद नबी आणि राशिद खान यांनी प्रत्येकी दोन तसेच हमजा, हसन आणि नेब यांनी एकेक गडी बाद केला.३८ धावांत पहिले तिन्ही फलंदाज गमावल्यानंतरही त्यांना बोध घेता आला नाही. पदार्पण करणारा सलामीवीर लेविस शून्यावर बाद झाला. १५ चेंडूंत दोन षटकार व एका चौकारासह २२ धावा कढणाऱ्या जॉन्सन चार्ल्सची हमीद हसनने दांडी उडविली. आंद्रे फ्लेचरने दहा धावा केल्यानंतर त्याच्या पायात लचक भरल्याने तो निवृत्त होऊन परतला. मर्लोन सॅम्युअल्सला (५) राशिद खानने फिरकीच्या जाळ्यात ओढून त्रिफळाबाद केले. ब्राव्हो-रामदीन यांनी चौथ्या गड्यासाठी ४६ चेंडूंत ४१ धावांची भागीदारी करीत पडझड थांबविली. ब्राव्हो २८ धावा काढून परतल्यानंतर रामदीन (१८) राशिदच्या चेंडूवर यष्टिचित होताच विंडीजचा अर्धा संघ ८९ धावांत बाद झाला. विजयासाठी अखेरच्या २४ चेंडूंत ३५ धावांची गरज होती. १७ व्या षटकांत विंडीजला सहा धावा घेता आल्या. एव्हिन लेविसचे पदार्पणवेस्ट इंडिजचा युवा डावखुरा सलामीवीर एव्हिन लेविस याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. विंडीजचे महान खेळाडू क्लाईव्ह लॉईड यांनी त्याला सामन्यापूर्वी कॅप प्रदान केली. २४ वर्षांचा लेविस व्हीसीएवर पदार्पणात भोपळाही न फोडता झेलबाद झाला.अफगाण संघाचा जल्लोष!विजयावर शिक्कमोर्तब होताच अफगाण संघातील खेळाडूंनी नृत्य करीत मैदानावर जल्लोष केला. अफगाणिस्तानचे पत्रकार आणि रेडियो समालोचक एकमेकांना आलिंगन देत विजयाचा आनंद साजरा करीत होते. अफगाणिस्तान संघाने जल्लोषानंतर छायाचित्रदेखील काढून घेतले.