शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

दुखापतग्रस्त रवींद्र जडेजा विश्वकप स्पर्धेला मुकणार?

By admin | Updated: January 4, 2015 01:30 IST

खांद्याच्या दुखापतीमुळे भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचे आगामी विश्वकप खेळण्याचे स्वप्न भंग होऊ शकते

नवी दिल्ली : खांद्याच्या दुखापतीमुळे भारताचा अष्टपैलू रवींद्र जडेजाचे आगामी विश्वकप खेळण्याचे स्वप्न भंग होऊ शकते. खांद्याच्या दुखापतीमुळे जडेजाला आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली. खांद्याच्या दुखापतीतून जडेजा अद्याप सावरलेला नाही. त्यामुळे त्याचे विश्वकप स्पर्धेत खेळणे जवळजवळ कठीण भासत आहे. विश्वकप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड ६ जानेवारी रोजी जाहीर होणार आहे. आॅस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेला प्रारंभ होण्यापूर्वी सराव सत्रामध्ये जडेजाच्या खांद्याला दुखापत झाली होती. या दुखापतीला जवळजवळ सहा-सात आठवड्यांचा कालावधी लोटला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जडेजाच्या स्थानी डावखुरा फिरकीपटू व अष्टपैलू अक्षर पटेलला विश्वकप संघात स्थान मिळण्याची शक्यता आले. २६ वर्षीय अष्टपैलू जडेजाने १०९ वन-डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना १६९१ धावा फटकाविल्या आहेत. दर्जेदार क्षेत्ररक्षक असलेला जडेजा वन-डे संघात उपयुक्त खेळाडू आहे. दुसऱ्या बाजूचा विचार करता २० वर्षीय पटेलने ९ वन-डे सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व करताना एकूण ४० धावा केल्या असून, १४ बळी घेतले आहेत. पटेलने गेल्या वर्षी जून महिन्यात कारकिर्दीला प्रारंभ केला. पटेल ६ जानेवारीपासून सिडनीमध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या चौथ्या सामन्यात कसोटी पदार्पण करण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी बीसीसीआय विश्वकप स्पर्धेसाठी संघ जाहीर करणार आहे. जडेजा संघाबाहेर असल्याचा लाभ नाडियाड निवासी फिरकीपटू पटेलला मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)जडेजा गेल्या आठवड्यापासून चेन्नईजवळ पोरुरच्या एसआरएमसी कॅम्पसमध्ये नितीन पटेल व ट्रेनर रजनीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली दुखापतीवर उपचार घेत आहे. चिकित्सकाच्या उपचारानंतरही जडेजाला आॅस्ट्रेलियात खेळल्या जाणाऱ्या तिरंगी मालिकेत सहभागी होता येणार नाही. विश्वकप व तिरंगी मालिकेसाठी संघाची घोषणा ६ जानेवारी रोजी होणार आहे. निवड समिती सदस्यांना जडेजाला संघात स्थान द्यायचे किंवा नाही, याचा निर्णय घ्यावा लागणार आहे. विश्वकप स्पर्धेला १४ फेब्रुवारीपासून प्रारंभ होत असून, तोपर्यंत जडेजा फिट होण्याची शक्यता धूसर आहे. (वृत्तसंस्था)