वेलिंग्टन : न्यूझीलंडविरुद्ध २१ मार्च रोजी होणाऱ्या वर्ल्डकपच्या उपांत्यपूर्व फेरीत स्फोटक फलंदाज ख्रिस गेल कमबॅक करू शकतो, असा विश्वास वेस्ट इंडीज संघ व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे़विंडीजचा हा स्टार फलंदाज नेपिअर येथे झालेल्या संयुक्त अरब अमिरातीविरुद्धच्या (यूएई) लढतीत पाठीच्या दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता़ या लढतीत विंडीजने ६ विकेटनी विजय मिळवून उपांत्यपूर्व फेरीत जागा निश्चित केली होती़दरम्यान, गेल उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीपूर्वी फिट झाला, तर त्याच्याऐवजी कुणाला संघातून बाहेर ठेवायचे, ही विंडीज संघ व्यवस्थानापुढे मोठी अडचण आहे़ कारण गेलऐवजी संघात स्थान मिळालेल्या जॉन्सन चार्ल्सने यूएईविरुद्ध शानदार अर्धशतकी खेळी केली होती़ विंडीजचा कर्णधार जेसन होल्डर म्हणाला, की गेल पाठीच्या दुखापतीमुळे त्रस्त होता़ तो आमचा मुख्य खेळाडू आहे़ उपांत्यपूर्व लढतीपूर्वी तो फिट होईल, अशी आशा आहे़ (वृत्तसंस्था)गेल खेळला तर ड्वेन स्मिथला बाहेर बसावे लागेल़ (वृत्तसंस्था)०००
गेल कमबॅक करणार?
By admin | Updated: March 16, 2015 23:53 IST