शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

विंडीज पदाधिकाऱ्यांनी पावले उचलणे आवश्यक

By admin | Updated: July 2, 2017 00:10 IST

पहिली लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर खेळल्या गेलेल्या दोन लढतींमध्ये भारताने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले. विंडीज क्रिकेटच्या

-सौरव गांगुली  पहिली लढत पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द झाल्यानंतर खेळल्या गेलेल्या दोन लढतींमध्ये भारताने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व गाजवले. विंडीज क्रिकेटच्या समृद्ध भूतकाळाचा विचार केल्यानंतर त्यांचा घसरत जाणारा आलेख बघणे जागतिक क्रिकेटसाठी चांगली बाब नाही. येथील क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी विंडीज क्रिकेटला पुन्हा रुळावर आणण्यासाठी कंबर कसून कामाला लागण्याची गरज आहे. विंडीजच्या नैसर्गिक आक्रमक क्रिकेटविना जागतिक क्रिकेटची रंगत काही प्रमाणात नक्कीच ओसरेल. विंडीज क्रिकेटचा आलेख उंचावण्यासाठी काय करता येईल, यासाठी कॅरेबियन क्रिकेट बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांनी लवकर पावले उचलण्याची गरज आहे. दोन लढतींमध्ये अजिंक्य रहाणेची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. पाचही लढतींमध्ये आपण खेळणार आहोत, याची त्याला चांगली कल्पना आहे आणि त्याची झलक त्याच्या खेळामध्ये दिसून आली. कोहलीने रहाणेसारख्या खेळाडूसोबत चर्चा करायला हवी आणि त्याला संघातील त्याची भूमिका समजावून सांगायला हवी. त्यामुळे रहाणेसारख्या खेळाडूला आपला खेळ उंचावता येईल आणि त्याला त्याचे संघातील महत्त्वही कळेल. चर्चेचा दुसरा मुद्दा म्हणजे कुलदीप यादव आहे. त्याच्या गोलंदाजीमध्ये विविधता आहे. विशेषत: पाटा खेळपट्टीवर त्याची गोलंदाजी संघासाठी जमेची बाजू ठरू शकते. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेदरम्यान पाटा खेळपट्ट्यांवर भारतीय फिरकीपटू निष्प्रभ भासले. त्यामुळे फिरकीला अनुकूल नसलेल्या खेळपट्ट्यांवर संघात कुलदीपसारख्या गोलंदाजाची गरज असते. गोलंदाजीतील विविधतेमुळे कुलदीप भारतीय वन-डे संघातील महत्त्वाचा खेळाडू ठरू शकतो. सध्याची परिस्थिती बघता भारतीय संघाने या मालिकेत ४-० ने बाजी मारली तर आश्चर्य वाटणार नाही. वेस्ट इंडिज संघाबाबत अधिक चर्चा करण्यासारखे नाही. सध्याचा विंडीज संघ या मालिकेत काही चमत्कार घडवेल, असे वाटत नाही. विंडीजचे क्रिकेट प्रेम जगजाहीर असताना स्टेडियममधील रिकाम्या खुर्च्या बघितल्यानंतर दु:ख वाटते. अनेक लोककला लाभलेल्या या बेटांवर कॅलिस्पोचे धुंद करणारे बिट कानावर पडले नाहीत तर चुकल्यासारखे वाटते. (गेमप्लॅन)